ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ‘महाप्रबोधन यात्रे’च्या माध्यमातून त्या विविध मतदारसंघात जात आहे. महाप्रबोधन यात्रेतून त्या भारतीय जनता पार्टीसह शिंदे गटातील आमदारांवर जोरदार टीकास्र सोडत आहेत. या दौऱ्यात त्या सातत्याने शिंदे गटातील आमदारांचा उल्लेख ‘माझे भाऊ’ असा करत उपरोधिक टोलेबाजी करत आहेत.

याच टीकेवरून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केली आहे. सुषमा अंधारे सगळ्यांनाच माझा भाऊ म्हणतात, पण त्या बाईने काय-काय लफडी केली आहेत, तिलाच माहीत… अशा शब्दांत संजय शिरसाट यांनी टीका केली. ते छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना मेळाव्यात बोलत होते.

हेही वाचा- “सुहास कांदेला रस्त्यावर फेकायचंय आणि…”, मालेगावातून संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल!

सुषमा अंधारेंवर टीकास्र सोडताना संजय शिरसाट म्हणाले, “ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. सत्तार भाऊ माझेच भाऊ आहेत, भुमरे भाऊ पण माझेच भाऊ आहेत. पण तिने काय-काय लफडी केली आहे, हे तिलाच माहीत. अरे पण तू आहे तरी कोण? आम्ही आमची ३८ वर्षे शिवसेनेसाठी घालवली. आता तुम्ही येऊन आम्हाला मार्गदर्शन करताय आणि काही उरलेले लोक टाळ्या वाजवत आहेत.”

हेही वाचा- मोठी बातमी! अंबादास दानवे शिंदे गटाच्या संपर्कात, संजय शिरसाट यांचा मोठा दावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आपल्या संपर्कात असल्याचं सांगत संजय शिरसाट यांनी दावा केला की, अंबादास दानवे माझ्या संपर्कात आहेत. राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. अंबादासने मला सांगितलं बाई (सुषमा अंधारे) खूप डोक्याच्या वर झाली.