पालघर : विकसित भारत संकल्प यात्री अंतर्गत पालघर जिल्ह्यात अनेक उपक्रम राबविले जात असून त्यामध्ये ड्रोनच्या मदतीने अल्पावधीत युरियाची फवारणी करण्याचे प्रात्यक्षिक गावोगावी दर्शवले जात आहे. केंद्र शासनाच्या विविध योजनांपासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना शोधून त्यांना योजनांमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी पालघर जिल्हा विकसित भारत संकल्प यात्रा १५ नोव्हेंबर पासून २६ जानेवारी २०२४ पर्यंत राबवली जात आहे. या ७१ दिवसांच्या यात्रेमध्ये चार विशेष वाहनांद्वारे केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती जिल्ह्यातील गावागावांमध्ये पोहोचवली जात आहे.

याच योजनेअंतर्गत राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड या कंपनीद्वारे कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर करून खत फवारणी करण्याचे तंत्र नागरिकांपर्यंत पोहोचवले जात आहे. यासाठी जिल्ह्यात चार ड्रोन व त्यासाठी ड्रोन पायलटची व्यवस्था करण्यात आली असून त्यांच्यामार्फत शेतकऱ्यांना व नागरिकांना प्रात्यक्षिक दाखवून कृषी क्षेत्रातील प्रगती बाबतची माहिती दिली जात आहे.

हेही वाचा : “मराठा अभिमानापेक्षा कुणबी शब्द धारण करून आरक्षण घ्या”, मनोज जरांगेंचं आवाहन

एक एकर क्षेत्रफळावर युरिया फवारणीसाठी दोन मनुष्य दिवसांची आवश्यकता असताना १० लिटर क्षमतेच्या ड्रोन द्वारे ही फवारणी अवघ्या सहा मिनिटांत होते. तसेच याद्वारे खताची अनावश्यक मात्रा टाळणे शक्य आहे. शेतकऱ्यांसाठी हे आधुनिक तंत्र भात शेती तसेच इतर रब्बी पिकांसाठी किफायतशीर असल्याचे शेतकऱ्यांच्या मनावर बिंबवले जात आहे. या संदर्भात धनसार, शिरगाव, माहीम, केळवे, दांडाखटाळी, सातपाटी इत्यादी गावांमध्ये या संदर्भात प्रात्यक्षिक दाखवण्यात आले असून या उपक्रमाला स्थानिक पातळीवर उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा : मराठा आरक्षणाला सर्वपक्षीय पाठिंब्याची गरज – मनोज जरांगे पाटील

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यपाल यांचा डहाणू येथे कार्यक्रम

विकसित भारत संकल्प यात्रा अंतर्गत महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस हे उद्या (सोमवारी) डहाणू येथे विशेष कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होणारा हा कार्यक्रम अडीच तास सुरू राहणार असून याप्रसंगी पालकमंत्री रवींद्र चव्हाण व इतर मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत.