Mumbai Maharashtra Today, 31 August 2023: भारताची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबईत आज आणि उद्या ‘इंडिया’ आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीला २८ राजकीय पक्षांचे एकूण ६३ प्रतिनिधी हजर राहणार आहेत. यामध्ये ११ मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गज नेते मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईतील ‘ग्रँड हयात’ हॉटेलमध्ये ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत नेमके काय निर्णय घेतले जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दुसरीकडे, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिर्डी, प्रवरानगर दौऱ्यावर जाणार आहेत. दोन्ही नेते प्रवरानगर येथील ‘राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार’ सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. तसेच आज मुंबईत जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं जाणार आहे. नीती आयोगाच्या बैठकीतील निर्णयावरून शरद पवार गट आक्रमक झाला आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर वाचा…

Clash between mahayuti Aghadi activists in Sakharle near Islampur
Lok Sabha Election 2024 Phase 3 : इस्लामपूरजवळ साखराळेत युती-आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
wins 1 seat more than TMC Bengal BJP chief
TMC पेक्षा १ जागा जास्त जिंकलो तरी ममता सरकार पडेल; बंगाल भाजपा प्रमुखांचा दावा
lok sabha 2024, devendra fadnvis, vijay Wadettiwar, devendra fadnvis not criticise vijay Wadettiwar, vijay Wadettiwar not criticise devendra fadnvis , vijay Wadettiwar bjp entry, dharmrao baba aatram, vijay Wadettiwar bjp entry discussions, congress, state opposition leader
देवेंद्र फडणवीस, विजय वडेट्टीवारांचे प्रचारादरम्यान एकमेकांबद्दल मौन का? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
kolhapur lok sabha seat, sangli lok sabha seat, Shaktipeeth mahamarg, farmers opposing, main election campgain topic, maha vikas aghadi,congress, bjp, shivsena, ncp, land acquisition mahayuti,
शक्तिपीठ महामार्गावरून शेतकऱ्यांमध्ये संतापाचा निवडणुकीत राजकीय वापर
Live Updates

Marathi Breaking News : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

18:47 (IST) 31 Aug 2023
सार्वजनिक गणेश मंडळांना घरगुती दराने वीजपुरवठा; अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे गणेश मंडळांना आवाहन

नवी मुंबई: गणेश मंडळांना महावितरणकडून तात्पुरत्या स्वरुपात आणि त्वरित वीजजोडणीची सुविधा उपलब्ध केली आहे. या जोडणीसाठी घरगुती वीजदर आकारण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा...

18:26 (IST) 31 Aug 2023
येवला तालुक्यात दुकानातून एक कोटीची लूट; एक संशयित ताब्यात, दोन जण फरार

नाशिक: शहराप्रमाणेच जिल्ह्यातील ग्रामीण भागातही चोरी, लुटमारीच्या घटनांमध्ये आता वाढ होऊ लागली असून येवला तालुक्यातील देवळाणे येथे भ्रमणध्वनी दुकानातून भ्रमणध्वनींसह रोख रक्कम असा सुमारे एक कोटी रुपयांचा मुद्देमाल लुटण्यात आला.

सविस्तर वाचा...

18:18 (IST) 31 Aug 2023
पनवेल व कामोठेमध्ये प्लास्टिकवर कारवाई

पनवेल : महापालिका क्षेत्रात कामोठे आणि नवीन पनवेल येथे 78 किलो वजनाचे प्लास्टिक चमचे, प्लास्टिक डबे, कॅरीबॅग जप्त करुन ३५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कामोठेमधील कारवाईत ७० किलो प्लास्टिक पिशवी, ग्लास, आणि कंटेनर जप्त करून १५ हजार रुपये दंड वसुल केला. आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी शिवानंद बासमते यांच्या पथकाने कारवाई केली. तसेच नवीन पनवेल, पनवेल विभागामधील कारवाईत 20 हजार रुपये दंड वसुल करण्यात आला.

18:07 (IST) 31 Aug 2023
अबब! तब्बल २७ गावठी बॉम्‍ब सापडले; अचलपूर तालुक्‍यात कशासाठी आणली होती स्फोटके? वाचा सविस्तर…

अमरावती: परतवाडा नजीक पोलिसांना २७ गावठी बॉम्‍ब सापडल्‍याने अचलपूर तालुक्‍यात खळबळ उडाली आहे.

सविस्तर वाचा...

17:57 (IST) 31 Aug 2023
"...याच पैशातून अदाणी देशाची संपत्ती खरेदी करतायत", पंतप्रधान मोदींचा उल्लेख करत राहुल गांधींचा गंभीर आरोप

मुंबईतील 'इंडिया' आघाडीच्या बैठकीआधी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अदाणी समूहाचे प्रमुख गौतम अदाणी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी राहुल गांधी म्हणाले, जी-२० परिषदेच्या निमित्ताने वेगवेगळ्या देशातील नेते सध्या भारतात येत आहेत. आज सकाळी एक गंभीर प्रकरण समोर आलं आहे. द गार्डीयन आणि Financial times सारख्या जगातील दोन प्रसिद्ध वृत्तपत्रांनी मोठं वृत्त दिलं आहे.

"पंतप्रधान मोदी यांच्या जवळच्या एका कुटुंबाने आपल्याच शेअर्समध्ये पैसे गुंतवले. म्हणजे अदाणींच्या कंपनीच्या नेटवर्कद्वारे एक बिलीयन डॉलर्स (अंदाजे ८२७० कोटी) भारतातून वेगवेगळ्या देशात गेले आणि पुन्हा भारतात आले. त्या पैशांच्या माध्यमातून अदाणींनी आपल्या कंपनीचे शेअर्स वाढवले. यातून मिळणाऱ्या नफ्यातून अदाणी विमानतळं, बोटी विकत घेत आहेत. आता त्यांना धारावीतील मोठा प्रकल्प मिळाला आहे. सध्या अदाणी देशाची संपत्ती याच पैशातून खरेदी करत आहेत. यावरच या वृत्तपत्रांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे" असं राहुल गांधी म्हणाले.

17:51 (IST) 31 Aug 2023
नागपुरातील ‘बीआयएस’ चमूकडून जालनातील बाटलीबंद पाणी उत्पादकावर छापा

नागपूर: ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (बीआयएस)च्या नागपूर शाखेच्या चमूने जालना जिल्ह्यातील पारडगाव रोड येथील मेसर्स प्रयाग फूड प्राॅडक्स या बाटलीबंद पाणी उत्पादकावर छापा टाकला.

सविस्तर वाचा...

17:34 (IST) 31 Aug 2023
मांडवा - गेटवे जलवाहतुक १ सप्टेंबरपासून सुरू होणार; मेरीटाईम बोर्डाचा हिरवा कंदील

अलिबाग – मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यानची फेरीबोट जलवाहतूक सेवा १ सप्टेंबरपासून सुरु करण्यास मेरीटाईम बोर्डाने अनुमती दिली आहे.

सविस्तर वाचा...

17:24 (IST) 31 Aug 2023
पावसाने दडी मारल्याने सीताफळाची वाढ खुंटली, एपीएमसीत दाखल होतायेत लहानगे सीताफळ; दर्जात्मक उत्पादनासाठी पावसाची प्रतिक्षा

एपीएमसी बाजारात ९०% आकाराने लहान तर १०% मोठ्या आकाराची सीताफळ दाखल होत आहेत. त्यामुळे दर्जात्मक उत्पादनासाठी पावसाची प्रतीक्षा केली जात आहे.

सविस्तर वाचा...

16:57 (IST) 31 Aug 2023
बुलढाणा : धोकादायक ‘डेंग्यू’चे ४५ रुग्ण आढळले, ८ तालुक्यात प्रादुर्भाव, मेहकरमध्ये युवतीचा मृत्यू?

दुर्लक्ष वा उपचारात हयगय केल्यास अंतिम स्थितीत धोकादायक ठरु शकणाऱ्या डेंग्यूचा जिल्ह्यातील ८ तालुक्यात प्रादुर्भाव झाल्याचे वृत्त आहे. सध्यस्थितीत या रोगाचे तब्बल ४५ रुग्ण आढळून आले आहे.

सविस्तर वाचा...

16:16 (IST) 31 Aug 2023
बुलढाणा: दोन एकर सोयाबीनवर फिरवला ट्रॅक्टर; हुमणी अळीमुळे शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

बुलढाणा: अपुरा पाऊस, मागील पंधरा दिवसांपासून वरुण राजाने मारलेली दडी अन यावर कळस म्हणजे हुमणी अळीचा झालेला भीषण प्रकोप यामुळे निराश झालेल्या शेतकऱ्याने दोन एकरातील सोयाबीनवर ट्रॅक्टर फिरवला. वाढ खुंटलेल्या अळीग्रस्त सोयाबीनमध्ये त्याने जनावरे चरण्यास सोडली आहे.

सविस्तर वाचा...

15:58 (IST) 31 Aug 2023
उरणमध्ये स्वच्छतेचे तीनतेरा, ग्रामपंचायतीचा रस्त्यावर कचरा; रस्त्यावरील वाढत्या घाणीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

कचऱ्याच्या घाणीने निर्माण होणाऱ्या दुर्गंधीमुळे उरणमधील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सविस्तर वाचा...

15:57 (IST) 31 Aug 2023
अमरावती : रक्‍कम परत मिळवून देण्‍याच्या नावावर ९४ हजारांनी गंडविले; ‘हे’ ॲप मोबाइलमध्ये इन्स्टॉल केले अन्..

अमरावती : ऑनलाइन केलेली ऑर्डर रद्द झाल्यानंतर रक्‍कम परत मिळवून देण्याच्या नावावर एका महिलेला ९४ हजार २३७ रुपयांनी गंडविण्यात आले. ही घटना फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून संबंधित मोबाइल क्रमांकधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

15:57 (IST) 31 Aug 2023
प्रदूषण करणाऱ्या ६५ रासायनिक कंपन्यांवर प्रदूषण मंडळाचा कारवाईचा बडगा

शहरालगत असलेल्या औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कंपन्यामधून होत असलेल्या जल आणि वायू प्रदूषण विरोधात प्रदूषण मंडळाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

सविस्तर वाचा...

15:56 (IST) 31 Aug 2023
अमरावती : रक्‍कम परत मिळवून देण्‍याच्या नावावर ९४ हजारांनी गंडविले; ‘हे’ ॲप मोबाइलमध्ये इन्स्टॉल केले अन्..

अमरावती : ऑनलाइन केलेली ऑर्डर रद्द झाल्यानंतर रक्‍कम परत मिळवून देण्याच्या नावावर एका महिलेला ९४ हजार २३७ रुपयांनी गंडविण्यात आले. ही घटना फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून संबंधित मोबाइल क्रमांकधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा..

15:56 (IST) 31 Aug 2023
नाशिक जिल्हा बँक वाचविण्यासाठी हालचाली, भाग भांडवलाबाबत राज्य सरकार हमी देण्याच्या तयारीत

सध्या ही बँक ९०९ कोटींच्या तोट्यात आहे. नाबार्डने बँकेला बँकिंग परवाना रद्द करण्याबाबत अंतिम नोटीस पाठवली आहे.

सविस्तर वाचा...

15:42 (IST) 31 Aug 2023
मुसळधार पाऊस, दुथडी भरून वाहणारे नदी-नाले, पूरपाणी दुर्लभ; परतीच्या पावसावर संपूर्ण भिस्त

नाशिक: सुरुवातीला रिमझिम स्वरुपात कधीतरी हजेरी लावणारा पाऊस महिनाभरापासून गायब आहे. यंदाच्या हंगामात आजतागायत मुसळधार पावसाची अनुभूती शहरवासीयांसह अनेक भागास मिळालेली नाही.

सविस्तर वाचा...

15:42 (IST) 31 Aug 2023
कोल्हापुरात राष्ट्रवादीतील संघर्षाचा भाग – २ रविवारी

कोल्हापूर : शरद पवार यांच्या सभेनंतर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी तेथेच सभा घेण्याच्या अजित पवार गटाच्या योजनेनुसार येत्या रविवारी कोल्हापूरमध्ये सभा होणार आहे. शरद पवारांपेक्षा अजित पवारांची सभा अधिक मोठी करण्याचा प्रयत्न स्थानिक नेते हसन मुश्रीफ यांनी सुरू केला आहे.

सविस्तर वाचा...

15:26 (IST) 31 Aug 2023
मांज्यामुळे जायबंदी झालेला ‘ब्लॅक ईगल’ नैसर्गिक अधिवासात मुक्त; पायाला रिंग लावून घेतली भरारी..

नागपूर : राजस्थान, गुजरातसहीत हिमालयाच्या पायथ्याशी आढळणारा ‘ब्लॅक ईगल’ काही महिन्यांपूर्वी नागपुरात आला आणि मांज्यामुळे त्याला एक पंख गमवावा लागला. मात्र, येथील ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’मध्ये त्याच्यावर उपचार झाले आणि पुन्हा एकदा हा दुर्मिळ पक्षी उडण्यास सक्षम झाला.

सविस्तर वाचा..

15:09 (IST) 31 Aug 2023
"जुडेगा भारत, जीतेगा इंडिया", मुंबईत दाखल होताच मेहबूबा मुफ्तींची घोषणा

पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती या 'इंडिया' आघाडीच्या तिसऱ्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मुंबईत दाखल झाल्या. यावेळी मेहबूबा मुफ्ती यांनी "जुडेगा भारत, जीतेगा इंडिया" अशी घोषणा दिली.

https://twitter.com/ANI/status/1697144443810570454

14:38 (IST) 31 Aug 2023
वातावरण बदलाचे जमिनीवर परिणाम; नागपूरच्या राष्ट्रीय संस्थेकडून राज्यातील पाच हजार गावांत संशोधन

नागपूर : नागपूरच्या नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्व्हे अँड लँड युज प्लॅनिंग (एनबीएसएसएलयूपी) या संस्थेद्वारे महाराष्ट्रातील पाच हजार गावांमध्ये वातावरण बदलास अनुकूल माती संशोधन केले जात आहे.

सविस्तर वाचा...

14:26 (IST) 31 Aug 2023
नंदुरबार जिल्ह्यात आदिवासींच्या सामाजिक स्थितीचे सर्वेक्षण, प्रायोगिक तत्वावरील प्रकल्प

प्रायोगिक तत्वावर नंदुरबार जिल्ह्यात सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली असून आठ महिन्यात हे सर्वेक्षण पूर्ण केले जाईल.

सविस्तर वाचा...

14:25 (IST) 31 Aug 2023
धुळे मनपातील कामचुकार कर्मचाऱ्यांना दणका, आयुक्तांकडून कारवाईची शक्यता

महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील यांनी आपल्या प्रशासकीय कामकाजाच्या पद्धतीचा पहिला झटका कामचुकार, दांडीबहाद्दर आणि ओळखपत्र न वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिला आहे.

सविस्तर वाचा...

14:24 (IST) 31 Aug 2023
जळगाव जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती; १३ गावांना १५ टँकरद्वारे पाणी पुरवठा

पावसाअभावी जिल्ह्यातील लहान-मोठ्या प्रकल्पांत सरासरीपेक्षा कमी म्हणजे ४२.५३ टक्के जलसाठा असून, अग्नावती आणि हिवरा हे मध्यम प्रकल्प कोरडेठाक आहेत.

सविस्तर वाचा...

14:23 (IST) 31 Aug 2023
कांदा निर्यात शुल्काचा फेरविचार करा, पियुष गोयल यांना साकडे

प्रारंभी डाॅ. पवार यांनी कांदा शुल्क निर्णयाचे समर्थन केले होते. परंतु, शेतकऱ्यांमधील रोष लक्षात घेऊन त्यांनी निवेदनातून शेतकऱ्यांची भावना मांडली आहे.

सविस्तर वाचा...

14:21 (IST) 31 Aug 2023
मोबाईल चोरीची तक्रार देण्यास गेला… आणि सुखद धक्का बसला… वाचा नेमके काय घडले

गावी असताना एपीएमसी पोलिसांनी तीन मोबाईल चोरांना अटक केली असून अनेक मोबाईल जप्त केल्याची बातमी त्यांच्या वाचनात आली.

सविस्तर वाचा...

14:19 (IST) 31 Aug 2023
आदई धबधब्यात पाय घसरून पडल्याने मामा, भाच्याचा मृत्यू

तालुक्यातील आदई धबधब्यावर पाय निसटून सूकापूर येथे राहणाऱ्या मामा, भाच्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. या घटनेमध्ये प्रदीप कामी (वय ७ वर्ष) आणि पारस बाकी (वय ३५ वर्ष) या मामा भाच्याचा मृत्यू झाला आहे.

सविस्तर वाचा...

14:18 (IST) 31 Aug 2023
"मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्यासाठी हे केंद्राचं पहिलं पाऊल", जयंत पाटलांचा गंभीर आरोप

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील म्हणाले की, मुंबईच्या विकास आराखड्याचे काम केंद्राच्या नीती आयोगाकडे सोपवणे म्हणजे महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न आहे. केंद्राचा हा निर्णय म्हणजे महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा डाव आहे. कोणत्याही परिस्थितीत मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे होऊ देणार नाही. मुंबईला महाराष्ट्रात ठेवण्यासाठी आम्ही पडेल ती किंमत देऊ. हुतात्म्यांच्या बलिदानाने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला आहे. हे बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटलं.

जयंत पाटील पुढे म्हणाले की, आधीच्या काळामध्ये नियोजन आयोग होता. आता त्याच रूपांतर नीती आयोगात करण्यात आलेल आहे. पण हे आयोग फक्त मार्गदर्शनाचं काम करतात केंद्रशासित प्रदेश करण्यासाठी पहिली स्टेप ही अशा पद्धतीने केली जाते, असे आम्हाला वाटतं. कारण अशा पद्धतीने आर्थिक नाड्या अडकवायचा प्रयत्न केला जात आहे. मुंबईकर सावध आहे. देशातील सध्या चालू असलेल्या घाणेरड्या राजकारणाला साथ देण्याचा निर्णय जर राज्य सरकार घेणार असेल तर त्यांना वेळीच रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबईकर जनतेच्या मागे उभी राहील, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे

14:15 (IST) 31 Aug 2023
खळबळजनक! भंडारा अर्बन बँकेच्या अधिकाऱ्याची आत्महत्या; निवृत्तीला दोन दिवस उरले असताना उचलले टोकाचे पाऊल

भंडारा : भंडारा अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचे वसुली अधिकारी बन्सीधर कारेमोरे (५८) यांनी निवृत्तीला दोन दिवस असतानाच वैनगंगा नदीत उडी मारून आत्महत्या केली. कारेमोरे यांचा मृतदेह तब्बल ३० तासांनंतर, बुधवारी सायंकाळी ५ वाजता गणेशपूर स्मशानभूमीजवळ नदीपात्रात आढळून आला. या घटनेमुळे बँक वर्तुळासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

सविस्तर वाचा..

14:04 (IST) 31 Aug 2023
संघर्ष यात्रा ते तीर्थयात्रा मार्गे अंतर्गत धुसफूस…

छत्रपती संभाजीनगर : अजित पवार व त्यांचे सहकारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेल्या अस्वस्थेच्या काळात पंकजा मुंडे यांची आता ‘तीर्थ’यात्रा निघणार आहे. ४ सप्टेंबरपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून या यात्रेला सुरुवात होईल.

सविस्तर वाचा...

12:42 (IST) 31 Aug 2023
“इंडिया आघाडीला विरोधी पक्षनेता बनवता येईल एवढ्याही जागा मिळणार नाही,” भाजपा प्रदेशाध्यक्षांची टीका; म्हणाले..

नागपूर : इंडिया आघाडीच्या बैठका केवळ नावापुरत्या आहेत. उद्या निवडणुका झाल्या तर यांना विरोधी पक्षनेता बनवता येईल एवढ्या जागा मिळणार नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ते नागपुरात बोलत होते.

सविस्तर वाचा...

12:34 (IST) 31 Aug 2023
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी 'या' दिवशी होणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ओबीसी आरक्षणाबाबतची सर्वोच्च न्यायालयातील याचिकेची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली आहे. ही सुनावणी १ सप्टेंबरला होणार होती. मात्र, कामकाजाच्या वेळापत्रकात या याचिकेचा समावेश नसल्याने ही सुनावणी आता नंतर होणार आहे. यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडल्या आहेत.

सविस्तर वाचा...

12:33 (IST) 31 Aug 2023
"शिंदे-फडणवीस यांनी अजित पवार यांचे पंख छाटले"; विजय वडेट्टीवार म्हणाले, "एखाद्याला जेवायला..."

अजित पवार यांच्याकडून फाईल थेट मुख्यमंत्र्यांकडे न जाता फडणवीस यांच्या माध्यमातून जाणार आहे. हा एक प्रकारे अजित पवारांचे पंख छाटण्याचाच प्रयत्न असल्याची कुजबुज मंत्रालयाच्या वर्तुळात सुरू आहे. यावर आता काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली.

सविस्तर वाचा...

12:32 (IST) 31 Aug 2023
विश्लेषण : अप्पर वर्धा धरणग्रस्तांचा संघर्ष कधी संपणार?

गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्तांनी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी मंगळवारी मुंबईत मंत्रालयातील दुसऱ्या मजल्यावरील सुरक्षा जाळीवर उड्या मारून आंदोलन केले. या प्रकल्पग्रस्तांचे नेमके प्रश्न काय आहेत, त्यावर अद्याप तोडगा का निघू शकला नाही, याची चर्चा आता सुरू झाली आहे.

सविस्तर वाचा...

12:32 (IST) 31 Aug 2023
विश्लेषण : झोपु योजनेतील सदनिका वितरणातील बदल काय?

झोपु योजनेत पारदर्शकता येईल असा दावा केला जात आहे. ही ऑनलाइन सोडत नेमकी कशी असेल आणि त्यामुळे झोपडीधारकांना कसा फायदा होईल याचा हा आढावा…

सविस्तर वाचा...

12:11 (IST) 31 Aug 2023
रेल्वे मालवाहतूक क्षमता वाढीसाठी लांब पल्ल्याच्या गाड्यांचा प्रयोग, पाच महिन्यांत ५७ गाड्या धावल्या

अकोला : मध्य रेल्वेकडून गेल्या पाच महिन्यांत ५७ लांब पल्ल्याच्या मालवाहतूक गाड्या चालविल्या जात आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्या चालवण्यामुळे रेल्वे विभागांमध्ये क्षमतेच्या कमतरतेच्या समस्येवर अतिशय प्रभावी उपाय मिळतो. अधिक गाड्यांसाठी ‘लूप लाईन’ तयार केली जात आहे. यामध्ये भुसावळ विभागातून २३, तर नागपूर विभागातून ३४ लांब पल्ल्याच्या गाड्या सोडल्या जात आहेत.

सविस्तर वाचा...

11:36 (IST) 31 Aug 2023
मेडिकल रुग्णालयात अनोखे रक्षाबंधन, चंद्रभागेत सापडलेल्या शंकरबाबांच्या मानस कन्येने बांधली डॉक्टरांना राखी

नागपूर : पंढरपूरच्या चंद्रभागा नदीपात्रात सापडलेल्या अपंग मुलीला (रूपा) समाजसेवक शंकरबाबा पापडकर यांनी स्वत:चे नाव देत तिचे पालन केले. रुपाची प्रकृती खालावल्यावर तिला मेडिकल रुग्णालयात दाखल केले गेले. येथे तिच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा झाली असून येथे सर्वच डॉक्टर तिच्यावर विशेष लक्ष देत आहेत. रक्षाबंधनाला रुपाने मेडिकलच्या निवासी डॉक्टरांना राखी बांधली.

सविस्तर वाचा...

11:36 (IST) 31 Aug 2023
धक्कादायक! सिगारेटचे चटके देऊन चिमुकलीचा अनन्वित छळ, घरकामासाठी परराज्यातून आणले

नागपूर : पिपळा-बेसा रोडवरील अथर्व नगरीतील एका सदनिकेत राहणाऱ्या एका दाम्पत्याने घरी काम करण्यासाठी आणलेल्या ७ वर्षीय मुलीच्या छातीला आणि खासगी जागेवर सिगारेटचे चटके देऊन अनन्वित छळ केला.

सविस्तर वाचा..

11:31 (IST) 31 Aug 2023
नवरा-बायकोतील वादाचा भयानक अंत! सासरच्‍यांनीच केली जावयाची हत्‍या; रहस्‍यमय हत्‍याकांडाचा अखेर उलगडा

अमरावती: सासरच्यांनी जावयाची मान पिरगळून हत्या केल्‍याची घटना चिखलदरा पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीत उघडकीस आली आहे. ही घटना गेल्‍या १४ जून रोजी चुनखडी येथे घडली होती. आपल्या पतीला माहेरकडील लोकांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली होती.

सविस्तर वाचा...

11:22 (IST) 31 Aug 2023
‘मॅट’चे नागपूर विभागीय खंडपीठ बंद असल्याने दोन हजारांवर प्रकरणे प्रलंबित; कारण काय, वाचा…

राज्यातील उच्च न्यायालयावरील भार कमी व्हावा तसेच राज्यातील प्रशासकीय बाबींचे वाद लवकर सुटावे, या उद्देशाने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाची (मॅट) स्थापना करण्यात आली.

सविस्तर वाचा...

11:09 (IST) 31 Aug 2023
"महाराष्ट्रात उबाठा वाजत गाजत...", भाजपा नेत्याची बोचरी टीका

मुंबईत डरपोकांचा मेळावा "घमेंडीया" नावाने संपन्न होत आहे. ज्यांनी ज्यांनी काल-परवा पर्यंत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राचा द्वेष केला... ज्या काँग्रेसने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान केला, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हुतात्म्यांवर गोळ्या झाडल्या, अशा सगळ्यांचे महाराष्ट्रात उबाठा वाजत गाजत जोरदार स्वागत करीत आहे. महाराष्ट्राचा द्वेष करणाऱ्यांना मोदक आणि पंचपक्वान्नाचे पंचतारांकित जेवण घालून त्यांची तोंडं गोड करीत आहेत. पंगती बसू दे आणि जेवणावळीही उठू दे... फक्त काल-परवा पर्यंत स्वाभिमानाने जगणाऱ्यांना... महाराष्ट्र द्रोह्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या उचलताना जनाची नाही, किमान मनाची तरी वाटू दे!

https://twitter.com/ShelarAshish/status/1697118157956428188

11:04 (IST) 31 Aug 2023
उमदी शाळेतील विषबाधा प्रकरणी मुख्याध्यापकासह चौघे निलंबित; गुन्हा दाखल

सांगली: उमदी (ता. जत) येथील आश्रमशाळेतील विषबाधेप्रकरणी संस्थेच्या सचिवासह पाच जणांविरुध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून समाज कल्याण विभागाने चौघांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

सविस्तर वाचा...

10:56 (IST) 31 Aug 2023
पिंपरी महापालिकेतील ‘या’ पदांच्या ३५३ जागांचा निकाल जाहीर

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागातील ३८८ जागांसाठी राज्यातील २६ शहरातील ९८ केंद्रांवर टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) माध्यमातून २६, २७ आणि २८ मे रोजी परीक्षा झाली.

सविस्तर वाचा...

10:53 (IST) 31 Aug 2023
ताडोबात व्याघ्र पर्यटनासाठी आता सहा विशेष वाहने, १ ऑक्टोबरपासून पर्यटकांसाठी उपलब्ध

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना नाममात्र दरात जिप्सीसारख्या वाहनात बसून व्याघ्र पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे.

सविस्तर वाचा...

10:52 (IST) 31 Aug 2023
ठाण्यात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याची हत्या

अक्षय ठुबे हे वसंत विहार येथील धर्मवीर नगर परिसरात राहतात. ते शिंदे गटात असून तेथील उपशाखा प्रमुख आहेत.

सविस्तर वाचा...

10:51 (IST) 31 Aug 2023
उरण : खारकोपर लोकलवरील गव्हाण स्थानक अपूर्णच; काम पूर्ण होण्यासाठी आणखी काही महिने लागणार

उरण ते खारकोपर लोकल सेवा सुरू होण्याची उत्सुकता वाढलेली असतानाच उरणच्या प्रवासी व नागरिकांची ही सेवा लवकरात लवकर सुरू व्हावी, अशी इच्छा आहे.

सविस्तर वाचा...

10:50 (IST) 31 Aug 2023
गडचिरोली : शालेय शिक्षणातून ‘फुलोरा’ उपक्रप वगळा, शिक्षकांसह मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचाही विरोध

गडचिरोली : जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पहिली ते आठव्या वर्गासाठी सुरू केलेला ‘फुलोरा’ हा उपक्रम विद्यार्थ्यांना अभासक्रमापासून दूर नेणारा आहे. त्यामुळे सदर उपक्रम बंद करण्यात यावा, असे निर्देश राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांना पत्र लिहून दिले आहे.

सविस्तर वाचा...

10:49 (IST) 31 Aug 2023
खळबळजनक! आमदाराच्या आश्रमशाळेत मुलाचा मृतदेह आढळला

वर्धा : कारंजा तालुक्यातील नारा येथील यादवराव केचे आदिवासी आश्रमशाळेत शिवम उईके या बारा वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तो मेळघाट येथील डोमा गावचा रहिवासी होता.

सवस्तर वाचा...

10:48 (IST) 31 Aug 2023
नागपूर मेट्रोच्या पुलाला तडे, गाडीचा वेग मंदावला!

नागपूर : बांधकामाच्या क्षेत्रात अनेक पुरस्कार पटकावणाऱ्या महामेट्रोला आता कामातील त्रुटींमुळे नामुष्कीला तोंड द्यावे लागत आहे. नागपुरात कामठी मार्गावर गड्डीगोदाममधील आणि वर्धा मार्गावरील मेट्रोच्या पुलाला तडे गेल्याने त्यावरून धावणाऱ्या मेट्रोची गती कमी करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा..

10:35 (IST) 31 Aug 2023
छाती व पोटातील अवयव विरुद्ध दिशेला; दुर्मीळ जनुकीय समस्या असलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया

पुणे : पोटदुखीचा त्रास होत असल्याने एक रुग्ण रुग्णालयात आला. त्याची तपासणी केल्यानंतर त्याचे छाती व पोटातील अवयव सर्वसाधारणा व्यक्तीच्या विरुद्ध दिशेला असल्याचे निदर्शनास आले. ही दुर्मीळ जनुकीय समस्या असून, तिला साईटस इर्न्व्हसस असे म्हणतात.

वाचा सविस्तर...

10:35 (IST) 31 Aug 2023
सौदी अरेबियात व्यवसाय सुरू करण्याच्या आमिषाने ‘अशी’ झाली लाखोंची फसवणूक

पुणे : सौदी अरेबियात व्यवसाय सुरू करण्याच्या आमिषाने एका व्यावसायिकाची ९० लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वाचा सविस्तर...

mahavikas aghaadi

मुंबईतील 'इंडिया' आघाडीच्या बैठकीपूर्वी महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली...