Maharashtra News Live Updates, 07 October 2025: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर काल (सोमवारी) एका वकिलाने बूट फेकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. यानंतर या घटनेविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सरन्यायाधीश बी. आर. गवई हे महाराष्ट्राचे असल्याने राज्यातही अनेक ठिकाणी याचा निषेध नोंदवण्यात येत आहे. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने (शरद पवार गट) या घटनेविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये “संविधान सन्मान आंदोलन” आयोजित केले आहे.

याचबरोबर, राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी प्रशासनाकडून काम सुरू आहे. तसेच, येत्या काही दिवसांत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठीही राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. यासह राज्यातील विविध घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आढावा घेऊया.

Live Updates

Latest Marathi News Today

11:57 (IST) 7 Oct 2025

सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर बूट फेकल्याच्या घटनेचा यशोमती ठाकूर यांच्याकडून निषेध

सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावरील हल्याप्रकरणी काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी निषेध व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, "सर्वोच्च न्यायालयात अत्यंत निंदनीय प्रकार घडला आहे. सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर एका मनुवादी विचारांच्या वकीलाने बूट भिरकावल्याची घटना घडली असून हा प्रकार भारतीय लोकशाहीसाठी गंभीर इशारा आहे. वर्णवर्चस्ववादी आणि मनुवादी विचारसरणीच्या प्रवाहातून उद्भवलेली ही घटना न्यायव्यवस्था, संविधान आणि लोकशाही मूल्यांवर थेट हल्ला आहे. अशा उजव्या विचारसरणीच्या आणि मनुवादी प्रवृत्तीच्या विरोधात काँग्रेस पक्ष सतत आणि निकराने लढा देत राहील. संविधानाचे रक्षण, लोकशाहीचे जतन आणि सर्वसामान्य जनतेच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही."

11:40 (IST) 7 Oct 2025

CJI B. R. Gavai यांच्यावर हल्ला, रोहित पवारांकडून भाजपा लक्ष्य; म्हणाले, "जेव्हा जनतेतून संतापाची भावना…"

On Shoes Attack On CJI B.R. Gavai: बी. आर. गवई यांच्या दिशेने बूट फेकल्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्या वकिलाला न्यायालयाच्या कक्षातून बाहेर काढले व नंतर दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिले. ...वाचा सविस्तर
11:40 (IST) 7 Oct 2025

CJI B. R. Gavai यांच्यावर हल्ला, रोहित पवारांकडून भाजपा लक्ष्य; म्हणाले, "जेव्हा जनतेतून संतापाची भावना…"

On Shoes Attack On CJI B.R. Gavai: बी. आर. गवई यांच्या दिशेने बूट फेकल्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्या वकिलाला न्यायालयाच्या कक्षातून बाहेर काढले व नंतर दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिले. ...वाचा सविस्तर
10:53 (IST) 7 Oct 2025

Navi Mumbai Airport : विमानतळाच्या उद्घाटनाला शिवराज्याभिषेकासह, राज्याच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचा नृत्यसंगीताविष्कार

या विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्याला केवळ विकासाचा उत्सव नव्हे, तर महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा महाउत्सव म्हणता येईल. ...सविस्तर वाचा
10:25 (IST) 7 Oct 2025

सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार यांचे मूक आंदोलन

सर्वोच्च न्यायालयात काल सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर एका वकिलाने बूट फेकल्याचा प्रकार घडला आहे. याच्याविरोधात राष्ट्रवादीच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार बारामतीमध्ये मूक आंदोलनास बसले आहेत.

10:21 (IST) 7 Oct 2025

Maharashtra Breaking News Live: सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ शरद पवार गटाचे आंदोलन

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर काल (सोमवारी) एका वकिलाने बूट फेकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. यानंतर या घटनेविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सरन्यायाधीश बी. आर. गवई हे महाराष्ट्राचे असल्याने राज्यातही अनेक ठिकाणी याचा निषेध नोंदवण्यात येत आहे. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने (शरद पवार गट) या घटनेविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये "संविधान सन्मान आंदोलन" आयोजित केले आहे.

महाराष्ट्र न्यूज लाईव्ह अपडेट्स