Special Session of Maharashtra Assembly on Maratha Quota : मराठा आरक्षणाचा मुद्दा आता महाराष्ट्राच्या विधिमंडळात पोहोचला असून त्यासाठी एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मराठ्यांना देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा आज निकाली निघणार की आणखी तापणार? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी ‘सगेसोयरे’च्या मुद्द्यावर ठाम असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

dy chandrachud voting appeal
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचे मतदारांना मराठीतून आवाहन; म्हणाले, “या खेपेला…”
Lok Sabha Election 2024 Live Updates Maharashtra Politics News
Maharashtra News : “यंदाची निवडणूक शेवटची ठरू नये”, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता; म्हणाले, “ज्यांच्या हाती…”
nagpur court marathi news, local self government body marathi news
स्वराज्य संस्थांच्या फलकांवर मराठीसह इतर भाषेचा वापर चुकीचा नाही, उच्च न्यायालयाचे एका प्रकरणात मत
Important decision of the supreme court
उमेदवारांनी संपत्ती म्हणून घड्याळही जाहीर करावं का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल; मालमत्ता प्रकरणी दिला महत्त्वपूर्ण निकाल
Live Updates

Maratha Reservation Maharashtra Assembly Special Session Updates in Marathi: मराठा आरक्षणासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

19:35 (IST) 20 Feb 2024
मराठा आरक्षण विधेयक फसवे; मराठा समाज रस्त्यावर

सोलापूर : महायुती शासनाने राज्य विधिमंडळ अधिवेशनात मंजूर केलेले मराठा आरक्षण विधेयक फसवे असल्याचा आरोप करीत, सोलापुरात सकल मराठा समाजाने मंगळवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन केले. आंदोलकांनी गाजर दाखवून शासनाचा निषेध नोंदविला. दुसरीकडे विधिमंडळ अधिवेशनात मंजूर झालेले मराठा आरक्षण विधेयक अमान्य करीत, जिल्ह्यात माढा तालुक्यातील सीना दारफळ ते वैराग रस्त्यावर टायर जाळून चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

17:57 (IST) 20 Feb 2024
Maratha Reservation Update Today: शरद पवारांची मराठा आरक्षणावर पहिली प्रतिक्रिया...

आमचं सरकार असताना उच्च न्यायालयात यावर सुनावणी झाली. नंतर देवेंद्र फडणवीसांच्या काळात उच्च न्यायालयात आरक्षण टिकलं, पण सर्वोच्च न्यायालयानं नाकारलं. यावेळी तोच ड्राफ्ट आहे. जसाच्या तसा प्रस्ताव विधिमंडळानं मान्य केला आहे. याला सगळ्यांनी एकमतानं पाठिंबा दिला आहे. आता सर्वोच्च न्यायालयात काय होईल, यावरच त्याचं खरं भवितव्य आहे. त्यावर आज काहीही सांगता येणार नाही. यापूर्वीचे यासंदर्भातले कोर्टातले निकाल अनुकूल नाहीत - शरद पवार

17:52 (IST) 20 Feb 2024
मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याची घोषणा राजकीय;कोल्हापुरात सकल मराठा समाजाची टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याची घोषणा राजकीय आहे,अशी टीका कोल्हापुरात सकल मराठा समाजाने केली आहे. आयोगाने दिलेल्या आव्हानानुसार सकल मराठा समाज मागास जर ठरला असेल तर त्यांना ओबीसी आरक्षणांमधूनच आरक्षण मिळणे आवश्यक आहे. ओबीसी मधूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही प्रमुख मागणी मराठा समाजाने केली आहे.

17:11 (IST) 20 Feb 2024
Maratha Reservation Update Today:

अनारक्षित प्रवर्गातील व्यक्ती आरक्षित प्रवर्गात लग्न, दत्तक, धर्मांतर अशा कोणत्याही कारणाने गेला, तरी त्याला आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे - छगन भुजबळ

16:47 (IST) 20 Feb 2024
Maratha Reservation Special Session: २६ फेब्रुवारी ते १ मार्च अर्थसंकल्पीय अधिवेशन.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख ठरली. २६ फेब्रुवारी ते १ मार्च अर्थसंकल्पीय अधिवेशन.

16:41 (IST) 20 Feb 2024
Maratha Reservation Update Today: ... म्हणून चर्चेविनाच विधेयक मंजूर केलं - जितेंद्र आव्हाडांचं मराठा आरक्षणावर टीकास्र

मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आणि कायमस्वरूपी आरक्षण मिळावे, अशी आम्हा विरोधी पक्षात बसलेल्या सर्व सदस्यांची भूमिका आहे. परंतु, आज विपरीत घडले. विधिमंडळाच्या सभागृहात या कायद्याची सर्वंकष चर्चाच होऊ दिली नाही. या कायद्यातील उणिवा उघडकीस येऊ नयेत व यातील त्रुटी महाराष्ट्रासमोर येऊ नयेत, यासाठीच कोणालाही बोलू न देता हे विधेयक चर्चेविना पारीत करण्यात आले. इतका मोठा ऐतिहासिक निर्णय चर्चेविना पारित होणे , हे लोकशाहीच्या हिताचे नाही.

https://twitter.com/Awhadspeaks/status/1759897939395461295

16:35 (IST) 20 Feb 2024
मनोज जरांगेंच्या वक्तव्यांवरून छगन भुजबळ आक्रमक; म्हणाले, "छत्रपती..."

मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांत आरक्षण देणारे विधेयक आज (२० फेब्रुवारी) राज्य विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आले. हे विधेयक मंजूर करण्यासाठी राज्य सरकारने एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलावले होते. दरम्यान, या अधिवेशनात मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. जरांगे पाटील हे धमक्या देतात. त्यांनी मलादेखील धमकी दिली. त्यांना लगाम घालणार आहात की नाही, असा सवाल भुजबळ यांनी केला. वाचा सविस्तर

16:35 (IST) 20 Feb 2024
Maratha Reservation Special Session: देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

एकदा कायदा पारित झाल्यानंतर आता जेवढ्या जाहिराती निघतील, त्या सर्व ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण असेल - देवेंद्र फडणीस

16:34 (IST) 20 Feb 2024
Maratha Reservation Update Today: अजित पवारांना तातडीनं बाहेर जायचं होतं, त्यामुळे ते नव्हते - देवेंद्र फडणवीस

अजित पवारांना तातडीनं बाहेर जायचं होतं, त्यामुळे ते सभागृहात नव्हते - देवेंद्र फडणवीस

16:29 (IST) 20 Feb 2024
Maratha Reservation Special Session: फडणवीसांनी मानले विरोधकांचे आभार...

विरोधी पक्षाचेही मी आभार मानतो की त्यांनी सभागृहात या विधेयकाला पाठिंबा दिला - देवेंद्र फडणवीस

16:26 (IST) 20 Feb 2024
Maratha Reservation Update Today: देवेंद्र फडणवीसांची आरक्षणावर प्रतिक्रिया

दोन्ही सभागृहात मराठा आरक्षण विधेयक एकमतानं मान्य झालं आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मी मुख्यमंत्री असताना आपण मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. ते सर्वोच्च न्यायालयात रद्द झालं - देवेंद्र फडणवीस

16:24 (IST) 20 Feb 2024
Maratha Reservation Update Today: विधिमंडळाबाहेर जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी

विधिमंडळाच्या बाहेर गुलालाची उधळण, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचं मराठा समाजाकडून स्वागत, फटाके फोडून केला आरक्षण मंजूर झाल्याचा आनंद साजरा!

16:22 (IST) 20 Feb 2024
Maratha Reservation Live Updates Today: उद्धव ठाकरेंचा प्रसारमाध्यमांशी संवाद

उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल, माध्यमांशी साधला संवाद!

https://twitter.com/ShivSenaUBT_/status/1759889253289594951

15:57 (IST) 20 Feb 2024
Maharashtra Assembly Session Live Updates: आरक्षणावर रोहित पवारांचं सूचक ट्वीट!

मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर केल्याबद्दल सवर्पक्षीय आमदारांचे व सरकारचे आभार! मुख्यमंत्र्यांच्या भाषणातले ‘आरक्षण टिकवण्याचा प्रयत्न करुया’ हे शब्द मात्र यापूर्वीचा राजकीय अनुभव बघता भीतीदायक वाटतात! विधेयकाचा मसुदा वरकरणी पाहता त्यात अनेक त्रुटी दिसत असून २८% लोकसंख्या दाखवताना आरक्षण मात्र १० % देण्याचा निर्णय कुठल्या आधारावर झाला, हे स्पष्ट होत नाही. तसंच सर्वोच्च न्यायालयाने गायकवाड आयोगासंदर्भात नोंदवलेली निरीक्षणेही दुरुस्त केलेली दिसत नाहीत. एकदरीतच निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईत विधेयक आणण्याचा सरकारचा प्रयत्न सर्वसामान्यांची दिशाभूल करणारा ठरू नये. असो! हे विधेयक टिकवण्यासाठी सरकारसह सवर्पक्षीय नेते प्रामाणिक प्रयत्न करतील, हा विश्वास आणि अपेक्षा आहे! - रोहित पवार

https://twitter.com/RRPSpeaks/status/1759865943310905647

15:56 (IST) 20 Feb 2024
Maharashtra Assembly Session Live Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ट्वीट

छत्रपतींच्या आशीर्वादाने, संपूर्ण मराठा समाजासाठी, माझ्या लाखो मराठा बांधवांसाठी इच्छापूर्तीचा आजचा ऐतिहासिक दिवस आहे. आजचा हा दिवस माझ्यासाठी आनंदाचा, समाधानाचा आणि कर्तव्याची जाणीव करून देणारा दिवस आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1759847835321663488

15:33 (IST) 20 Feb 2024
जरांगे मात्र 'ओबीसी आरक्षणा'वर ठाम; म्हणाले, "उद्या..."

आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण हवे आहे. आमच्या कुणबी असल्याच्या नोंदी सापडल्या आहेत. ज्या मराठा समाजाकडे कुणबी असल्याच्या नोंदी नाहीत, त्यांच्यासाठी सरकारने सगेसोयऱ्यांसंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेची अंमलबजावणी सरकारने त्वरीत करावी, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. ते ओबीसी आरक्षणावर ठाम आहेत. याच पार्श्वभूवर जरांगे यांनी मराठा समाजाला उद्या (२१ फेब्रवारी) अंतरवाली सराटी येथे जमण्यास सांगितले आहे. उद्या दुपारी १२ वाजता मराठा समाजाची येथे बैठक होणार असून या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. तशी माहिती जरांगे यांनी दिली. वाचा सविस्तर

15:29 (IST) 20 Feb 2024
Maharashtra Assembly Session Live Updates: आरक्षणावर देवेंद्र फडणवीसांचं ट्वीट

ऐतिहासिक निर्णय ! बोला, छत्रपती शिवाजी महाराज की… जय ! महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता ‘आरक्षण विधेयक 2024' विधानसभेत एकमताने संमत करण्यात आले. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण मिळावे यासाठी महायुती सरकार प्रयत्नशील होते. आज लाखो मराठा बांधवांच्या हक्काच्या मागणीला महायुती सरकारने न्याय दिला आणि मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर झाले. मराठा समाजाचे खूप खूप अभिनंदन...

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1759874605173371385

15:19 (IST) 20 Feb 2024
Maharashtra Assembly Session Live Updates: मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण; पण सगेसोयऱ्यांबाबतच्या अधिसूचनेचं काय? मुख्यमंत्री म्हणतात…

मुख्यमंत्री म्हणतात, “मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकेल की नाही, याबाबत शंका बाळगण्याचं कारण नाही. आरक्षण टिकावं यासाठी राज्य सरकार…!”

वाचा सविस्तर

14:41 (IST) 20 Feb 2024
Maharashtra Assembly Special Session on Maratha Reservation:

मी शपथ घेतली तेव्हा जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतलं. काही लोक म्हणाले की हा वेळ मारून नेण्याचा प्रयत्न आहे. पण मी शब्द देतो, तेव्हा त्याच्या सर्व परिणामांचा विचार करूनच शब्द देतो. शब्द देऊन फिरवणारा हा एकनाथ शिंदे नाही. एकेकाळी प्रगत असलेला मराठा समाज काळाच्या ओघात मागे पडला. त्यामुळेच या समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारनं पुढाकार घेतला - एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत माहिती

14:35 (IST) 20 Feb 2024
मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर, पण मनोज जरांगे आंदोलनावर ठाम; म्हणाले "हे आरक्षण फक्त..."

मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी या गावात उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी मात्र मंजूर करण्यात आलेल्या या विधेयकावर शंका व्यक्त केली आहे. १०० ते १५० जणांसाठी हे आरक्षण आहे. आम्हाला आमच्या हक्काचे ओबीसी समाजातील आरक्षण हवे आहे. आम्ही उद्या आमच्या आंदोलनाची घोषणा करणार आहोत, असे जरांगे यांनी सांगितले. ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. वाचा सविस्तर

14:30 (IST) 20 Feb 2024
Maharashtra Assembly Session Live Updates:

विधेयक एकमतानं मंजूर करायचं हे ठरलेलंच होतं. विरोधक टीका का करतायत माहिती नाही. सगेसोयऱ्यांच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सहा लाख हरकती आल्या आहेत. त्याची शहानिशा करून त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल. त्याला काही काळ लागेल. ते तपासण्याचं काम चालू आहे - अजित पवार, उपमुख्यमंत्री

14:28 (IST) 20 Feb 2024
Maharashtra Assembly Session Live Updates: तीन महिन्यांत मराठा आरक्षणाची घेतलेली शपथ पूर्ण केली - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

तीन महिन्यांत मराठा आरक्षणाची घेतलेली शपथ पूर्ण केली - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

14:23 (IST) 20 Feb 2024
Maharashtra Assembly Session Live Updates:

५० टक्क्यांवर आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. पण मुख्यमंत्री म्हणतात की तसा तो अधिकार आहे. दोनदा नाकारलेलं आरक्षण पुन्हा तिसऱ्यांदा देणं हे म्हणजे निवडणुका मारून नेण्याचा प्रकार आहे. आम्हाला बोलायची संधी दिलेली नाही. विरोधकांचा आवाज दाबण्याचा हा प्रकार आहे. फसगत करणारं हे फसवं सरकार आहे - विजय वडेट्टीवार

14:21 (IST) 20 Feb 2024
Maharashtra Assembly Session Live Updates: मराठा आंदोलनाची दिशा उद्या होणार

मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला असून उद्या आंतरवली सराटीमध्ये आंदोलनाची पुढची दिशा सांगितली जाईल असं ते म्हणाले आहेत.

14:18 (IST) 20 Feb 2024
Maharashtra Assembly Session Live Updates:

"मराठे गेले आरक्षणात.. तू बस बोंबलत", छगन भुजबळांचा उल्लेख करत मनोज जरांगे पाटलांची टीका

14:16 (IST) 20 Feb 2024
Maharashtra Assembly Session Live Updates:

आरक्षण पुन्हा रद्द झालं तर मराठ्यांचे पोरं मेलेच म्हणून समजा. आमचं हक्काचं सोडून हे दुसरं आरक्षण कुठलं देताय? त्यांनी सगेसोयऱ्यांच्या बाबतीतला निर्णय़ घ्यायला पाहिजे होता. ज्या मागणीसाठी उठावच नव्हता, ती मागणी मंंजूर केली गेली. ज्यासाठी मराठा समाज आक्रोश करतोय, त्यासंदर्भात ते मराठा समाजाची चेष्टा करत आहेत. ही काही आडमुठी भूमिका नाहीये. तशी असती तर सहा महिन्यांचा वेळच दिला नसता - मनोज जरांगे पाटील

14:11 (IST) 20 Feb 2024
Maharashtra Assembly Session Live Updates:

आंदोलन चालू असताना ते धमकी देतात. बारसकर महाराजांनीही सांगितलं की हे मारूतीच्या शेपटाप्रमाणे वाढतच राहणार - छगन भुजबळ

14:09 (IST) 20 Feb 2024
Maharashtra Assembly Session Live Updates:

गेल्या महिन्यात सेलिब्रेशन केलं होतं. पुन्हा १० तारखेला उपोषणाला बसले. ते राज्यात भीतीचं वातावरण निर्माण करत आहेत. हे सगळं झाल्यानंतर, आता ते म्हणतात की मी आंदोलनावरून उठणार नाही. म्हणजे यांचं आंदोलन चालूच. त्यांच्यावर काही बोललं तर ते धमकी देतात. आता ते म्हणतात हे वेगळं आरक्षण नको, ओबीसीतच आरक्षण हवंय त्यांना. त्यांच्यासोबत काम करणारे भंडाऱ्याचे बारसकर यांनी म्हटलंय की मनोज जरांगे पाटील ऐकत नाहीत - छगन भुजबळ

14:08 (IST) 20 Feb 2024
Maharashtra Assembly Session Live Updates:

मराठा आरक्षणाच्या विधेयकला विरोध करायचा नाही. पण ज्या जरांगेंचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला, ते सतत धमक्या देत आहेत. मला स्वत:लाही त्यांनी धमकी दिली आहे. शिवरायांच्या पुतळ्याखाली बसून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याना आईवरून शिवाय दिल्या आहेत. तिथे बसलेले महसूल आयुक्त, एसपी, जिल्हाधिकारी यांनाही आईवरून शिव्या दिल्या. या दादागिरीला नियंत्रित करणार आहोत की नाही? - छगन भुजबळ

13:53 (IST) 20 Feb 2024
Maharashtra Assembly Session Live Updates: मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर

मराठा आरक्षणाच्या प्रस्तावावर कुणाचाही विरोध होण्याचं कारण नाही. आरक्षण मिळायला हवं ही आमची सगळ्यांची भूमिका होती. त्यामुळे याला बहुमत म्हणू नये, एकमत म्हणावं - विजय वडेट्टीवार

13:51 (IST) 20 Feb 2024
Maharashtra Assembly Session Live Updates: मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत मंजूर

मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत मंजूर

13:49 (IST) 20 Feb 2024
Maharashtra Assembly Session Live Updates: घाईत अधिसूचना अंतिम करणं चुकीचं ठरेल - मुख्यमंत्री

अधिसूचनेवर सहा लाख हरकती आल्या आहेत. घाईगडबडीत कोणतीही अधिसूचना अंतिम करणं चुकीचं ठरेल. त्यावरच्या सर्व आढाव्यांची छाननी करून नंतर त्याबाबत निर्णय घेतला जाईल - मुख्यमंत्री

13:48 (IST) 20 Feb 2024
Maharashtra Assembly Special Session on Maratha Reservation:

राज्य मागासवर्ग आयोगाने चार लाख कर्मचाऱ्यांकरवी अडीच कोटी लोकांची माहिती सर्वेक्षणात गोळा केली आहे. मराठा समाजात काही लोक पुढारलेले आहेत, जास्त मागास आहेत. त्यांच्यावर अन्याय होऊ नये, म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे. आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांनी लक्षात घ्यावं की सरकार कोणताही दुजाभाव करणार नाही - मुख्यमंत्री

13:47 (IST) 20 Feb 2024
Maharashtra Assembly Special Session on Maratha Reservation:

ओबीसी समाजावर अन्याय न करता हे आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मी मनोज जरांगे पाटलांना सांगेन की मराठा आरक्षण देण्याची शपथ घेतल्यानंतर तीन महिन्यांच्या आत हे मराठा आरक्षण दिलं आहे. त्यामुळे ज्यांच्या मनात गैरसमज आहे तो त्यांनी दूर करायला हवा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

13:44 (IST) 20 Feb 2024
Maharashtra Assembly Special Session on Maratha Reservation:

सगेसोयऱ्यांच्या अधिसूचनेवर सहा लाख हरकती आल्या आहेत. त्यांचा आढावा घेऊन राज्य सरकार योग्य तो निर्णय घेईल - एकनाथ शिंदे

13:43 (IST) 20 Feb 2024
Maharashtra Assembly Special Session on Maratha Reservation:

मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासणी करण्यासाठी १३ नोव्हेंबर २०२३ रोजी राज्य मागासवर्ग आयोगाला Terms of Reference निश्चित करुन देण्यात आले.

राज्य मागासवर्ग आयोगास तातडीने ३६७ कोटी उपलब्ध करून देण्यात आले. नमुना सर्वेक्षण न करता सर्वोच्च न्यायालयानं ट्रिपल टेस्टमध्ये सांगितल्याप्रमाणे विस्तृत सर्वेक्षण (इम्पेरीकल डेटा) गोळा करण्याचं शिवधनुष्य उचलायच होतं - मुख्यमंत्री

13:42 (IST) 20 Feb 2024
Maharashtra Assembly Special Session on Maratha Reservation:

मराठा समाजाला दिलेलं आरक्षण टिकून राहावं म्हणून राज्य सरकार विरोधी पक्षाला सोबत घेऊन शक्य ते सगळे प्रयत्न करणार आहे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

13:41 (IST) 20 Feb 2024
Maharashtra Assembly Special Session on Maratha Reservation:

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी तसंच मराठा आरक्षण व सुविधा मंत्रीमंडळ उपसमिती, मुख्य सचिव तसेच मा. मुख्य न्या. श्री दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील सल्लागार मंडळाच्या एकुण ५० बैठका तरी झाल्या असतील - मुख्यमंत्री

13:41 (IST) 20 Feb 2024
Maharashtra Assembly Special Session on Maratha Reservation:

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्दबातल करताना जे निष्कर्ष नोंदविले होते त्यावर आम्ही पूर्ण लक्ष्य केंद्रित केले. सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटीशनवर आता सुनावणी सुरु झाली आहे. त्यात देखील राज्य सरकारच्या बाजूने भक्कमपणे बाजू मांडण्यात येत आहे. यश मिळेल असा विश्वास वाटतो. मराठा आरक्षणाच्या बाजूने युक्तिवाद करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने सिनियर कौन्सिलची फौज आम्ही उभी केली आहे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

13:39 (IST) 20 Feb 2024
Maharashtra Assembly Special Session on Maratha Reservation:

आजचा दिवस अमृत पहाट घेऊन आला आहे. माझ्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळ गेले १५० दिवस अहोरात्र मेहनत घेत आहे. प्रशासनातील विशेषतः सामान्य प्रशासन विभाग, राज्य मागासवर्गीय आयोग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महसूल विभाग, विधी व न्याय विभाग तसेच वित्त विभागातील आणि गृह विभागातील अधिकाऱ्यांपासून ते अगदी शेवटच्या चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी घेतलेली अपार मेहनत आणि त्याचे फलित म्हणजे आजचे हे विधान मंडळाचे विशेष अधिवेशन आहे - मुख्यमंत्री

13:38 (IST) 20 Feb 2024
Maharashtra Assembly Special Session on Maratha Reservation:

मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे आणि मुख्यमंत्री म्हणून पहिल्या दिवसापासूनच ही इच्छा मी व्यक्त केलेली आहे. ओबीसी किंवा अन्य कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि टिकणारं आरक्षण मिळायला पाहिजे, हीच आमची भावना आहे - एकनाथ शिंदे

13:38 (IST) 20 Feb 2024
Maharashtra Assembly Special Session on Maratha Reservation:

मी आज अभिमानाने सांगतोय की पाऊणे दोन वर्षांपूर्वी सत्ता हाती घेतलेल्या महायुती सरकारने ठरवले होते त्यानुसार आम्ही आज मराठा समाजाला आरक्षण जाहीर करत आहोत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

13:38 (IST) 20 Feb 2024
Maharashtra Assembly Special Session on Maratha Reservation:

मुख्यमंत्री झाल्यावर मराठा समाजासाठी ठोस करून दाखविण्याची संधी मिळाली. हे मी माझं अहोभाग्य समजतो.

आमचं युतीचं सरकार आल्यावर मराठा आरक्षण हे आमच्या अजेंड्यावरचा प्राधान्य होतंच आणि म्हणूच सप्टेंबर २०२२ मध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांना उपसमितीचे अध्यक्ष केलं.

सत्तेवर आल्यानंतर लगेचच म्हणजे ऑगस्ट २०२२ मध्ये अधिसंख्य पदांची निर्मिती केली. तसा कायदा केला... २१ सप्टेंबर २०२२ रोजी शासन निर्णय काढून त्याची अमलबजावणी देखील सुरू केली.... २०१४ ते २०२२-२३ कालावधीतील रखडलेली नोकरभरती आम्ही पूर्ण केली. - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

13:34 (IST) 20 Feb 2024
Maharashtra Assembly Special Session on Maratha Reservation:

काही वर्षांपूर्वी ५६ मराठा क्रांती मोर्चे निघाले. गेल्या सरकारमध्ये तर छत्रपती संभाजीराजे यांनी आझाद मैदानावर उपोषण केलं होतं. त्यांच्याशी चर्चा करून मराठ्यांना ओबीसींप्रमाणे सवलती देणं, सारथी वगैरे संस्थांच्या माध्यमातून मदत करणं हे आपण करत होतो - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

13:33 (IST) 20 Feb 2024
Maharashtra Assembly Special Session on Maratha Reservation: मराठा समाजाचा सगळ्यांनीच फायदा घेतला - मुख्यमंत्री

ओबीसी किंवा अन्य कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भावना सगळ्यांची आहे. मराठा समाजाचा सगळ्यांनीच फायदा घेतला आहे. पण हा समाज आजवर सुविधांपासून वंचित राहिला हे दुर्दैवं आहे - एकनाथ शिंदे

13:31 (IST) 20 Feb 2024
Maharashtra Assembly Session Live Updates: २२ राज्यांमध्ये ५० टक्क्यांहून जास्त आरक्षण - शिंदे

२२ राज्यांमध्ये आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणासंदर्भात आपल्याला अधिकार दिले आहेत. त्यामुळे हा कायदा निकषांवर टिकेल. याबाबतीत आपण शंका बाळगण्याचं कारण नाही - एकनाथ शिंदे

13:30 (IST) 20 Feb 2024
Maharashtra Assembly Session Live Updates: आरक्षण टिकेल की नाही यावर शंका बाळगण्याचं कारण नाही - शिंदे

राज्य मागासवर्ग आयोगानं दीडशे दिवस अहोरात्र मेहनत घेऊन सर्वोक्षणाचं काम केलं. राज्य मागासवर्ग आयोगानं तयार केलेला अहवाल सरकारनं स्वीकारलेला आहे. आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकेल की नाही याबाबत शंका बाळगण्याचं कारण नाही. आपण सकारात्मक बोलायला हवं - एकनाथ शिंदे

13:24 (IST) 20 Feb 2024
Maharashtra Assembly Session Live Updates: मु्ख्यमंत्र्यांचं विधानसभेत मराठा आरक्षणावर भाषण

अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे प्रश्न चुटकीसरशी सुटले पाहिजेत अशी भावना असते. पण त्यासाठी वेळ लागतो. तेवढा संयम राखायला हवा. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शेक्षणिक सवलती, आर्थिक मदत ही व्यवस्था आपण आधी केली होती. मराठा समाजाचं मागासलेपण दूर करण्यासाठी आरक्षण मिळवून देणं आवश्यक होतं. आमचा सगळ्यांचा तोच प्रयत्न होता - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

13:22 (IST) 20 Feb 2024
Maharashtra Assembly Session Live Updates: मराठा समाजाचा संयम कधी सुटला नाही - एकनाथ शिंदे

मराठा बांधवांनी आजवर अनेकदा आंदोलन केलं. पण संयम कधी सुटला नाही. आपण ती शिस्त पाहिली आहे. यावेळी काही ठिकाणी अनुचित घटना घडल्या. त्या घडायला नको होत्या. मराठा समाजाने सरकारवर विश्वास ठेवला त्यासाठी मी मनोज जरांगे पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानतो - एकनाथ शिंदे

bombay high court Justice sunil shukre verdict in case related claim of maratha to kunbi

(संग्रहित छायाचित्र) फोटो-लोकसत्ता टीम

Maratha Reservation Maharashtra Assembly Special Session Updates in Marathi: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर!