कराड : कराड पंचायत समितीच्या क्षेत्रात बऱ्याच शाळा परवानगीविना सुरू आहेत. तेथे केजीपासून ते बारावीपर्यंत प्रवेश दिला जातोय. पण, पुरेशा वर्गखोल्या, नियमानुसार इमारत, मुलांना खेळाचे मैदान, पात्रताधारक शिक्षक, प्रयोगशाळा, वाचनालय, शौचालय यांचा अभाव असलेल्या या शाळांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक भोसले यांनी केली आहे.

शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांच्याकडे ही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आमच्या मागणीनुसार, अनधिकृत शाळांवर कारवाई न झाल्यास बेमुदत उपोषण छेडण्यात येईल, असा इशारा विनायक भोसले यांनी या वेळी दिला.

निवेदनात म्हटले आहे, की पालकांना कमी फीमध्ये इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देऊन फसवणूक केली जात आहे. अशा शाळांना शासन मंजुरी कशी देते, कसलाही पाठपुरावा न करता शाळा राजरोसपणे कशा काय सुरू आहेत, त्या कोणाच्या आशीर्वादाने चालतात, त्यांवर कोणाचेच नियंत्रण नाही का, असे प्रश्न निवेदनात उपस्थित करण्यात आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, येत्या सहा दिवसांत त्या अनधिकृत शाळांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्याचे भोसले यांनी सांगितले.