दादर ते त्रिवेंद्रम एक्स्प्रेसने रेल्वेने प्रवास करीत असताना एका प्रवाशाची पाच लाख १५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असलेली पिशवी लंपास केली. ही घटना पहाटे ३.१५ वाजण्याच्या सुमारास पुणे ते सोलापूर दरम्यान घडली. याबाबत कुर्डूवाडी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

दादर ते सेलम दरम्यान रेल्वे प्रवास करताना कन्नन देवेंद्र (रा. वरळी, मुंबई) यांनी यासंदर्भात दिलेल्या फिर्यादीनुसार ते पत्नीसह मुलगा आणि सून यांच्यासह पाच पिशव्या घेऊन त्रिवेंद्रम एक्स्प्रेसने दादर ते सेलम असा प्रवास करीत होते.

फिर्यादीच्या सुनेकडे असलेल्या दोन सोन्याचे नेकलेस व दोन कर्णफुले एका ट्राली बॅगेत ठेवली होती. ती ट्रॉली बॅग बर्थखाली ठेवून झोपून प्रवास सुरू केला होता. दरम्यान, पहाटे ३.२५ च्या सुमारास पुणे ते सोलापूर दरम्यान रेल्वे धावत असताना फिर्यादीच्या पत्नीलाही झोप लागली. तेव्हा ट्रॉली बॅग गायब झाल्याचे दिसून आले.