scorecardresearch

Premium

“महाराष्ट्रात नको असलेल्या नेत्यांना…”, लोकसभा निवडणुकीच्या भाजपाच्या योजनेवरून जयंत पाटलांचा टोला

भाजपाकडून लोकसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू असून पक्षश्रेष्ठी राज्यातील अनेक मंत्री आणि आमदारांना लोकसभेच्या रिंगणात उतरवू शकतात.

Jayant Patil
भाजपाच्या लोकसभा निवडणुकीच्या कथित योजनेवर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

लोकसभा निवडणूक २०२४ साठी भाजपाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. भाजपाप्रणित एनडीएने महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी ४५ जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. यासाठी भाजपाने एक योजना बनवली आहे. या योजनेनुसार भाजपा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री आणि आमदारांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची तयारी करत असल्याचं बोललं जात आहे. महाराष्ट्रातील सात आजी-माजी आमदारांना भाजपा लोकसभेचं तिकीट देण्याची शक्यता आहे. तर काही खासदारांचं तिकीट कापलं जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

भारतीय जनता पार्टी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे या नेत्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवू शकते.

maval lok sabha seat
पिंपरी : मावळच्या जागेवरून महायुतीत पेच? राष्ट्रवादीच्या आमदारांनंतर आता ‘या’ बड्या नेत्याचाही मावळवर दावा
Ajit Pawar news
भाजपच्या मतदारसंघात अजित पवारांची बांधणी, सतीश चव्हाणांना बळ देण्यावर भर
narayan rane likely to contest lok sabha poll from ratnagiri sindhudurg lok sabha constituency
रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लोकसभेच्या रिंगणात; किरण सामंतांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह
Congress leader, former chief minister, Ashok Chavan, nanded
Ashok Chavan : निष्ठावंत काँग्रेसजनांनी ‘ हात ‘ सोडला

दरम्यान, यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाटील म्हणाले, महाराष्ट्रात जे नेते नको आहेत त्यांना दिल्लीत पाठवायची भाजपाची प्रथा आहे. हा त्याचाच एक भाग असू शकतो. त्याच्यापलिकडे या योजनेला फार काही महत्त्व आहे असं काहीच नाही.

हे ही वाचा >> मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांपाठोपाठ विधानसभा अध्यक्षांचा परदेश दौरा रद्द, कारण काय?

एकीकडे मध्य प्रदेशची विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भारतीय जनता पार्टीने तीन केंद्रीय मंत्री आणि चार खासदारांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भारतीय जनता पार्टीने राज्यातले मंत्री आणि आमदार लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची योजना बनवली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jayant patil says bjp sends those leaders to lok sabha which they dont want in maharashtra asc

First published on: 30-09-2023 at 15:44 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×