Maharashtra Board Class 10 Result 2025 Updates: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE), पुणे आज इयत्ता १० वी बोर्ड परीक्षा २०२५ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दहावीचा निकाल ऑनलाईनही जाहीर झाला असून विद्यार्थी ऑनलाईन निकाल तपासू शकतात.

एसएससीचे विद्यार्थी त्यांचे इयत्ता १०वीचे निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर पाहू शकतात.

education.indianexpress.com

mahresult.nic.in, sscresult.mkcl.org, sscresult.mahahsscboard.in आणि results.digilocker.gov.in. results.targetpublications.org तसेच अधिकृत संकेतस्थळांव्यतिरिक्त, विद्यार्थी ऑफलाइन मोडमध्ये त्यांचा महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल पाहू शकतात. काहीवेळा वेबसाईटवर एरर येत असल्यानं विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवरून निकाल तपासण्यात अडचणी येतात अशावेळी हे पर्यायी मार्ग आपला वेळ वाचवू शकतात.

दहावीच्या निकालाबाबतचे क्षणोक्षणीचे अपडेट्स सहज मिळवण्यासाठी खालील माहिती आवर्जून वाचा.

दहावीच्या सर्व विद्यार्थी व पालकांना लोकसत्ता टीमकडून सुद्धा शुभेच्छा!

Live Updates

Maharashtra SSC Result 2025 to be Out Tomorrow Live Updates: दहावीचा निकालासंदर्भात सगळे अपडेट्स मिळवा एकाच क्लिकवर

16:09 (IST) 13 May 2025

दहावीच्या निकालात इंग्रजी, मराठी माध्यमाचे किती विद्यार्थी उत्तीर्ण? कोणत्या माध्यमाचा निकाल सर्वाधिक?

राज्य मंडळाच्या दहावीच्या निकालात राज्यात इंग्रजी माध्यमाचा निकाल सर्वाधिक ९८.४४ टक्के लागला आहे. तर सर्वाधिक विद्यार्थी असलेल्या मराठी माध्यमाचे ९२.८५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ...अधिक वाचा
14:53 (IST) 13 May 2025

दहावीचा निकाल लागला? कोणत्या क्षेत्रात प्रवेश घ्यायचा हे कसं ठरवाल?

दहावी बोर्डाच्या परीक्षेनंतर योग्य स्ट्रीम निवडणे हा महत्वाचा निर्णय ठरतो. विद्यार्थ्यांनी त्यांना कोणत्या क्षेत्रात आवड आहे हे लक्षात घेऊन कला (Arts) , विज्ञान (Science) , कॉमर्सपैकी (Commerce) तुम्ही कोणत्या क्षेत्राध्ये सहज शिक्षण घेऊ शकता याचा अंदाज घ्या व त्यानुसार कॉलेज आणि क्षेत्र विचारपूर्वक निवडा.

14:51 (IST) 13 May 2025

Maharashtra SSC Result 2025 : जिल्ह्यात दहावी निकालात वसई अव्वल; वसईचा निकाल ९६ टक्के निकाल ; निकालात मुलींची बाजी

Maharashtra Board SSC 10th Result 2025  बारावी निकालाच्या पाठोपाठ आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी ऑनलाइन जाहीर झाला. ...अधिक वाचा
14:11 (IST) 13 May 2025

Maharashtra SSC 10th Result: छत्रपती संभाजीनगर विभागाचा दहावीचा निकाल ९२.८२ टक्के; यंदा २.३७ टक्क्यांनी घट, लातूर मंडळाचा निकाल ९२.७७ टक्के

Maharashtra Board SSC 10th Result 2025 छत्रपती संभाजीनगर - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळाचा २०२५ चा निकाल ९२.८२ टक्के लागला. ...सविस्तर बातमी
13:48 (IST) 13 May 2025

तुमच्या गुणपत्रिकेतील ही माहिती तुम्ही तपासली का ?

विद्यार्थ्यांनी ऑनलाईन गुणपत्रिका पाहिल्यावर सगळ्यात पहिला स्वतःचे नाव, रोल नंबर, जन्मतारीख, त्यांनी वेगवेगळ्या विषयात मिळवलेले गुण इत्यादींचा उल्लेख आहे का हे काळजीपूर्वक तपासून घ्यावे. कारण – ही गुणपत्रिका तुमच्या अकरावीची प्रवेश प्रक्रियेसाठी महत्वाची ठरणार आहे.

13:26 (IST) 13 May 2025

दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर; झटपट मोबाईलवर सर्वात आधी ‘असे’ पाहा गुण

दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना आपल्या मोबाइलवरुन देखील दहावीचा निकाल पाहता येणार आहे. अनेकदा निकालाच्या वेळेस वेबसाइट या क्रॅश होतात किंवा इंटरनेट उपलब्ध नसेल तर SSC निकाल हा त्यांना SMS द्वारे पाहाता येणार आहे.
SMSद्वारे एसएससीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना “MHSSC” असं टाकून 57766 वर SMS पाठवायचा आहे. त्यानंतर निकाल त्यांच्या फोनवर SMSच्या स्वरुपात येईल.

12:58 (IST) 13 May 2025

विद्यार्थी, पालक आणि शिक्षक

कोणत्या क्षेत्रात प्रवेश घ्यायचा हा निर्णय घेताना विद्यार्थ्यांना खूप अडचणींना तोंड द्यावे लागते.तर अशावेळी पालकांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा द्यावा. तसेच कला (Arts) , विज्ञान (Science) , कॉमर्सपैकी (Commerce) अनुभवी व्यक्तींकडून, विद्यार्थ्यांकडून तर शिक्षकांकडून संबंधित विषयाची अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करावा.

12:41 (IST) 13 May 2025

दहावीचा निकाल वेबसाईट आणि मोबाईलवर कसा पाहायचा?

महाराष्ट्र बोर्डाच्या mahresult.nic.in, sscresult.mkcl.org आणि sscresult.mahahsscboard.in यासह सर्व अधिकृत वेबसाइटवर दहावीचा निकाल तुम्ही थेट पाहू शकता.

महाराष्ट्र बोर्डाचा निकाल एसएमएसद्वारे कसा पहावा

१. तुमच्या मोबाइलमध्ये एसएमएसचं ॲप घ्या.

२. यामध्ये महाराष्ट्र बोर्ड इयत्ता १०वी निकाल २०२४ साठी MHSSC सीट क्रमांक टाइप करा.

३. त्यानंतर ५७७६६ वर एसएमएस पाठवा

12:19 (IST) 13 May 2025

मुलीच ठरल्या सरस, कोकणाची पुन्हा बाजी!

सर्व विभागीय मंडळांमध्ये कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल ९८.८२ टक्के आहे. सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा ९०.७८ टक्के आहे. सर्व विभागीय मंडलातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.१४ टक्के असून मुलांची टक्केवारी ९२.३१ टक्के आहे. याचाच अर्थ नेहमीप्रमाणे मुलींनी निकालात बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८३ टक्के जास्त आहे.

12:14 (IST) 13 May 2025

३७ परीक्षा केंद्रांची मान्यता गैरप्रकारांमुळे होणार रद्द!

ज्या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार घडले, त्यांची मान्यता पुढील वर्षापासून कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात ३७ केंद्रांवर गैरप्रकार घडले होते. त्यांची मान्यता चौकशीअंती कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येईल.

12:11 (IST) 13 May 2025

Maharashtra Board SSC 10th Result 2025 : वर्षनिहाय उत्तीर्णतेची टक्केवारी

वर्ष २०२२ - ९६.९४

वर्ष २०२३ -९३.८३

वर्ष २०२४ – ९५.८१

वर्ष २०२५ – ९४.१०

12:03 (IST) 13 May 2025

Maharashtra Board 10th Results 2025: ७,९२४ शाळांचा निकाल १००%

"राज्यातील २३,४८९ माध्यमिक शाळांतून १५,५८,०२० नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७,९२४ शाळांचा निकाल १०० % लागला आहे," असे बोर्डाने सांगितले.

11:41 (IST) 13 May 2025
Maharashtra board SSC results 2025 announced today at mahahsscboard.in: उत्तीर्ण होऊ न शकलेले विद्यार्थी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून एकूण ८६ हजार ६४१ विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले नाहीत.

11:41 (IST) 13 May 2025
फेरपरीक्षेचा अर्ज कधीपासून भरण्यास सुरुवात होईल?

यंदा फेरपरीक्षेचा अर्ज १५ मे २०२५ पासून भरण्यास सुरुवात होईल आणि परिक्षा २४ जूनपासून सुरु होईल

11:39 (IST) 13 May 2025
Maharashtra board SSC results 2025 announced द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी

राज्यात ३ लाख ६० हजार ६३० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. म्हणजे ४५ टक्के किंवा ४५ टक्केपेक्षा जास्त आणि ६० टक्यांपेक्षा कमी गुण मिळवून ३ लाख ६० हजार ६३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

11:34 (IST) 13 May 2025
Maharashtra Class 10 Results Out: सर्वात जास्त निकाल कोणत्या जिल्ह्याचा?

सर्वात जास्त निकाल सिंधुदुर्ग जिल्ह्याचा लागला आहे, ९९. ३२ टक्के

11:33 (IST) 13 May 2025
Maharashtra 10th SSC Results 2025 Declared: राज्यातली मुलं हुश्शार… २११ विद्यार्थ्यांना शंभर टक्के!

यंदा दहावीच्या परीक्षेत राज्यातील २११ विद्यार्थ्यांनी मिळवले १०० टक्के गुण https://www.youtube.com/shorts/uQ7OJzOrACk

11:33 (IST) 13 May 2025
Maharashtra SSC Results 2025 Live प्रथम श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी

राज्यात ४ लाख ९७ हजार २७७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. म्हणजे ६० टक्क्यांपेक्षा जास्त ७५टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळवून ४ लाख ९७ हजार २७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

11:26 (IST) 13 May 2025
Maharashtra Board 10th SSC Result LIVE Updates : १०० टक्के उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या

१०० टक्के उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या २११ आहे.

माध्यमिक शालांत परीक्षा एकून ६२ विषयांसाठी घेण्यात आली होती त्यापैकी २४ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

11:24 (IST) 13 May 2025
Maharashtra Board 10th SSC Result LIVE Updates : मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलाच्या उत्तीर्णतेची टक्केवारी

मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.१४ टक्के

मुलाच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.३१ टक्के

11:22 (IST) 13 May 2025
Maharashtra SSC Result 2025 : यंदाही मुलींनी मारली बाजी!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून एकूण १४ लाख ५५ हजार ४३३ उत्तीर्ण झाले आहेत. यंदा मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.१४ टक्के आहे तर मुलांची टक्केवारी ९२.३१ आहे. म्हणजेच मुलींचा निकाल ३.८३ टक्के जास्त आहे.

11:21 (IST) 13 May 2025
MH SSC Division Wise Results and Percentage: पाहा दहावीचा विभागनिहाय निकाल व टक्केवारी

पुणे : ९४.८१ टक्के

नागपूर : ९०.७८ टक्के

संभाजीनगर : ९२.८२ टक्के

मुंबई : ९५.८४ टक्के

कोल्हापूर : ९६.७८ टक्के

अमरावती : ९२.९५ टक्के

नाशिक : ९३.०४ टक्के

लातूर : ९२.७७ टक्के

कोकण : ९९.८२ टक्के

11:21 (IST) 13 May 2025
Maharashtra Board 10th SSC Result LIVE: पाहा दहावीचा विभागनिहाय निकाल व टक्केवारी

पुणे – 94.81 टक्के

नागपुर – 90.78 टक्के

मुंबई – 95.84 टक्के

कोकण – 98.82 टक्के

11:18 (IST) 13 May 2025
Maharashtra SSC Result 2025 : SSC बोर्डाच्या पत्रकार परिषदेला सुरुवात

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. परीक्षेला बसलेल्यांपैकी एकूण विद्यार्थी १४ लाख ५५ हजार ४३३ उत्तीर्ण झाले आहेत.

11:17 (IST) 13 May 2025
महाराष्ट्र बोर्ड एसएससी 10th रिझल्ट लाइव्ह अपडेट: राज्याचा निकाल ९४.१० टक्के

१५ लाख ४६ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी १४ लाख ५५ हजार ४३३ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. ९४.१० टक्के निकाल लागला आहे.

11:17 (IST) 13 May 2025
दहावीचा निकाल जाहीर: मागील वर्षीच्या तुलनेत निकाल कमी

राज्यात दहावी परीक्षेचा निकाल ९४.१० टक्के, मागील वर्षाच्या तुलनेत निकाल १.७१ टक्केने कमी

11:13 (IST) 13 May 2025
Maharashtra Board 10th SSC Result Declared: दहावीचा निकाल लागला!

दहावीच्या निकालाची गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी वाट पाहत होते. तर तो निकाला अखेर आज लागला आहे. यंदा महाराष्ट्र राज्यातून उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.१० टक्के इतकी आहे…

09:49 (IST) 13 May 2025

Maharashtra SSC Result 2025 Live Updates: गेल्यावर्षी ९३.८३ टक्के निकाल -

गेल्यावर्षी १ मार्च ते २६ मार्च या दरम्यान दहावीची परीक्षा राज्यभरात झाली होती. या परीक्षेचा निकाल २७ मे रोजी जाहीर झाला होता. यंदा मात्र १५ दिवस आधीच निकाल जाहीर होणार आहे. गेल्या वर्षी राज्यात विद्यार्थी उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९३.८३ टक्के एवढी होती. २०२३मध्ये हेच प्रमाण ९३.८८ टक्के एवढे होते. तसेच गेल्या वर्षी १५,४९,३२६ विद्यार्थ्यांनी राज्यभरातून परीक्षा दिली. यात मुंबई विभागातील ३,३९, २६९ विद्यार्थ्यांचा समावेश होता.

09:48 (IST) 13 May 2025
Maharashtra Board SSC 10th Result 2025, Mahahsscboard.in LIVE: मुंबई विभागात तीन लाख ५८ हजार ८५४ विद्यार्थ्यांची नोंदणी

यंदा मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत राज्यभरात २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी मुंबई विभागातून तब्बल तीन लाख ५८ हजार ८५४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

09:04 (IST) 13 May 2025
Maharashtra SSC Result 2025 : दहावीचा आज निकाल

Maharashtra Board SSC 10th Result 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल मंगळवार, १३ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना निकालाची मुद्रित प्रत घेता येणार आहे. राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. सविस्तर वाचा

Maharashtra SSC Result 2025 Live Updates

एसएससीचे विद्यार्थी त्यांचे इयत्ता १०वीचे निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर पाहू शकतात – mahresult.nic.in, sscresult.mkcl.org, sscresult.mahahsscboard.in आणि results.digilocker.gov.in. results.targetpublications.org तसेच अधिकृत संकेतस्थळांव्यतिरिक्त, विद्यार्थी ऑफलाइन मोडमध्ये त्यांचा महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल पाहू शकतात. काहीवेळा वेबसाईटवर एरर येत असल्यानं विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवरून निकाल तपासण्यात अडचणी येतात अशावेळी हे पर्यायी मार्ग आपला वेळ वाचवू शकतात.