वाई: दिवाळी सुट्ट्यांमुळे गावाकडे जाणाऱ्यांची गर्दी वाढल्यामुळे पुणे सातारा महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. वाहतुकीचा वेग मंदावला आहे. खंबाटकी घाटात वाहतूक अतिशय संथ गतीने सुरू आहे. आनेवाडी टोलनाक्यावर वाहनांची मोठी रांग लागली आहे.

मुंबई पुण्याकडून सातारा सांगली कोल्हापूर,कोकणच्या दिशेने जाणाऱ्यांची एकदम गर्दी झाली.त्यांची खाजगी वाहने महामार्गावर आल्याने महामार्ग हाऊसफुल्ल झाला. वाहनांची होणारी गर्दी पाहता आनेवाडी व खेड शिवापूर टोलनाक्यावर अधिकच्या लेन सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच मुंबई पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरही गाड्यांची मोठी गर्दी झाली आहे.

आणखी वाचा- सांगली : चिडचिड करते म्हणून वृध्दाकडून पत्नीचा उशीने तोंड दाबून खून

आजपासून दिवाळी सुट्टीसाठी गावाकडे जाणारे चाकरमानी जात आहेत. वाहनांची गर्दी असल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. खंबाटकी घाटातही वाहतूक संथ आहे.हलक्या वाहनांच्या तुलनेत अवजड वाहने घाटात आल्याने वाहतूक हळू आहे. शाळा आणि खाजगी कार्यालये,न्यायपालिकांना आठ दिवस सुट्टी आहे. लक्ष्मी पूजन,दिवाळी पाडवा,भाऊबीज गावाकडे आपल्या कुटूंबियां समावेत घालवण्यासाठी ही गर्दी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुण्याहून येणाऱ्या एसटी बस फुल्ल असल्याने सातारा मध्यवर्ती बस स्थानकात ही बस आणि प्रवाशांची मोठी गर्दी आहे.सातारा,महाबळेश्वर पुणे मार्गावर दर अर्ध्यातासाने एस टी बस सोडल्या जात असल्याची माहिती विभागीय नियंत्रकांनी दिली.मागील दोन दिवसांपासून बस स्थानकात गर्दी आहे.माल ट्रक आणि छोटी वाहने माहामार्गावरच पूजेसाठी झेंडूची फुले खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांचा माल शिवरा लगत विकला जात आहे.सातारा जिल्ह्यात शहरा अंतर्गत रस्तेही दिवाळी साहित्य खरेदीसाठी तुडूंब भरले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाजारपेठही भरून वहात आहे.