दापोली तालुक्यीतल मुरुड येथे समुद्रकिनारी असलेलं अनिल परब यांचं साई रिसॉर्ट पाडण्याची घोषणा करत किरीट सोमय्या भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांसह दापोलीत दाखल झाले आहेत. यावेळी किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टिका केली. कार्यकर्त्यासोबत संवाद साधताना सोमय्यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर सीबीआय, ईडी, आयकर या संस्थांचा गैरवापर केल्याचा आरोप केलाय. तसेच या संस्था स्वतंत्र असल्याचा दावा करतात मग कोणावर धाड पडणार हे ४-५ दिवस आधी ट्विटरवर कसं समजतं? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे. याबाबत तारखेनुसार पुरावे सादर करू शकते, असंही सुप्रिया सुळेंनी नमूद केलं. त्या लोकसभेत केंद्रीय तपास संस्थांच्या कारभारासह महागाईवर बोलताना याबाबत भाष्य केले.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

“तुम्ही म्हणता सीबीआय, ईडी, आयकर या स्वतंत्र तपास संस्था आहेत. या तपास संस्था स्वतंत्र आहेत तर मग आम्हाला ट्विटरवर कोणावर धाड पडणार हे ४-५ दिवस आधीच कसं समजतं? एखादा नेता १५ दिवसात तुरुंगात जाणार असं बोलणारे नेते भविष्य सांगणारे आहेत का? कोण आहेत ते, त्यांना कोणावर छापा पडणार हे कसं माहिती होतं?” असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला.

“हे सर्व ट्विटरवर येतं. मी याबाबत तारखेनुसार पुरावे सादर करू शकते. याचे दोनच अर्थ निघतात. तुम्ही एकतर मान्य करा की ईडी, सीबीआय या सर्व तपास संस्था सत्तेत असलेल्या लोकांकडून चालवल्या जातात. खरं बोला, अमित शाह खरं बोलतात. मला वाटतं मी फक्त त्यांनाच याबाबत विचारायला हवं. सरकारमध्ये इतर कोण खरं बोलतं याबाबत माहिती नाही. अमित शाह तर नक्की खरं बोलतात,” असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी भाजपाला टोला लगावला.

“जर एक पेपर लिक झाला तर मोठी चौकशी केली जाते. त्या अधिकाऱ्याला तुरुंगात टाकलं जातं. आता जेव्हा तुमचे २ कार्यकर्ते छापे कधी मारणार, तुरुंगात कधी टाकणार याची सर्व माहिती आहे. मी हे सिद्ध करू शकते. तुम्हाला कोणीही विचारणार नाही का? मी मोदी सरकारकडे न्याय मागत आहे,” असे सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत म्हटले. त्यावर आता किरीट सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सुप्रिया सुळे किरीट सोमय्यांना कसं कळतं कारवाई होणार असं म्हणतात. सुप्रीयाताई आजच सांगतो पुढच्या आठवड्यात तिघांवर कारवाई होणार आहे. किरीट सोमय्याच्या आधी ज्यांनी घोटाळे केले आहेत त्यांना आधीच कळायला पाहिजे. पुढच्या आठवड्यात तिघांचे घोटाळे मार्गी लागणार आहेत, असे किरीट सोमय्या म्हणाले.