scorecardresearch

‘आम्ही बाळासाहेबांच्या प्रत्येक गोष्टीवर अधिकार सांगणार,’ शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांचं विधान!

शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर शिंदे आणि उद्धव ठाकरे गटात वेगवेगळ्या कारणांवरून संघर्ष होत आहे.

‘आम्ही बाळासाहेबांच्या प्रत्येक गोष्टीवर अधिकार सांगणार,’ शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांचं विधान!
बाळासाहे ठाकरे, संजय गायकवाड, उद्धव ठाकरे (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर शिंदे आणि उद्धव ठाकरे गटात वेगवेगळ्या कारणांवरून संघर्ष होत आहे. आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा दावा दोन्ही पक्ष करत आहेत. असे असतानाच बुधवारी (२८ डिसेंबर) मुंबई पालिका कार्यालयात या दोन्ही गटात संघर्ष झाला. उद्धव ठाकरे गटाचे लोकप्रतिनिधी गाफील असताना अचानक शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका मुख्यालयातील पक्ष कार्यालयावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. यामुळे पालिका मुख्यालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान याच घटनेचा संदर्भ देत शिंदे गटातील नेते तथा आमदार संजय गायकवाड यांनी मोठे विधान केले आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या सर्वच गोष्टींवर अधिकार सांगणार आहोत, असे संजय गायकवाड म्हणाले आहेत. ते आज ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा >>> त्रिपुरामध्ये भाजपाच्या सातव्या आमदाराचा राजीनामा, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय उलथापालथ!

“बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला कडवट हिंदुत्वाचा विचार दिला. त्यांनी आम्हाला लढणं शिकवलं. शेताबांधावरचा कार्यकर्ता आज आमदार झालेला आहे. अनेकजण मोठे झाले. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला आज तिलांजली दिली गेली. ज्या दिवशी मी काँग्रेससोबत जाण्याचा विचार करेन, तेव्हा मी माझा पक्ष बंद करेन असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. आज उद्धव ठाकरे यांची सेना त्याच काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत बसते. सध्या बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची पायमल्ली होत आहे,” असा दावा संजय गायकवाड यांनी केला.

हेही वाचा >>> मुंबई महानगरपालिकेच्या शिवसेना पक्ष कार्यालयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा ताबा? दोन्ही गट आमनेसामने

“मुंबईला पक्ष कार्यालयावरून राडा झाला. आमच्याकडे सध्या ४० आमदार आहेत. १३ खासदार आहेत. आमचा पक्ष सर्वात मोठा आहे. याच कारणामुळे आम्हाला बाळासाहेबांची शिवसेना असे नाव मिळालेले आहे. बाळासाहेबांच्या ज्या-ज्या गोष्टी असतील त्यावर आम्ही अधिकार सांगणार आहोत,” असे संजय गायकवाड यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> Gautam Adani : गौतम अदाणींची नरेंद्र मोदींशी किती जवळीक? राजीव गांधींचे नाव घेत खुद्द अदानींनीच सांगितले; म्हणाले “माझ्यावर वेगवेगळे…”

मुंबई पालिका कार्यालयात नेमकं काय घडलं?

उद्धव ठाकरे गटाचे लोकप्रतिनिधी गाफील असताना अचानक शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई पालिकेतील शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात प्रवेश केल्यामुळे पालिका मुख्यालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काही वेळातच उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक पालिका मुख्यालयात जमले आणि दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकले होते. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजी, हमरीतुमरी, धक्काबुक्की झाली. त्यानंतर अखेर सुरक्षारक्षकांनी सर्वाना कार्यालयाबाहेर काढल्यानंतर हा संघर्ष तात्पुरता मिटला. खासदार राहुल शेवाळे आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यासह शिंदे गटाचे पदाधिकारी पालिका मुख्यालयातील शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात गेले होते. 

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-12-2022 at 14:52 IST

संबंधित बातम्या