अलिबाग : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कुणबी नोंदी शोधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी जिल्हा पातळी आणि तालका पातळीवर स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हे काम अंतिम टप्‍प्‍यात असून जिल्ह्यात आतापर्यंत ८० हजारांच्‍यावर कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. यातील बहुतांश दक्षिण रायगडात आहेत. यातील काही अभिलेखांची तपासणी करण्‍यासाठी भाषातज्ञांची मदत घेतली जाणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्‍या आंदोलनानंतर कुणबी नोंदी शोधण्‍याचे काम शासनाने सुरू केले आहे. मराठा आरक्षणासंदर्भात कागदोपत्री पुरावे शोधण्याची मोहीम सध्या शासनस्तरावर घेण्यात आली आहे. यासाठी जिल्हास्तरावर एका विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली असून, दहा जणांचे एक पथक ही माहिती संकलीत करण्याचे काम करत आहेत. तर जिल्ह्यातील १५ तालुक्यात तालुका स्तरीय पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. शासनस्तरावरील कागदपत्रांची पडताळणी करून कुणबी नोंदी तपासण्याचे काम जोमाने सुरू आहे.

हेही वाचा : राज्यातील आशा स्वंयसेविका आणि गटप्रवर्तक १२ जानेवारीपासून पुकारणार राज्यव्यापी बेमुदत संप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आजपर्यंत लाखो अभिलेख तपासण्यात आले आहेत. ज्यात ८० हजार अभिलेखांवर कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत.या प्रामुख्‍याने शाळा आणि गाव नमुना १४, जन्‍ममृत्‍यू दाखले तसेच खरेदी विक्री कार्यालयातील नोंदींचा समावेश आहे. यातील बहुतांश कुणबी नोंदी या दक्षि ण रायगडमधील माणगाव, रोहा, श्रीवर्धन, म्‍हसळा, महाड तलुक्‍यात आळळून आल्‍या आहेत. बरेचसे दस्‍तऐवज हे मोडी लिपी आणि ऊर्दू भाषेतील आहेत. ते वाचणारी माणसे कमी असल्‍याने त्‍यांचा नेमका अर्थ लागत नाही. ही बाब लक्षात घेवून या दस्‍तऐवजातील मजकूराचा नेमका अर्थ समजून घेण्‍यासाठी भाषातज्ञांना पाचारण करण्‍यात आले असून हे भाषातज्ञ पुण्‍याच्‍या गोखले इन्‍स्‍टीट्यूटकडून प्रमाणीत केलेले आहेत, अशी माहिती सामान्‍य प्रशासन विभागाचे उमाकांत कडनोर यांनी दिली.