सोलापूर : गावापर्यंत लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसलेल्या महिलेने एका पिग्मी एजंटला नेल्यावर आपल्या साथीदारांच्या मदतीने त्यास पूर्ण नग्न करून बेदम मारहाण केली आणि २५ हजारांची रोकड लुटून पुन्हा रस्त्यावर सोडून दिल्याची घटना मोहोळ तालुक्यात घडली. दरम्यान, या गुन्ह्याची नोंद होताच मोहोळ पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून दोन महिलांना अटक केली. अन्य चौघांचा शोध घेतला जात आहे. सोनाप्पा आप्पा गौडदाब (वय ३४, रा. सोहाळे, ता. मोहोळ) असे लुटमार झालेल्या पिग्मी एजंटाचे नाव आहे. याप्रकरणी सोनाली निशांत शिंदे (वय २२) आणि जयश्री बंडू पवार (वय ३०, रा. ढोक बाभूळगाव, ता. मोहोळ) या दोघींना अटक झाली असून त्यांच्या अन्य दोन महिला आणि दोन पुरूष साथीदारांचा शोध घेतला जात आहे.

सोनाप्पा गौडदाब हे एका पतसंस्थेत पिग्मी एजंट म्हणून काम करतात. याशिवाय मोबाईलच्या सुट्या साहित्याचीही विक्री करतात. दुपारी मोहोळ येथून मोबाईल साहित्याची ठोक खरेदी करून आणि जमा झालेली पिग्मीची रक्कम इंचगाव येथील पतसंस्थेत भरण्यासाठी दुपारी दुचाकीने निघाले होते. वाटेत शेज बाभूळगावच्या अलिकडे रणरणत्या उन्हात थांबलेल्या एका महिलेने हाताने इशारा करून गौडदाब यांना थांबविले आणि शेज बाभूळगावात घरापर्यंत सोडण्याची विनंती केली. माणुसकीपोटी त्यांनी त्या महिलेला दुचाकीवर बसवून तिच्या गावात घरासमोर नेऊन सोडले.

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Vanchit Bahujan Aghadi Changes Lok Sabha Candidates in maharashtra ahead of lok sabha 2024 Election
‘वंचित’ चा फेरबदल कोणाच्या फायद्याचा? कोणाच्या सांगण्यावरून?
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच

हेही वाचा : “मनोहर जोशींचं घर जाळण्यासाठी…”, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; म्हणाले, “पंतांना भर सभेत…”

दुचाकीवरून ती महिला घरात गेली आणि लगेचच घरातून बाहेर आलेल्या दोन तरूणांनी दुचाकीस्वार गौडदाब यांना पकडून घरात नेले. त्यांचे दोन्ही हात पाठीमागून पकडून पैसे काढ, फोन पे नंबर दे म्हणून मारहाण करू लागले. त्यावेळी दुचाकीवर लिफ्ट मागणाऱ्या महिलेने अन्य तीन महिलांना हाक मारून बोलावले. या सर्वांनी गौडदाब यांचे अंगावरील कपडे काढून पूर्ण नग्न केले आणि त्यांना बेदम मारहाण केली. बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्यांच्याजवळील २५ हजारांची रोकड बळजबरीने लुटली. नंतर त्यांना तशाच अवस्थेत काही अंतरावर एका पेट्रोल पंपाजवळ अर्धवट बेशुध्दावस्थेत नेऊन सोडले. काही लोकांनी त्यांना ओळखले. रणरणत्या उन्हात महिलेला माणुसकीच्या भावनेतून लिफ्ट देण्याची किंमत स्वतःला पूर्ण नग्न करून घेण्यापर्यंत जाऊ शकते, हे या घटनेवरून दिसून आले.