Maharashtra Monsoon Session Highlights : गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदी भाषा सक्तीचा निर्णय चांगलाच गाजला. राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती करु नये, अशी मागणी करत विरोधक या निर्णयाविरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर अखेर त्रिभाषा सूत्राचे दोन्ही निर्णय सरकारने अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रद्द केले. आता आजपासून (३० जून) राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु झालं आहे. हे अधिवेशन १८ जुलैपर्यंत असणार आहे. त्यामुळे या पावसाळी अधिवेशनात विविध मुद्यांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारने हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द केला असला तरी या मुद्यावरून देखील विरोधक सरकारला जाब विचारण्याची शक्यता आहे. तसेच शेतकऱ्यांची कर्ज माफी, शक्तिपीठ महामार्गाचा विषय, लाडकी बहीण योजनेचा हप्ता १५०० ऐवजी २१०० रुपयांचं दिलेलं आश्वासन यासह आदी महत्वाच्या विषयांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यासह राज्यातील सर्व राजकीय आणि विधीमंडळ अधिवेशनातील सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Maharashtra Breaking News Live Today : राज्यातील सर्व राजकीय आणि पावसाळी अधिवेशनातील सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “ठाकरे बंधूंनी एकत्र यावं क्रिकेट खेळावं, जेवण करावं आम्हाला…”
महाराष्ट्रात हिंदीचा मुद्दा रविवारपर्यंत चर्चेत होता. पहिलीपासून हिंदी भाषा लागू करण्याच्या निर्णयाला उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि विरोधकांनी टोकाचा विरोध दर्शवला होता. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन मोर्चा काढण्याचंही ठरवलं होतं. मात्र अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला १६ एप्रिल आणि १७ जूनचे दोन्ही अध्यादेश रद्द करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यानंतर ठाकरे बंधू एकत्र येत आहेत म्हणूनच तुम्ही जीआर रद्द केला अशी टीका त्यांच्यावर होऊ लागली. याबाबत प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे.
Video : कशासाठी ? शिक्षणासाठी…नदीवरील आडव्या झाडावरुन विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास
फडणवीस मंचावर असताना सरन्यायाधीश गवईंकडून उद्धव ठाकरेंचे भरभरून कौतुक, म्हणाले, कोव्हिड काळातही….
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचे नाते हे महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक चढ-उतारांनी भरलेले आहे. उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यात शाब्दिक संघर्ष सातत्याने सुरू असतो. नागपूर मध्ये अलीकडे झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते. यावेळी देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई देखील उपस्थित होते. न्या. गवई यांनी फडणवीस मंचावर उपस्थित असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भरभरून कौतुक केले.
भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण यांनी अर्ज भरला
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण यांनी अर्ज भरला आहे. आम्ही सगळ्यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. किरेण रिजेजू हे मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी कुणाची निवड झाली हे नाव जाहीर करतील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसंच रवींद्र चव्हाण यांचाच अर्ज आला आहे हेदेखील त्यांनी सांगितलं. त्यामुळे भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड निश्चित मानली जाते आहे. यासंदर्भातली अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे.
Maharashtra BJP State President: भारतीय जनता पक्षाचे नेते रविंद्र चव्हाण यांनी भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी अर्ज भरला आहे. आता मंगळवारी (१ जुलै) भारतीय जनता पक्षाकडून नव्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
फलटणजवळ दोन वारकऱ्यांचा वीजेचा धक्का बसून मृत्यू
“परत सरकार अशा भानगडीत…”, राज ठाकरेंची हिंदीबाबतच्या निर्णयानंतर भूमिका; म्हणाले, “मोर्चा निघाला असता तर…”
देवेंद्र फडणवीस सरकारने लागू केलेले त्रिभाषा सूत्र मागे घेतल्याची घोषणा खुद्द मुख्यमंत्र्यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला केली. त्यापाठोपाठ उद्धव ठाकरे व राज ठाकरे या ठाकरे बंधूंनी घोषणा केलेला मोर्चाही रद्द करण्यात आल्याचं दोन्ही पक्षांनी जाहीर केलं. त्यामुळे शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या मुद्द्यावर तूर्तास पडदा पडला आहे. हे सगळं करण्याची गरजच नव्हती, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिली आहे. सोमवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरेंनी या संपूर्ण प्रकरणावर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
"सरकार विरोधात बोलणारे त्यांना देशद्रोही वाटतात", उद्धव ठाकरे यांची भाजपावर टीका
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज मुंबईतील आझाद मैदानातील एका आंदोलनात सहभागी झाले आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, "सरकार विरोधात बोललं म्हणजे त्यांना देशद्रोही वाटतात. पहलगाममध्ये आलेले दहशतवादी कुठे गेले? याचं उत्तर कोण देणार? आता असा समज झाला आहे की भाजपात जे जातील ते साधू संत आणि जे भाजपाच्या विरोधात बोलतील ते देशद्रोही वाटतात. म्हणून मी प्रश्न विचारला होता की पहलगाममध्ये आलेले दहशतवादी कुठे गेले, पातळात गेले की आवकाशात गेले की भाजपात?", असं म्हणज उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
बांद्यात दोन एसटी बसचा भीषण अपघात: १९ प्रवासी जखमी, सुदैवाने जीवितहानी टळली
मालवण नांदोस येथील जंगलात नेपाळी युवकाचा मृतदेह आढळला, कौटुंबिक समस्येतून आत्महत्या, प्राथमिक चौकशीत निष्पन्न
विधानपरिषदेच्या सभागृहात शोकप्रस्ताव संमत झाल्यानंतर दिवसभराचं कामकाज स्थगित
राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून (३० जून) सुरु झालं आहे. हे अधिवेशन १८ जुलैपर्यंत असणार आहे. या पावसाळी अधिवेशनात विविध मुद्यांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द केला असला तरी या मुद्यावरून देखील विरोधक सरकारला जाब विचारण्याची शक्यता आहे. आज विधानपरिषदेचं कामकाज सुरु झाल्यानंतर सभागृहात शोकप्रस्ताव मांडण्यात आला, शोकप्रस्ताव मांडून आदरांजली वाहण्यात आल्यानंतर आजच्या दिवसभराचं कामकाज स्थगित करण्यात आलं आहे.
'ही गोष्ट परत होणार नाही, हे सरकारने लक्षात ठेवावं', राज ठाकरेंचा राज्य सरकारला मोठा इशारा
राज्य सरकारने हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी राज ठाकरे यांनी राज्य सरकारला हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयावनरून पुन्हा एकदा सुनावलं आहे. हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द करण्यात आला असला तरी आता ही गोष्ट पुन्हा होणार नाही हे सरकारने लक्षात घेतलं पाहिजे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे थोड्याच वेळात माध्यमांशी संवाद साधणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे थोड्याच वेळात माध्यमांशी संवाद साधणार असल्याची माहिती सांगितली जात आहे. त्यामुळे राज ठाकरे नेमकं कोणत्या विषयांवर बोलणार आहेत, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
विधानसभेत शोकप्रस्ताव संमत झाल्यानंतर दिवसभराचं कामकाज संपलं
आजपासून (३० जून) राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु झालं आहे. हे अधिवेशन १८ जुलैपर्यंत असणार आहे. त्यामुळे या पावसाळी अधिवेशनात विविध मुद्यांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द केला असला तरी या मुद्यावरून देखील विरोधक सरकारला जाब विचारण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज विधानसभेचं कामकाज सुरु झाल्यानंतर सभागृहात शोकप्रस्ताव मांडण्यात आला, त्यानंतर हा प्रस्ताव संमत झाल्यानंतर आजच्या दिवसभराचं कामकाज संपलं आहे.
बीडमधील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी चौकशीचे आदेश, पंकजा मुंडे यांची माहिती
बीडमधील एका खासगी क्लासेसमध्ये अल्पवयीन मुलीचा दोन प्राध्यापकांनी विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेबाबत बोलताना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, "संबंधित पिडितेच्या पालकांशी देखील मी संवाद साधला आहे. तसेच अशा प्रकारच्या आणखी काही घटना असतील त्याचा देखील शोध घ्यावा आणि त्याची चौकशी करण्यात यावी असे आदेश मी बीडच्या पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. कोणत्याही घटनेतील आरोपी हा आरोपी असतो. त्यामुळे आरोपीवर कठोर कारवाई होईल", असं मंत्री पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे
आजपासून (३० जून) राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु झालं आहे.या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, "विधीमंडळाच्या पासवर अशोक स्तंभ होता. आता हा अशोक स्तंभ सगळीकडून काढून टाकला. संविधानाची गळचेपी भाजपाने केली आहे", असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु झालं आहे. राज्य सरकारने हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द केला असला तरी या मुद्यावरून देखील विरोधक सरकारला जाब विचारण्याची शक्यता आहे. यावरूनच आता आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, "११ वीच्या पहिल्या यादीचा सरकारने घोळ केला आहे. सध्या जाहीर झालेल्या ११ वीच्या पहिल्या यादीत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याची माहिती आम्हाला समजली आहे. राज्य सरकारने हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द केला आहे. पण संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठल्यानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भातील निर्णय़ रद्द करावा लागला. अजूनही आम्ही लेखी आदेशाची वाट पाहत आहोत", असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
https://youtu.be/o4TgTUnSfxo?si=BXlY4A6r4O-Q3XWs
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत वारकऱ्यांच्या वेशात विधानभवनात दाखल
राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून (३० जून) सुरु झालं आहे. या पावसाळी अधिवेशनात विविध मुद्यांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. आता सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे आमदार विधानभवनात दाखल झाले आहेत. यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते तथा आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे अधिवेशनासाठी विधानभवनात वारकऱ्यांच्या वेशात दाखल झाले आहेत.
Maharashtra Assembly Session Live Updates : 'अभिमान मराठीचा...', विधानभवनाच्या पायऱ्यावर विरोधकांचं आंदोलन
Maharashtra Assembly Session Live Updates : आजपासून (३० जून) राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु झालं आहे.या पावसाळी अधिवेशनात विविध मुद्यांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द केला असला तरी देखील विरोधक सरकारला जाब विचारण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवरच विधानभवनाच्या पायऱ्यावर विरोधकांनी घोषणाबाजी करत जोरदार आंदोलन केलं आहे.
'होय, त्रिभाषा सूत्र आम्हीच स्वीकारलं, कम ऑन किल मी' असं लिहिलेले बॅनर्स विधानभवनाच्या पायऱ्यांवर झळकले, शिंदे गटाचं आंदोलन
आजपासून (३० जून) राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु झालं आहे.या पावसाळी अधिवेशनात विविध मुद्यांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द केला असला तरी या मुद्यावरून देखील विरोधक सरकारला जाब विचारण्याची शक्यता आहे. असं असतानाच 'होय, होय त्रिभाषा सूत्र आम्हीच स्वीकारलं, कम ऑन किल मी' असं लिहिलेले बॅनर्स विधानभवनाच्या पायऱ्यांवर झळकले आहेत. सत्ताधारी शिवसेनेच्या आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात हे आंदोलन केलं आहे.
"राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या एकत्रित मोर्चाचा सरकारने धसका...", संजय राऊत यांचं मोठं विधान
राज्य सरकारने हिंदी भाषा सक्तीचा निर्णय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रद्द केला. या पार्श्वभूमीवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "राज्य सरकारने हिंदी भाषा सक्तीचा निर्णयावरून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जनता रस्त्यावर उतरली, राज्यातील अनेक पक्ष रस्त्यावर उतरले आणि त्या आदेशाची होळी केली. तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित मोर्चाचा सरकारने धसका घेतला होता आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला हिंदी भाषा सक्तीचा निर्णय आदेश रद्द करावा लागला", असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Assembly Session Live Updates : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात, शेतकऱ्यांची कर्जमाफी ते शक्तिपीठ महामार्ग कोणते मुद्दे गाजणार?
Maharashtra Assembly Session Live Updates : आता आजपासून (३० जून) राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु झालं आहे. हे अधिवेशन १८ जुलैपर्यंत असणार आहे. त्यामुळे या पावसाळी अधिवेशनात विविध मुद्यांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द केला असला तरी या मुद्यावरून देखील विरोधक सरकारला जाब विचारण्याची शक्यता आहे. तसेच शेतकऱ्यांची कर्ज माफी, शक्तिपीठ महामार्गाचा विषय, लाडकी बहीण योजनेचा हप्ता १५०० ऐवजी २१०० रुपयांचं दिलेलं आश्वासन यासह आदी महत्वाच्या विषयांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात, (फोटो-संग्रहित छायाचित्र)