सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील फोंडाघाटात भल्या पहाटे दरड कोसळली. त्यामुळे सिंधुदुर्ग-कोल्हापूर वाहतूक तब्बल पाच तास रोखली गेली. वाहनाच्या भल्या मोठय़ा रांगा लागल्या होत्या. दरड वेगाने बाजूला करत सकाळी १० वाजल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. फोंडाघाटात दरड कोसळल्याचे कळताच सार्वजनिक बांधकाम खात्याने धाव घेतली. शिवाय आपत्कालीन यंत्रणेला हाक देण्यात आली. तेथे मदतीसाठी वैभववाडीच्या तरुणांनी धाव घेतली.
हेल्प अकॅडमी फोंडाघाटच्या स्थळी धावली. या घाटातील वाहतूक ठप्प झाल्याने यंत्रणेतील तरुण धावले. त्यात राजेश चिके, संजय नेरूरकर, बाळा नानचे, पिंटू पटेल, संजय पावसकर हे तरुण होते. या दरडीतील मोठमोठे दगड बाजूला करून एकेरी वाहतूक प्रथम सुरू करण्यात आली. नंतर दरड बाजूला करण्यात आली.
दरड कोसळली पण त्यातून सुदैवाने कोणालाही धोका पोहचला नाही. भल्या पहाटेपासून कोल्हापूर ते सिंधुदुर्ग अशी वाहनांची वर्दळ असते, पण सुदैवाने सारे बचावले. मात्र सकाळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा खेळखंडोबा उडाला होता.फोंडाघाटात दरड कोसळल्याने वाहतूक करुळ व आंबोली घाटातून वळविण्यात आल्याचे सांगण्यात आले. गेला आठवडाभर येथे मुसळधार पाऊस कोसळत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 19th Jul 2014 रोजी प्रकाशित
सिंधुदुर्गातील फोंडाघाटात दरड कोसळली; वाहतूक पाच तास ठप्प!
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील फोंडाघाटात भल्या पहाटे दरड कोसळली. त्यामुळे सिंधुदुर्ग-कोल्हापूर वाहतूक तब्बल पाच तास रोखली गेली. वाहनाच्या भल्या मोठय़ा रांगा लागल्या होत्या.

First published on: 19-07-2014 at 02:23 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Landslide in phondaghat at sindhudurg traffic jam for five hours