scorecardresearch

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात कोणत्या १८ नेत्यांना संधी? वाचा…

शिंदे गटातून नऊजण आणि भाजपातून नऊजण असे एकूण १८ मंत्री या मंत्रीमंडळ विस्तारात शपथ घेणार आहेत.

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात कोणत्या १८ नेत्यांना संधी? वाचा…
एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस

अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कुणाला संधी मिळाली आहे हे स्पष्ट झालं आहे. शिंदे गटातून नऊजण आणि भाजपातून नऊजण असे एकूण १८ मंत्री या मंत्रीमंडळ विस्तारात शपथ घेणार आहेत. भाजपाकडून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांसह अनेक ज्येष्ठ नेत्यांना संधी मिळाली आहे. दुसरीकडे शिंदे गटाकडून शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांसह नऊजणांना संधी मिळाली आहे.

मागील अनेक दिवसांपासून शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार याची चर्चा रंगली होती. विरोधी पक्षनेते अजित पवारांसह महाविकासआघाडीच्या अनेक नेत्यांनी रखडलेल्या मंत्रीमंडळ विस्तारावरून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली होती. दिल्लीतून मान्यता मिळाल्याशिवाय मंत्रीमंडळ विस्तार होणार नाही. त्यामुळेच दोघांच्याही दिल्ली वाऱ्या सुरू असल्याचा खोटक टोलाही लगावण्यात आला होता. मात्र, अखेर आज (९ ऑगस्ट) मंत्रीमंडळ विस्तार झाला.

भाजपातून मंत्रिमंडळात कुणाला संधी?

१. चंद्रकांत पाटील<br>२. गिरीश महाजन
३. सुधीर मुनगंटीवार
४. राधाकृष्ण विखे पाटील
५. मंगलप्रभात लोढा
६. सुरेश खाडे
७. रविंद्र चव्हाण
८. अतुल सावे
९. विजयकुमार गावित

शिंदे गटातून मंत्रिमंडळात कुणाला संधी?

१. दीपक केसरकर
२. दादा भुसे
३. उदय सामंत
४. संदीपान भुमरे
५. तानाजी सावंत
६. शंभुराजे देसाई
७. गुलाबराव पाटील
८. अब्दुल सत्तार
९. संजय राठोड

हेही वाचा : Maharashtra Cabinet Expansion Live: शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, शपथविधीला सुरुवात

मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळणार हे स्पष्ट झालं असलं तरी यातील कुणाला कॅबिनेट मंत्रीपद मिळतं आणि कोण राज्यमंत्री म्हणून शपथ घेतं हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या