Mumbai Maharashtra Monsoon Update : मुंबईसह राज्यभरात पावसाची दमदार हजेरी आहे. मागील २४ तासांपासून राज्यात ठिकठिकाणी कोसळधारांमुळे तर काही भागांमध्ये बरसत असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई, बारामती व कर्जत शहरांमधल्या रस्त्यांवर पाणीच पाणी चोहीकडे अशी स्थिती निर्माण झाली आहे. ठाणे व पुण्यातील मुख्य रस्ते जलमय झाले आहेत. नागरिकांना रस्त्यावरून वाहनं चालवताना अडथळे येत आहेत. दरम्यान, कोकण व पश्चिम महाराष्ट्रात पुढील काही तास जोरदार पाऊस सुरू राहिल असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. एवढंच नाही तर पावसामुळे मुंबईचा वेगही मंदावला आहे. लाइफ लाइन समजली जाणारी लोकल सेवा १५ ते २० मिनिटे उशिराने सुरु आहे. यासह महत्त्वाच्या घडामोडींवर आपली नजर असणार आहे लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.

Live Updates

Mumbai Maharashtra News Live Today | मुंबईसह राज्यभरात कोसळधारा! पावसामुळे मंदावला लोकल वाहतुकीचा वेग यासह महत्वाच्या घडामोडी 

20:43 (IST) 26 May 2025

एकाच दिवसात १३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान, सिन्नर तालुक्यात सहा घरांची पडझड

रविवारच्या पावसात जिल्ह्यातील सहा तालुक्यांत १३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. सहा ते २५ मे या कालावधीत पावसाने १०९२ घरांची पडझड झाली. ...सविस्तर बातमी
20:33 (IST) 26 May 2025

संघाच्या प्रशिक्षणार्थी स्वयंसेवकांचे मंगळवारी संचलन

महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमधील २८५ स्वयंसेवक संचलनात सहभागी होणार असून, संचलनाचा प्रारंभ भोंसला शाळेतून होईल. ...वाचा सविस्तर
20:28 (IST) 26 May 2025

अकरावी प्रवेश प्रक्रियेबरोबरच कल चाचणीही प्रारंभ

यंदा अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू असताना कल चाचणीस आरंभ झाला. जिल्ह्यातील पाच केंद्रांवर ही परीक्षा २६ ते ३० या कालावधीत होत आहे. ...सविस्तर बातमी
20:04 (IST) 26 May 2025

मनसेत संघटनात्मक फेररचनेचे संकेत, गटबाजी संपविण्यासाठी राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांशी चर्चा

सोमवारी मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर दोन दिवसांसाठी आले होते. परंतु, केवळ दोन तासात त्यांनी दौरा आवरुन नाशिक सोडले. ...अधिक वाचा
19:49 (IST) 26 May 2025

२५ वर्ष मुंबईत कोण होते हे लोकांना माहीत आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाकरेंवर टीका

मागील २५ वर्ष मुंबईत कोण होते हे लोकांना माहित आहे. मला त्यांच्यावर भाष्य करायचे नाही अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली. ...सविस्तर वाचा
19:47 (IST) 26 May 2025

सिन्नर बस स्थानकात स्वच्छतेचे काम, प्रवासी वाहतूकीवर परिणाम

सिन्नर बस स्थानकाच्या छताचा काही भाग शिवशाही बसवर कोसळल्यानंतर सोमवारी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने स्थानकाच्या स्वच्छतेचे काम दिवसभर करण्यात आले. ...वाचा सविस्तर
19:32 (IST) 26 May 2025

पंतप्रधानांकडून मनमाडच्या साईराज परदेशीचा गौरव

साईराजने नुकत्याच बिहार येथे झालेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत तीन नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केले. ...सविस्तर वाचा
19:14 (IST) 26 May 2025

Ashwini Bhide : वरळी मेट्रो ३ चे भुयारी स्थानक पाण्यात गेल्यानंतर आश्विनी भिडेंनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाल्या...

Worli underground metro station Flooded : वरळी भुयारी मेट्रो स्थानकाच्या लोकार्पणानंतरच्या पहिल्याच पावसात मेट्रो सेवेचा बोजवारा उडाला. मुसळधार पाऊस कोसळू लागताच वरळीतील आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकात पाण्याची गळती होऊ लागली. ...सविस्तर वाचा
18:11 (IST) 26 May 2025

पावसाचा ‘मेट्रो ३’ला फटका… आचार्य अत्रे चौक भुयारी मेट्रो स्थानक जलमय…

मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत असून विविध भागांत पाणी साचले आहे. ऐन उन्हाळ्यात ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह बरसणाऱ्या पावसामुळे रेल्वेची वाहतूक संथगतीने सुरू असून नागरिकांना शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीत मुंबईतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘मेट्रो ३’लाही पावसाचा फटका बसला. मेट्रो ३ वरील वरळीतील आचार्य अत्रे चौक भुयारी मेट्रो स्थानकात पाणी साचलेल्याने यंत्रणांची तारांबळ उडाली.

सविस्तर वाचा

16:29 (IST) 26 May 2025

तुमच्या सुरक्षेसाठी आम्ही सदैव तत्पर, माटुंगा येथे एका वाहन चालकाला मदत करताना वाहतूक विभागाचे कर्मचारी

मुंबईत रविवारी २५ मे रोजी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने शहर भागाला झोडपून काढले. दक्षिण मुंबई आणि मध्य मुंबईत जास्त पाऊस पडला. तर नरिमन पॉईंट परिसरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. नरिमन पॉईंट परिसरात १० – १२ तासांत अडीचशे मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, माटुंगा येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी साचलं होतं. यावेळी पावसामध्ये बंद पडलेल्या एका वाहनाच्या चालकाला वाहतूक विभागाचे कर्मचाऱ्यांनी मदत केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

15:54 (IST) 26 May 2025

तारापूर अणुशक्ती प्रकल्पग्रस्त मागण्यांबाबत खासदार डॉ. हेमंत विष्णु सवरा यांनी प्रकल्प प्रशासनाशी केली चर्चा

बैठकीत प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रश्न, मागण्या आणि त्यांच्या दीर्घकालीन समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. ...सविस्तर बातमी
15:41 (IST) 26 May 2025

Mumbai Metro Station Rain Updates: पावसाचा ‘मेट्रो ३’ला फटका… आचार्य अत्रे चौक भुयारी मेट्रो स्थानक जलमय…

मेट्रो ३ वरील वरळीतील आचार्य अत्रे चौक भुयारी मेट्रो स्थानकात पाणी साचलेल्याने यंत्रणांची तारांबळ उडाली. ...अधिक वाचा
15:19 (IST) 26 May 2025

नवी मुंबईतील सीबीडीत भरले पाणी ! सेक्टर ४,५,६ पाण्यात, दुकाने व घरात शिरले पाणी

सीबीडी हा परिसर सखल भागात असल्याने सेक्टर १२ येथे असलेल्या पंपिंग स्टेशन वरून या विभागातील पाणी उचलून खाडीत सोडले जाते. ...सविस्तर वाचा
15:06 (IST) 26 May 2025

नवी मुंबई : उलवे येथील कोपर स्मशानभूमीसाठी ग्रामस्थांचे आंदोलन, सिडकोकडून होणाऱ्या तोडक कारवाईला विरोध

ग्रामस्थांची पारंपरिक स्मशानभूमी हटवून ती चार किलोमीटर अंतरावर नेण्यात येणार आहे. याला येथील नागरिकांचा विरोध आहे. ...सविस्तर वाचा
14:28 (IST) 26 May 2025

Mumbai Rain Latest Updates : मुंबईत नरीमन पॉईंट परिसरात सर्वाधिक पाऊस

मुंबईत रविवारी २५ मे रोजी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने शहर भागाला झोडपून काढले. ...सविस्तर वाचा
14:21 (IST) 26 May 2025

Thane Railway Station Crowd: घराबाहेर पडलेल्या नोकरदारांचे हाल; ठाणे, दिवा, कल्याण स्थानकात प्रवाशांची गर्दी

मुंबई उपनगरातील भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे रूळांवर पाणी साचल्याने मध्य रेल्वेने काही रेल्वेगाड्यांची वाहतुक स्थगित केल्या होत्या. ...सविस्तर वाचा
13:42 (IST) 26 May 2025

Maharashtra Monsoon Rain Updates : पुढील पाच दिवसांत मान्सून संपूर्ण राज्यात दाखल होण्याची शक्यता - हवामान विभाग

पुढील पाच दिवसांत मान्सून संपूर्ण राज्यात दाखल होईल अशी शक्यता पुणे हवामान विभागाचे अधिकारी एस. डी. सानप यांनी व्यक्त केली आहे. ...वाचा सविस्तर
13:17 (IST) 26 May 2025

महिला सरपंचांनी अर्ध्यावरच गुंडाळली ग्रामसभा; ग्रामस्थांमध्ये रोष…

लाखनी तालुक्यातील पालांदूर ग्रामपंचायत येथे शुक्रवार रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार ग्रामपंचायतमधील ग्रामस्थ सभेसाठी हजर होऊ लागले. ...सविस्तर बातमी
13:14 (IST) 26 May 2025

मुसळधार की अतिवृष्टी? चक्रीवादळाची अचूक माहिती समजणार; IMD आता भारतीय बनावटीची 'ही' नवी यंत्रणा वापरणार!

"बीएफएस हे भारतातील पहिले स्वदेशी बनावटीचे हवामान मॉडेल आहे. ते एक निश्चित मॉडेल आहे, म्हणजेच ते एकल-मॉडेल आधारित आउटपुट असेल", असे आयआयटीएमचे माजी वरिष्ठ हवामान मॉडेलर पार्थसारथी मुखोपाध्याय म्हणाले. ...सविस्तर वाचा
13:06 (IST) 26 May 2025

पालघर : नगरपरिषदेची प्लास्टिक बंदीची कारवाई, मात्र प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रास सुरू, दुकानदारांकडून अल्प प्रतिसाद

नगर परिषदेने दुकानदारांकडून प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यास सुरुवात केली आहे. मात्र असे असताना कचऱ्याच्या ढिगारांमध्ये पिशव्यांचा सर्रास वापर होताना दिसून येत आहे. ...सविस्तर वाचा
12:52 (IST) 26 May 2025

"मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा हा ऐतिहासिक निर्णय", मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे मत

सरकारने पहिल्या शंभर दिवसात हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यामुळे मत्स्यव्यवसायाला शंभर टक्के दर्जा दिला जाणार आहे. ...सविस्तर बातमी
12:45 (IST) 26 May 2025

माळशिरसजवळ नीरा नदीच्या पुरात अडकलेल्या सहाजणांची सुटका; पंढरपुरात तीन साधू अडकले

सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यातील कुरबावी गावात नीरा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात सहा नागरिक अडकले होते. ...सविस्तर बातमी
12:39 (IST) 26 May 2025

Sindhudurg Rain Updates : सिंधुदुर्ग जिल्ह्यात हंगामपूर्व पावसामुळे भात रोपांचे नुकसान

पावसाळा सुरू होण्यापूर्वी अनेक शेतकरी पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी भात बियाणे पेरून रोपे तयार करतात. ...सविस्तर बातमी
12:32 (IST) 26 May 2025

Lonavala Rain Updates: गेल्या २४ तासांत तब्बल २३३ मिलिमीटर पाऊस कोसळला

मान्सूनपूर्व पावसाने अवघ्या महाराष्ट्रभर जोरदार हजेरी लावली आहे. पर्यटन नगरी असलेल्या लोणावळ्यामध्ये देखील गेल्या २४ तासात तब्बल २३३ मिलिमीटर पाऊस कोसळला आहे. ...सविस्तर वाचा
12:20 (IST) 26 May 2025

Maharashtra Rain Updates : मोसमी पावसाचे आगमन, पण पेरणी कराल तर नुकसान…

हवामान कोरडे होणार असल्यामुळे जर पेरणीची घाई केली तर शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...अधिक वाचा
12:10 (IST) 26 May 2025

अमित शाह नागपुरात मात्र, नितीन गडकरी शाहांच्या स्वागतापासून दूर, घरा शेजारच्या हॉटेलमध्ये राहूनही…

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांचे रविवारी रात्री नऊ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर येथे आगमन झाले. ...सविस्तर वाचा
11:58 (IST) 26 May 2025

Raigad Rain Updates : रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा; मुरुड येथे चोवीस तासांत तब्बल ३७१ मिलीमीटर पावसाची नोंद

किल्ले रायगडावर जाणाऱ्या मार्गावर कोझर येथे मोठं भगदाड पडल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. ...सविस्तर बातमी
11:44 (IST) 26 May 2025

Uran Rain Updates : उरणमध्ये पहिल्या पावसाच्या जोरधारेने अनेकांचे संसार उघड्यावर, सारडे आदिवासी पाडा आणि कळबूसरे मधील घरांचे नुकसान

रविवारी मध्यरात्री पासून सुरू झालेल्या जोरदार वादळी वारे व विजेच्या कडकडाटासहच्या पहिल्याच पावसाने उरणकरांची तर्धातीरपत उडाली आहे. ...वाचा सविस्तर
11:37 (IST) 26 May 2025

Panvel Rain News: पहिल्या पावसात कळंबोलीच्या बैठ्या घरात पाणी शिरले

पनवेलमध्ये मागील २४ तासात ८२.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून सकाळी ९ वाजता पावसाचे पाणी कळंबोली उपनगरातील बैठ्या वसाहतींमध्ये शिरल्याने रहिवाशांची तारांबळ उडाली. ...सविस्तर वाचा
11:16 (IST) 26 May 2025

Mumbai Rain News : मुंबईत पावसाचा रेड अलर्ट, आज समुद्राला मोठी भरती, सुमारे चार मीटरपर्यंत लाटा उसळणार

Heavy Rain In Mumbai : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

सविस्तर वाचा...

Mumbai Rain red Alert

मुंबईत पावसाचा रेड अलर्ट (Express Photo)

मुंबईसह राज्यभरात पावसाची दमदार हजेरी आहे. मागील २४ तासांपासून राज्यात ठिकठिकाणी कोसळधारांमुळे तर काही भागांमध्ये बरसत असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई, बारामती व कर्जत शहरांमधल्या रस्त्यांवर पाणीच पाणी चोहीकडे अशी स्थिती निर्माण झाली आहे. ठाणे व पुण्यातील मुख्य रस्ते जलमय झाले आहेत. नागरिकांना रस्त्यावरून वाहनं चालवताना अडथळे येत आहेत.