महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात महायुतीला पाठिंबा दिला आहे. लोकसभा, राज्यसभा विधान परिषद काहीही नको. फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत, त्यांच्यासारखं कणखर नेतृत्व देशाला पुन्हा मिळावं म्हणून मी पाठिंबा जाहीर करतो आहे असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. त्यानंतर महायुतीतल्या नेत्यांनी त्यांचे आभार मानले आहेत. तर ठाकरे गटाने टीका केली आहे. दुसरीकडे त्यांच्याच पक्षातले नेते कीर्तिकुमार शिंदे यांनी मनसेला अलविदा केला आहे. एक भली मोठी फेसबुक पोस्ट करत त्यांनी भूमिका मांडली आहे.

काय आहे किर्तीकुमार शिंदेंची पोस्ट?

अलविदा मनसे!

salman khan
आनंद दिघे यांच्याकडून हिंदुत्वाचे नाही तर संपूर्ण समाजाचे रक्षण- एकनाथ शिंदे
arvind kejriwal low calorie diet allegation by delhi lg
Arvind Kejriwal : “अरविंद केजरीवाल जाणीवपूर्वक…”, तुरुंगातील आहारावरून नायब राज्यपाल वी.के. सक्सेना यांचा गंभीर आरोप!
what sanjay Raut Said About Shankaracharya ?
“शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना आशीर्वाद दिला म्हणून…”, संजय राऊत यांचं वक्तव्य
What Suresh Wadkar Said About Anand Dighe?
सुरेश वाडकर यांचं वक्तव्य, “आनंद दिघेंना पाहिलं की भीती वाटायची, पण..”
IAS Pooja Khedkar Mother Manorama Khedkar Gun Video
Manorama Khedkar Video : “…म्हणून मनोरमा खेडकर यांनी पिस्तुल काढले”, पूजा खेडकरंच्या वडिलांनी सांगितले धक्कादायक कारण
actor dilip prabhavalkar remembered letter written by dr shriram lagoo
दिलीप प्रभावळकरांची खास पत्राची आठवण; ‘पत्रा पत्री’ अभिवाचनाचे जोरदार प्रयोग
sunita Deshpande
आपुलकीचं नातं
Pravin Kumar Mohre protest
मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात खळबळ, झाडावर चढून चित्रपट निर्मात्याचं आंदोलन

“महाराष्ट्र नवनिर्माण सेना ‘भाजप- शिवसेना- राष्ट्रवादी’च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे. आम्हाला राज्यसभा नको, विधानपरिषद नको, बाकीच्या वाटाघाटी नको. हा पाठिंबा फक्त नि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे…” अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात या शब्दांत आपली भूमिका मांडली आणि त्यांच्या राजकीय भूमिकांचं एक ‘अनाकलनीय’ वर्तुळ पूर्ण झालं.

लाव रे तो व्हिडीओ च्या सभांना उपस्थित होतो

पाच वर्षांपूर्वी २०१९ लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत राजसाहेब ठाकरे यांनी भाजप- मोदी- शाहविरोधात रणशिंग फुंकलं होतं तो माझ्यासाठी (राजकीय पातळीवर) अत्यंत महत्त्वाचा काळ होता. त्या दिवसांत त्यांनी घेतलेल्या सर्व जाहीर- ‘लाव रे तो व्हिडिओ’ सभांना मी उपस्थित होतो आणि सभांमध्ये ते जे भाजप- मोदी- शाह यांच्या विरोधात जे तथ्य- विचार मांडत होते त्यांबद्दल सविस्तर लेख लिहून त्यांची भूमिका अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होतो.

पाच वर्षांनी निर्णायक क्षणी राज ठाकरेंनी भूमिका बदलली

आज ५ वर्षांनी देशाच्या इतिहासातील अत्यंत निर्णायक क्षणी राजसाहेबांनी त्यांची राजकीय भूमिका बदलली आहे. ती किती चूक, किती बरोबर, हे राजकीय विश्लेषक सांगतीलच. सध्याच्या काळात राजकीय नेते त्यांना हवे तेव्हा त्यांना हवी ती राजकीय भूमिका घेऊ शकतात. पण त्यांच्या विचारांवर विश्वास ठेवून लढणाऱ्यांची कुचंबणा होते. त्याचं काय?

हे पण वाचा- “राज ठाकरेंनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला, कोल्ह्याला द्राक्षं आंबट”, म्हणत शिवसेना उबाठा नेत्यांची बोचरी टीका

‘भामोशा’ने देशाचं वाटोळं केलं

गेल्या १० वर्षांत, त्यातही विशेष करून मागच्या ५ वर्षांत ‘भामोशा’ने देशाचं अक्षरशः वाटोळं केलं आहे. पारदर्शक कारभाराचा दावा करत सत्तेवर येऊन ‘भामोशा’ अपारदर्शक हुकूमशाहीने दडपशाही करत आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांच्या चौकशांचा ससेमिरा पाठीमागे लावून भाजपेतर राजकीय पक्षांच्या नेत्यांना आणि त्यांच्या निकटवर्तीयांना गजाआड पाठवण्याची भीती दाखवून वॉशिंग मशीनमध्ये घालून त्यांचे शुद्धीकरण करून त्यांचे ‘भामोशा’मध्ये सक्तीने पक्षांतर करवून घेतले जात आहे. ‘भामोशा’चे विचार ज्यांना पटतात ते राष्ट्रप्रेमी किंवा हिंदू, आणि ‘भामोशा’च्या विरोधात आहेत ते राष्ट्रद्रोही किंवा अहिंदू! या नव्या समीकरणामुळे जातपातधर्माच्या नावाखाली माणसाला माणसापासून तोडण्याचे काम सुरू आहे. अत्यंत नम्रपणे सांगतो की, प्रबोधनकारांची अनुपलब्ध पुस्तके प्रकाशित करून त्यांचा वैचारिक वारसा जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या माझ्यासारख्याला ‘भामोशा’चं असलं राष्ट्रीयत्व- ‘हिंदुत्व’ मान्यच होऊ शकत नाही.

राज ठाकरेंनी बाजू घेणं स्वतःच्या गरजेसाठी असू शकतं

राजसाहेब ठाकरे यांनी ‘भामोशा’ची बाजू घेणं हे त्यांच्या स्वतःसाठी गरजेचं असू शकतं, पण त्यातून महाराष्ट्राचा- मराठी माणसाचा कोणताही लाभ होण्याची सुतराम शक्यता नाही. त्यांची ही भूमिका सत्तेच्या राजकारणात, मनसेचे आणि स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी योग्य असू शकेल, पण त्यांनी घेतलेली बाजू सत्याची नाही. खरं तर असे अनेक मुद्दे राजसाहेबांशी भेटून बोलायचे होते. पण ते शक्य नाही! त्यामुळे हा प्रवास इथेच थांबवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीसपदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा आज मी राजीनामा देत आहे.
एक गोष्ट इथे आवर्जून नमूद करतो. राजसाहेब ठाकरे, अमित ठाकरे आणि मनसेचे सर्व पदाधिकारी-कार्यकर्ते यांनी मला नेहमीच प्रेमाने आणि उचित सन्मानाने वागवलं. त्यांच्यामुळे मला अनेक चांगल्या विषयांवर काम करता आलं. मनसे सोडण्याच्या माझ्या या भूमिकेचा- कृतीचा कुठल्यातरी उथळ गोष्टीशी बादरायण संबंध जोडून उठवळ राजकारणाचा धुरळा उडवण्याचा प्रयत्न केला जाणार नाही, ही अपेक्षा.
कीर्तिकुमार शिंदे

अशी पोस्ट करत कीर्तिकुमार शिंदे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. आता याबाबत राज ठाकरे काही बोलणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.