केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला खर्चाची मर्यादा ७० लाख रुपये ठरवली आहे. मात्र, निवडणूक यंत्रणेने उमेदवारांसाठी जारी केलेल्या दरपत्रकातील खाद्यपदार्थाचे दर हे बाजाराभावापेक्षा अधिक आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष आणि निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारापुढे यंदाच्या निवडणुकीत खर्चमर्यादा पालनाचे आव्हान आहे.

निवडणूक आयोगाने वडापावसाठी प्रतिनग १५ रु पये, पोहे ३० रु पये, साधा चहा ८ रु पये, मटण थाळीवर कार्यकर्त्यांंनी ताव मारल्यास त्यासाठी २४० रु पये, बिर्याणी प्लेटसाठी २०५ रु पये तर शाकाहारी थाळीसाठी ११५ रु पये दर उमेदवारांना मोजावा लागणार आहे. या दरानुसारच उमेदवारांना खर्च सादर करावा लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते लोकसभेपर्यंत अशा सर्वच निवडणुकांसाठी आयोग दरपत्रक जाहीर करत असते. या दरपत्रकात टाचणीपासून ते सभेच्या मंडपापर्यंत आणि चहापासून ते शाकाहारी व सामिष जेवणापर्यंतच्या सर्वच गोष्टींचा समावेश असतो.

लोकसभा निवडणुकीत प्रत्येक लोकसभा मतदारसंघनिहाय, स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन निवडणूक खर्चाचे दरपत्रक निश्चित केले जातात. या दरपत्रकाप्रमाणेच उमेदवारांना आपल्या खर्चाचा तपशील देणे बंधनकारक आहे. उमेदवाराला खर्चाची मर्यादा ७० लाखापर्यंत ठेवण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक दरपत्रकानुसार वडापाव व पॅटीस प्रत्येकी १५ रु पये, पोहे आणि उपमा प्रत्येकी ३० रु पये, चहा साधा ८ तर स्पेशल चहा १५ रु पये, शाकाहारी थाळी ११५ रु पये, स्पेशल शाकाहारी थाळी १८० रु पये, अंडाकरी थाळी ९० रु पये, मटण, चिकन, मच्छी थाळी प्रत्येकी २५० रु पये, १ लिटर पाण्याची बाटली १७ रु पये, शीतपेय २० रु पये या खाद्य पदार्थाबरोबरच अन्य गोष्टींचे दर निश्चित करण्यात आले आहेत.

निवडणुकीदरम्यान काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन, भाडय़ाने वापरण्यात येणाऱ्या गाडय़ांचे दर ठरवले गेले आहेत. टोपी ८५ रु पये, टी-शर्ट प्रतिनग १३५ रु पये, शालीचे दर १०५ ते ८०० रु पयापर्यंत आहेत. मंडप, खुच्र्या, हारतुऱ्यांपासून फटाक्यांपर्यंत दरांचाही त्यात समावेश आहे.

उमेदवाराला एक हजार फटाक्यांची माळ ७५० रु पयांनी खरेदी करावी लागणार आहे. कार्यकर्त्यांंना फिरण्यासाठी जीप, बोलोरे, टाटा सुमो, इनोव्हा, फोर्ड आयकॉन, स्कोडा, होंडासिटी या वाहनांच्या दराबरोबरच प्रचार सभांसाठी चौरस फुटनिहाय व्यासपीठ, मंडप, मॅटिंग, खुर्ची, कुशन खुर्ची, टयुबलाईट, टेबल, सोफासेट, कुलर, फॅन यांचे नगनिहाय, ध्वनिक्षेपक, माईक, अ‍ॅम्प्लीफायर यांचेही दर निश्चित केले आहे.

इतर दर असे..

शुद्ध शाकाहरी थाळी व स्पेशल थाळीसाठी स्वतंत्र दर आहेत. शिवाय भजी, भेळ व ढोकळा २० रु पये प्लेट, सामोसा व कचोरी २५ रु पये, प्रचारासाठी रिक्षा ध्वनिक्षेपकासह १ हजार ९०० रु पये, राऊंड बुके १०० रु पये, ट्रॅंगल बुके १५० रु पये, व्हीआयपी बुके ३५० रु पये, मोठा हार ३ ते ५ हजार रु पये, बास्केट बुके ३०० रु पये, क्रॅकर फटाका ७५० रु पये. निवडणुकीसाठी उमेदवाराच्या कार्यालयात वापरण्यात येणाऱ्या टाचणीपासून प्रचारात वापरण्यात येणाऱ्या ट्रकपर्यंतच्या खर्चाचा हिशोब दरपत्रकाप्रमाणे द्यावा लागणार आहे. ढोल वादन पथक, पोवाडे, पथनाटय़ पथकाचे मानधन निश्चित करण्यात आले आहे. पोवाडा पथकाला व पथनाटय पथकाला ५ हजार रु पयांपर्यंत द्यावे लागणार आहेत.