कराड : मराठा आरक्षणप्रश्नी सत्ता गेल्यानंतर शहाणपण दाखवण्यात काही तथ्य नसल्याचा टोला राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना लगावला. छगन भुजबळ यांनी राईचा पर्वत करत मुक्ताफळे उधळू नयेत असा सल्ला त्यांनी मंत्री भुजबळांना दिला. कराडमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते. राज्यात आमचे सरकार असते, तर मराठा समाजाला दिलेले आरक्षण पुढे कायम राहिले असते, या पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर वक्तव्यावर बोलताना मंत्री विखे-पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील काँग्रेसच्या दुर्दैवी वाताहतीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे जबाबदार आहेत. त्यांच्यामुळेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेतून गेले. पृथ्वीराज चव्हाण यांनीच त्यावेळी आघाडीचे सरकार घालवण्याचे काम केले. आता त्यांनी सत्ता गेल्यानंतर शहाणपण दाखवणे, यात काही तथ्य नाही अशी टीका मंत्री विखे पाटील यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “२०१४ साली सरकार घालवण्याचं काम पृथ्वीराज चव्हाणांनी केलं, सत्ता गेल्यावर…”, विखे-पाटलांची टीका

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करत आहे. परंतु, छगन भुजबळ राईचा पर्वत करत आहेत. ते ज्येष्ठ नेते असून आरक्षणावरून अशा प्रकारची वक्तव्ये करणे दुर्देव आहे. त्यांनी आपली मुक्तातफळे उधळणे थांबवावे. मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर आहे. याबाबत कोणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नाही. याबाबत मनोज जरांगे-पाटील यांनाही आम्ही लेखी स्वरूपात आश्वासन दिले आहे. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी हा त्यांचा अधिकर आहे. या मागणी संदर्भात राज्य सरकार सकारात्क विचार करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचे मान्य केलेले आहे. परंतु, भुजबळ विनाकरण राईचा पर्वत का करत आहेत? माहिती नाही. मात्र, त्यांनी मुक्तफळे उधळणे थांबवावे असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

हेही वाचा : जालन्यातील सभेत १४८ जेसीबी असणार, हे शक्तीप्रदर्शन कशासाठी? मनोज जरांगे स्पष्टच म्हणाले…

राज्यात ३० टक्के दुधात भेसळ

दुध दराच्या आंदोलनाबाबत विचारले असता मंत्री विखे-पाटील म्हणाले, दूधाला प्रति लिटर किमान ३४ रुपये दर दिला पाहिजे. तर काही दूध संघ सरकारचा आदेश पाळत नसल्याच्या तक्रारी आहेत. महाराष्ट्रात सध्या ३० टक्के दुधात भेसळ आहे. हे तात्काळ थांबवणे गरजेचे आहे. दुधदराबाबत खासगी दुध संघ ऐकणार नसतील, तर त्यांचे परवाने रद्द करावे लागतील असा इशारा त्यांनी या वेळी दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In karad bjp radhakrishna vikhe patil criticises prithviraj chavan on maratha reservation issue css
First published on: 29-11-2023 at 13:33 IST