कोल्हापूर : महापालिकेच्या परिवहन सेवेसाठी १०० वातानुकूलित बसेस मिळण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. हा निधी वेळेत मिळाला नाही तर काँग्रेसच्या आमदारांच्या वतीने आणखी ९ वातानुकूलित बसेस दिल्या जातील, असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, आमदार सतेज पाटील यांनी केले.
कोल्हापूर महापालिकेच्या परिवहन सेवेसाठी (केएमटी) काँग्रेसच्या तीन आमदारांनी ९ वातानुकूलित बसेस आपल्या निधीतून दिल्या आहेत. वाहनांचा हा ताफा केएमटीच्या सेवेत दाखल झाला असल्याने गणेश उत्सवात प्रवाशांना वातानुकूलित सेवेची भेट मिळाली आहे. या निमित्त आयोजित कार्यक्रमात सतेज पाटील,ऋतुराज पाटील, जयश्री जाधव या निधी दिलेल्या आमदारांनी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत वाहनांची प्रतीकात्मक चावी महापालिकेच्या आयुक्त के. मंजू लक्ष्मी यांच्याकडे सुपूर्द केली.




हेही वाचा : आमंत्रण नसताना बिबट्या पार्टीला; पोरांची मात्र पळता भुई थोडी
‘त्या पंक्तीत’ कोल्हापूर
मुंबई, पुणे, नागपूर या महानगराच्या पंक्तीप्रमाणे कोल्हापुरातील प्रवाशांनाही वातानुकूलित बस सेवा मिळत असल्याचा आनंद होत असल्याचा उल्लेख करून सतेज पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील विकासात्मक कामे, महालक्ष्मी विकास आराखडा याबाबतची माहिती जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना दिली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
हेही वाचा : “पडळकरांसारखी चिल्लर व्यक्ती अजित पवारांना लांडगा म्हणत असेल, तर…”, काँग्रेस नेत्याचं विधान
प्रवाशांना वातानुकूलित दिलासा
कोल्हापूर महापालिकेच्या सेवेत ८९ बसेस होत्या. त्यापैकी १५ वर्षांपेक्षा अधिक काळ वापर झालेल्या ३९ बसेस बंद करण्यात आल्या आहेत. परिणामी अपुऱ्या व सेवेमुळे केएमटीची प्रवासी सेवा विस्कळीत होत असून तक्रारी वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर वातानुकूलित बसेस सेवेत आल्याने प्रवाशांना वातानुकूलित दिलासा मिळाला आहे.