“आमच्या सर्वांची भूमिका राज्यपालांना समर्थन करणारी नाही, पण...”; चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान! | It is not our role to support the Governor Chandrasekhar Bawankule msr 87 | Loksatta

“आमच्या सर्वांची भूमिका राज्यपालांना समर्थन करणारी नाही, पण…”; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान!

“राज्यपालांनी महाराष्ट्रात अनेक वर्षे छत्रपती शिवरायांची प्रेरणा घेऊनच काम केलं”, असंही बावनकुळेंनी म्हटलं आहे.

“आमच्या सर्वांची भूमिका राज्यपालांना समर्थन करणारी नाही, पण…”; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान!
(लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदींनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण अद्यापही तापलेलं आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून या भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका सुरू आहे. दरम्यान भाजपा खासदार उदयनराजे यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय आज प्रतापगडावरील कार्यक्रमासही ते अनुपस्थित आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी भाजपाची भूमिका स्पष्ट केली आहे.

राज्यपालांना समर्थन करण्याची आमची भूमिका नाही, असं विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी केलं आहे. राज्यपाल हे घटनात्मक पद असल्याचंही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा – “अशा मुख्यमंत्र्यांना गडावर जाऊन…”; संजय राऊतांचं विधान!

या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, चंद्रशेख बावनकुळे म्हणाले, “माझं असं म्हणणं आहे की उदयनराजेंची भूमिका आणि आमच्या सर्वांची भूमिका राज्यपालांना समर्थन करणारी नाही. पण राज्यपाल हे संविधानिक पद आहे. त्यांना परत घेणे किंवा ठेवणे हा आमचा अधिकार नाही. मी यापूर्वीच बोललो आहे, राज्यपालांनी महाराष्ट्रात अनेक वर्षे काम केलं, छत्रपती शिवरायांची प्रेरणा घेऊनच काम केलं आहे. त्या दिवशी त्यांची चूक झाली आहे. खरंतर त्यांना परत बोलवणे किंवा ठेवणे हा अधिकार आपला नाही. तो खरंतर ज्यांचा अधिकार आहे ते निर्णय घेतील.”

हेही वाचा – “उदयनराजे भोसले यांचे अश्रू आम्ही पाहीले आहेत, ते …”; संजय राऊतांची प्रतिक्रिया

शिवप्रताप दिनाच्या निमित्त आज किल्ले प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अनेक मंत्री पोहचले आहेत. या निमित्त गडावर अनेक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 13:04 IST
Next Story
गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी लवकरच ‘दुर्ग प्राधिकरणा’ची स्थापना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा!