लोकसभा निवडणूक २०२४ साठी भाजपाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. भाजपाप्रणित एनडीएने महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी ४५ जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. यासाठी भाजपाने एक योजना बनवली आहे. या योजनेनुसार भाजपा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री आणि आमदारांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची तयारी करत असल्याचं बोललं जात आहे. महाराष्ट्रातील सात आजी-माजी आमदारांना भाजपा लोकसभेचं तिकीट देण्याची शक्यता आहे. तर काही खासदारांचं तिकीट कापलं जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

भारतीय जनता पार्टी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे या नेत्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवू शकते.

दरम्यान, यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाटील म्हणाले, महाराष्ट्रात जे नेते नको आहेत त्यांना दिल्लीत पाठवायची भाजपाची प्रथा आहे. हा त्याचाच एक भाग असू शकतो. त्याच्यापलिकडे या योजनेला फार काही महत्त्व आहे असं काहीच नाही.

हे ही वाचा >> मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांपाठोपाठ विधानसभा अध्यक्षांचा परदेश दौरा रद्द, कारण काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकीकडे मध्य प्रदेशची विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भारतीय जनता पार्टीने तीन केंद्रीय मंत्री आणि चार खासदारांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भारतीय जनता पार्टीने राज्यातले मंत्री आणि आमदार लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची योजना बनवली आहे.