वाई: सातारा जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असुन राज्याचे मिनी काश्मीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर आणि पाचगणी येथे तापमानाचा पारा घसरला आहे. आज सकाळी तापमानाचा एकदम कमी आला होता. तर वेण्णालेक परिसरात तापमान घसरले आहे.मागील काही दिवसांपासून महाबळेश्वर पाचगणीत दिवसरात्र थंडीचा अनुभव येत आहे.
यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यानंतर पहिल्यांदाच या महिन्यात थंडीत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. यामुळे ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी शेकोट्या पेटलेल्या पाहायला मिळत आहेत. सध्या महाबळेश्वर मध्ये पर्यटकांची शनिवार व रविवार सुट्टी असल्याने पर्यटकांची रेलचेल पाहायला मिळत आहे. सकाळ- सकाळी थंडीचा कडाका, दिवसभर निसर्गाचा आनंद व रात्री उशिरापर्यंत मार्केटमध्ये खरेदी- विक्री करण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने महाबळेश्वरमध्ये दाखल होत आहे.
हेही वाचा: राज्यभर अल्पावधीचा गारवा; तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता
महाबळेश्वर येथे अनेक पाॅंईट पाहण्यासाठी शनिवार, रविवार सुट्टीसाठी पुणे- मुंबईसह राज्यासह परराज्यातून पर्यंटक येतात. थंडीचा कडाका लागला असला तरी पर्यंटकांचे महाबळेश्वर हे लोकेशन नेहमीच आवडीचे ठिकाण राहिले आहे. थंडीची तीव्रता कमी करण्यासाठी साताऱ्यात ग्रामीण भागासह रात्रीच्या वेळी शेकोट्या पेटल्या आहेत.उबदार कपडे खरेदीकडे पर्यटक आणि लोकांचा ओढा वाढला आहे.महाबळेश्वर पाचगणी बाजारपेठेत खरेदीसाठी पर्यटक गर्दी करत आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाचगणी फेस्टिव्हल चे आयोजन करण्यात आले असून पर्यटक या फेस्टिव्हलची माहिती घेत आहेत.