Maharashtra News Updates, 29 September 2025 : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाने झोडपले आहे. मुंबई, ठाणेसह मराठवाडा, विदर्भ, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात शनिवारी रात्रीपासूनच पावसाचा जोर अधिक होता. रविवारी देखील अनेक भागात जोरदार पाऊस झाला. दरम्यान, संपूर्ण राज्यात मंगळवारपासून पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मराठवाडा, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर विधिमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते आमदार जयंत पाटील यांनी राज्यपालांना पत्र लिहून केली आहे.
दरम्यान बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर येताच राज्यात पावसाने जोर धरला. त्यामुळे मराठवाड्यासह विदर्भातही मुसळधार पाऊस कोसळत आहे. आजच्या दिवसभरातील पाऊस आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहाणार आहोत.
Maharashtra News Live Today : राज्यातील पावसाशी संबंधीत सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर -
Marathwada Flood Victims KYC: पूरग्रस्तांना मदत मिळविण्यासाठी ‘केवायसी ’ अनिवार्य, तातडीच्या मदतीची ‘डाळ’ शिजेना
दहिसर पथकर नाक्यावरील कोंडी दूर करण्यासाठी परिवहन मंत्री रस्त्यावर, जुन्या अनधिकृत दुकानावर कारवाईचे निर्देश
"मोदीजी, ॲप आधारित चालकांचे ऐका", बाइक टॅक्सीविरोधात चालकांचा आवाज
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील शिंदेंच्या शिवसेनेत
Manikrao Kokate : क्रीडा धोरणात खेळाडू हिताला प्राधान्य - विभागीय संवादात मंत्री माणिक कोकाटे यांची ग्वाही
ऑलिम्पिक! कुस्तीसह अन्य आठ खेळ मतदानास पात्र, केंद्रीय मंत्री व माजी खासदारांची यशस्वी शिष्टाई
Nagpur Dhammachakra Pravartan Din Special Trains : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरला जाताय? मग हे वाचाच...
Devendra Fadnavis : अहिल्यानगरमध्ये दोन गटात तणाव; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "या घटनेच्या पाठिमागे…"
कुणी मनुष्यबळ देता का मनुष्यबळ?... सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्लेसमेंट सेलमध्येच ‘प्लेसमेंट’ कमी!
पिंपरी-चिंचवड : निळ्या पूररेषेत १,६८६ अनधिकृत बांधकामे! खरेदी-विक्रीचे व्यवहार करू नका; महापालिकेचे आवाहन
नवी मुंबईतील दस्त घोटाळ्यावर उद्या निर्णायक बैठक
छप्पराविना मेट्रोचे प्रवेशद्वार... हुतात्मा चौक स्थानकाच्या रचनेवरून ‘एमएमआरसीवर’ टीका
दक्षिण कोरियातील ‘आयर्नमॅन’ स्पर्धेत बुलढाण्याचा डंका, ॲड. शरद राखोंडे यांनी १४ तासात पूर्ण केली महाकठिण स्पर्धा
हिरव्या पाकड्यांची भूमिका म्हणजे संजय राऊत यांची भूमिका - आशिष शेलार
भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या क्रिकेट सामन्यावरून टीका करणाऱ्या शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांना भाजपाचे नेते आषिश शेलारांनी उत्तर दिले आहे. हिरव्या पाकड्यांची भूमिका म्हणजे संजय राऊत यांची भूमिका अशी टीका आशिष शेलार यांनी संजय राऊतांवर टीका केली. जिंकलेल्या भारताचे दुःख त्यांना झाले आहे. कडक संदेश पाकला दिला गेला आहे. ते घाबरलेल्या मनस्थितीत ते आहेत.-हिंदुस्थान जिंकल्याची राऊतांना पोटदुखी आहे. इराणमध्ये राष्ट्राध्यक्ष शोधत आहे, राऊत तुम्ही अर्ज करा, तुम्हाला स्थान मिळेल, अशी खोचक टीका देखील शेलारांनी यावेळी केली
Ind Vs Pak Asia Cup : "तुमच्या रक्तात एवढी देशभक्ती असती तर…", संजय राऊत टीम इंडियावर भडकले, नक्वींबरोबरचा 'तो' Video केला शेअर
"इंदिरा गांधींनी रा. सू. गवईंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, काँग्रेसमध्ये जाण्यास विरोध केल्यामुळे….", राजेंद्र गवईंचा गौप्यस्फोट
Video : रानगव्यानेच दिले वाघाला आव्हान, अन् वाघाची पळता भूई थोडी..
ऊस गाळपावरून मराठवाडा विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र अशी विभागणी
स्वरांनी लतादीदींना असेही अभिवादन, दहा तासांमध्ये १०१ गीतांचे सादरीकरण
डहाणू : शेतकऱ्याचा पूराच्या पाण्यात वाहून मृत्यू
"शेतकऱ्यांच्या मेहनत, धैर्य आणि निष्ठेची साक्षीदार... ", फडणवीसांनी शेअर केला बैलगाडी हाकतानाचा फोटो
राज्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री वेगवेगळ्या भागांचा दौरा करत आहेत. यादरम्यान फडणवीसांनी यवतमाळ येथे बैलगाडी हाकतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. "यवतमाळ दौर्यावर असताना बैलगाडी हाकण्याची संधी मिळाली! शेतकऱ्यांची बैलगाडी म्हणजे त्याच्या जीवनाची ओळख... शेतकऱ्यांच्या मेहनत, धैर्य आणि निष्ठेची साक्षीदार... " असं कॅप्शन मुख्यमंत्र्यांनी या फोटोला दिले आहे.
पिंपरी- चिंचवड राष्ट्रवादी शहर कार्यकारणी दसऱ्याच्या मुहूर्तावर!; अनेक महिन्यापासून रेंगाळत असलेली कार्यकारणी मार्गी लागणार
पिंपरी- चिंचवड: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सकाळी सात वाजता पिंपरी- चिंचवडमध्ये दाखल झाले होते. पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेत विविध विषयांवर बैठक घेतली. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल आणि माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासोबत चर्चा करून दसऱ्याच्या मुहूर्तावर शहर कार्यकारणी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती अजित गव्हाणे यांनी दिली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रेंगाळत असलेली शहर कार्यकारणी अखेर जाहीर होणार आहे.
नदी सुधार प्रकल्पाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न
पिंपरी- चिंचवड: पुणे महापालिका आणि पिंपरी- चिंचवड महापालिका नदी सुधार प्रकल्प समन्वयाने राबवत आहेत. हा प्रकल्प राबवत असताना मुळा व मुठा नदीवरील पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्या, नदी स्वच्छता, जलप्रवाहातील अडथळे दूर करण्यासह पूरस्थिती नियंत्रणाच्या दृष्टिने उपाययोजना राबवाव्यात, सर्व विभागांनी यापूर्वीसारखेच समन्वय ठेवून काम करावेत असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.
टिळकरनगरमधील इमारतीचा पुनर्विकास १५ वर्षांनंतरही अपूर्णच! म्हाडानेही असमर्थता दर्शविल्याने रहिवाशी हतबल
विभक्त पत्नीचा नांदण्यास नकार…पतीने उशीने तोंड दाबून केली हत्या
कूपर रुग्णालयात श्वानदंशावरील इंजेक्शनचा तुटवडा
पावसाने झोडपले, तरी ठाणेकरांवर पाणी टंचाईचे संकट! हे आहे पाणी कपातीचे मूळ कारण…
गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांना होणारा त्रास एका मिनिटात संपेल असा टोला इम्तियाज जलील यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षावर केली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुराची परिस्थिती आहे. यापार्श्वभूमीवर त्यांनी सोलापुरातील पूरग्रस्त तिऱ्हे गावाला भेट दिली. यावेळी एमआयएम पक्षाकडून पूरग्रस्त भागांना मदत केली जात आहे.
सरकारकडून पूरग्रस्त लोकांची जी अपेक्षा आहे, ती पूर्ण झाली नाही. राज्यात पूरग्रस्त भागात मंत्र्यांचे दौरे आणि फोटोसेशन आहे ते बंद करावेत. सध्याच्या घडीला मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यात गुगल मॅपच्या माध्यमातून पूरस्थितीची पाहणी करावी, आणि गुगल मीटिंगमध्ये निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांना मदत करता येईल ते बघावे. पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे खूप हाल होत आहेत, सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात होतात. ही सर्वांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे, असेही त यावेळी म्हणाले.