सांगली : एका समृद्धी महामार्गामुळे एका आमदाराचा दर ५० कोटी निघाला आणि ४० आमदार विकले गेले. शक्तिपीठ महामार्ग तर ८७ हजार कोटींचा आहे, नंतर आमदाराचे दर किती निघतील? त्यामुळे भविष्यामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचं असेल तर असा एखादा रस्त्याचा प्रकल्प करा, तुम्ही आपोआप मुख्यमंत्री व्हाल अशी परिस्थिती आहे, असे म्हणत शक्तिपीठ महामार्गला राजू शेट्टी यांनी विरोध दर्शवला आहे.

हेही वाचा : बारामती लोकसभेबाबत विजय शिवतारेंची मोठी घोषणा, म्हणाले, “१२ तारखेला १२ वाजता…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजू शेट्टी म्हणाले, “मी महिनाभरात निवडणूकीच्या कामातून रिकामा झालो की या शक्तिपीठ महामार्गासाठी जमिनी घेणाऱ्यांना जाब विचारायला रस्त्यावर उतरणार आहे.” सांगली जिल्ह्यातुन जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गासाठी शेती जाणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी देण्यास विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित सांगलीत एका शेतकरी मेळाव्यात राजू शेट्टी बोलत होते. काहीही झाले तरी या महामार्गासाठी एक इंच जमीन शेतकऱ्यांनी द्यायची नाही. या पुढाऱ्यांच्या राजकारणासाठी शेतकऱ्यांनी जमिनी आतापर्यंत सांभाळल्या नाहीत. पैसे उद्योगपती घालणार आणि जमीन शेतकऱ्याची जाणार आणि पैसे वसूल करायला हे राजकारणी रस्त्यावर टोल वसूल करणार. यापेक्षा टोलमध्ये शेतकऱ्यांना हिस्सा द्या. शेतकरी ऊसाची शेती करण्याऐवजी रस्त्याची शेती करतील, असेही शेट्टी म्हणाले.