Latest Marathi News Updates : विधानसभेत बसून मोबाईलवर रमी खेळण्याचा आरोप असणारे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना अजित पवारांनी समज दिल्यानंतर कारवाई होणार नसल्याचं स्पष्ट झालं. त्यावरून सध्या राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत. दुसरीकडे राज ठाकरे व उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या असताना दुसरीकडे महायुतीमध्येच एकनाथ शिंदे गटाला सरकारमधूनच कुणीतरी कारवाईचे इशारे देत असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे.
Mumbai Maharashtra Breaking News Live Today : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा
सांगलीत खासगी शिक्षण संस्थांचा घरपट्टी विरोधात आंदोलनाचा इशारा
सांगलीतील अंबाबाई तालीम संस्थेच्या ‘एबीजीआय’ शैक्षणिक संकुलाला स्वायत्त दर्जा
शनिशिंगणापूर देवस्थान ‘ॲप’ गैरव्यवहार; दोन कर्मचाऱ्यांच्या खात्यावर एक कोटीपेक्षा अधिक रक्कम
अणुस्कुरा तपासणी नाका येथे राजापूर पोलिसांनी गोवा बनावटीची दारु पकडली...
लातूरच्या धर्तीवर येवल्यातील व्यावसायिकांचे पूर्नवसन; अजित पवार यांनी काय आदेश दिले ?
रत्नागिरीच्या आंबा बागायतदारांना शासनाकडून नुकसान भरपाईसाठी १५ लाख मंजूर
पतीच्या निधनानंतर पत्नीने देखील सोडले प्राण; निवळी येथील घटनेने सर्वत्र हळहळ
ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांचा भाजपात प्रवेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे, त्यांची मुलं व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज भाजपात प्रवेश केला. यावेळी फडणवीस म्हणाले, ते आपल्याच घरी परत आलेत. त्यमुळे मला मनस्वी आनंद झाला आहे. मी अण्णांचं, त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचं भाजपात स्वागत करतो. तसेच त्यांना विनंती करतो की तुम्ही ज्येष्ठ आहात त्यामुळे राज्यात काम करत असताना आम्हाला सांभाळून घ्या.
Pranjal Khewalkar Case: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकरांच्या वकिलांचा दावा
हे सगळं संशयास्पदच वाटतंय. काही मुलं प्रांजल खेवलकरांना पाच दिवसांआधी फोन करतात. नंतर त्यांना बोलवलं नसतानाही ती मुलं येतात. ते तिथे येतात. त्यानंतर १० मिनिटांनी दरवाजा वाजतो. पोलीस येतात. नंतर ती महिला स्वत:हूनच पुड्या काढून देते. हा सगळा पोलीस तपासाचा भाग आहे. पोलिसांवर आमचा अजूनही विश्वास आहे - प्रांजल खेवलकरांचे वकील
Pranjal Khewalkar Case: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकरांच्या वकिलांचे पोलीस यंत्रणेला सवाल
प्रांजल खेवलकरांचा आयफोन पोलिसांकडे आहे. मग तथाकथित जळगावचे आमदार जो दावा करताय की खेवलकरांच्या गुगल ड्राईव्हच पासवर्ड त्यांच्याकडे आहे. हा पासवर्ड त्यांना कुणी दिला? दुसरं खेवलकरांचे फोटो कुणी व्हायरल केले? छापा टाकला तेव्हा तिथे फक्त पोलीसच होते, तर तिथले फोटो कुणी व्हायरल केले? यासंदर्भात पोलिसांकडे आम्ही दाद मागितल्यावर पोलिसांनी उत्तरं दिली आहेत. व्हिडीओ कुणी व्हायरल केले? याविषयी तपास करून माहिती देतो असं पोलिसांनी सांगितलं आहे. रक्ताच्या नमुन्याचे अहवाल लवकरात लवकर मागवून घेण्याची विनंतीही पोलिसांना केली आहे - प्रांजल खेवलकरांचे वकील
नवी मुंबई : तृतीयपंथीयांचा धुडघूस; एक पोलीस अधिकारी जखमी, पाच जणांवर गुन्हा दाखल, अतिक्रमणविरोधी कारवाईला विरोध
Sanjay Raut on Devendra Fadnavis: राज्यात नवीन देवेंद्र फडणवीस कायदा आला आहे - संजय राऊत
अर्जुन खोतकरांच्या पीएच्या घरात धुळ्यात १ कोटी ८० लाख रुपये सापडले. त्याआधी धुळ्यातल्या ठेकेदारानं १० कोटी जमा करून जालन्याला पाठवले. ते कुणासाठी पाठवले? त्याचीही चौकशी समिती वगैरे नेमली. पण पुढे काय झालं. देवेंद्र फडणवीस कारवाईच्या घोषणा करतात, एटीएस स्थापन करतात. पण पुढे काय होतं? अंदाज समितीचा अध्यक्ष लाचखोर आहे. हे उघड आहे. त्याला तुम्ही वाचवताय. विधिमंडळाचे अध्यक्षही वाचवतायत. हा नवीन फडणवीस अॅक्ट आला आहे. त्यानुसार आपल्या लोकांना वाचवायचं, समज द्यायची, सोडून द्यायचं आणि बाकीच्यांना अटक करायची - संजय राऊत</p>
हे सगळं दबावाचं राजकारण आहे. गेल्या काही दिवसांत अटक झालेले बरेचसे लोक किंवा काल वसई-विरारच्या आयुक्तांवर पडलेली धाड हे पाहता मिंधे गटाच्या लोकांना कुणीतरी हा इशारा देतंय की फार हालचाल कराल तर याद राखा. सगळ्या फाईली टेबलावर आहेत, पण त्या पोलिसांकडे कधी जाणार? हे पाहावं लागेल - संजय राऊत यांचा दावा
कोकाटे यांचे चित्रीकरण कोणी केले? विधिमंडळाची चौकशी सुरू (लोकसत्ता टिम)
Mumbai Maharashtra Breaking News Live Today : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींची बित्तंबातमी