Maharashtra Political New Live Updates, 13 November 2025: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे, यामध्ये पहिल्या टप्प्यात राज्यातील नगरपंचायती आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी अर्ज दाखल करण्याचा आज चौथा दिवस आहे, तरीही राज्यातील अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यांवर मतभेद दिसून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर, राज्यातील घडामोडींचा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आढावा घेऊया.

Live Updates

Mumbai Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील विविध घडामोडींचा लाईव्ह आढावा

19:45 (IST) 13 Nov 2025

मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी अभियंत्यांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले

मुंब्रा येथील रेल्वे अपघात प्रकरणी मध्य रेल्वेच्या दोन अभियंत्यांविरोधात ठाणे लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. ...सविस्तर वाचा
19:19 (IST) 13 Nov 2025
पुण्यातील नवले पुलावर झालेल्या दुर्घटनेवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या...

पुण्यातील नवले ब्रीज परिसरात दोन कंटेनरच्या मध्ये कार चेपून आग लागल्याने मोठी हानी झाल्याचे वृत्त अतिशय दुःखद आहे. ही घटना अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे.या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरीकांना भावपूर्ण श्रद्धांजली. जखमींवर उपचार सुरू असून ते लवकर बरे होऊन घरी परत यावे ही ईश्वरचरणी प्रार्थना. दरम्यान या घटनेबाबत मी प्रशासनाच्या संपर्कात आहे, अशी पोस्ट सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

18:37 (IST) 13 Nov 2025
पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात! अनेक जण जखमी झाल्याची माहिती

पुण्यातील नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अपघातानंतर दोन ट्रकना आग लागली होती. दरम्यान अग्निशमक दलाकडून ही आग विझवण्यात आली. ऐन संध्याकाळच्या वेळी झालेल्या अपघातामुळे मुंबई-बंगळुरू महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याची माहिती मिळत आहे.

18:36 (IST) 13 Nov 2025

राज्यातील १ कोटी ५० लाखांहून अधिक नागरिकांची मधुमेहासाठी तपासणी! २८ लाखांहून अधिक रुग्णांवर उपचार…

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत १ जानेवारी ते ३० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत १ कोटी ५० लाख ७९ हजार ८५२ नागरिकांची मधुमेहासाठी तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी २८ लाख ५५ हजार ७०९ नागरिकांवर राज्यात उपचार सुरु आहेत. ...सविस्तर बातमी
18:31 (IST) 13 Nov 2025

दहशतवादी प्रकरणानंतर मुंब्रा चर्चेत का येतो? काय आहे मुंब्रा शहराचा इतिहास…

ठाणे महापालिका क्षेत्रात हा भाग येतो. पूर्वी हा भाग संवेदनशील म्हणून ओळखला जात असे. ...सविस्तर बातमी
18:13 (IST) 13 Nov 2025

"नंतर कशाला, आत्ताच आत्मदहन कर; मी तुला पेट्रोल आणून देतो", नायब तहसीलदाराची अरेरावी, शेतकरी उद्विग्न…

'नंतर कशाला, आत्ताच आत्मदहन कर, मी तुला पेट्रोल आणून देतो' असं उद्धाम उत्तर दिल्याने आज खामगाव तहसील कार्यलयात एकच राडा झाला. ...सविस्तर बातमी
18:02 (IST) 13 Nov 2025

‘विचारा इस्लामविषयी’चे फलक, राजधानीतील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळेंनी मागितला अहवाल

‘विचारा इस्लामविषयी’ या मजकुराचे फलक लागल्याच्या प्रकाराची राज्याचे महसूलमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. ...वाचा सविस्तर
17:52 (IST) 13 Nov 2025

विक्रोळीत विकासकामांमुळे धुळीची समस्या वाढली; सहाय्यक आयुक्तांना प्राणवायू सिलिंडर, मुखपट्टी देऊन निषेध

विक्रोळीत सध्या मोठ्या प्रमाणात इमारतींचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे अनेक भागात विशेषतः कन्नमवार नगरात धुळीची समस्या निर्माण झाली आहे. ...वाचा सविस्तर
17:33 (IST) 13 Nov 2025

Vasai Virar Fire News: विरार पुलावर मॅजिक वाहनाला आग, वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले विद्यार्थ्यांचे प्राण

विरार पूर्व पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलावर आज सकाळी शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या टाटा मॅजिक वाहनाला आग लागल्याची घडली. वाहनात झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. ...सविस्तर बातमी
16:56 (IST) 13 Nov 2025

कुष्ठरोग : जिल्ह्यात तीन लाख ७५ हजार ५१२ घरे, १९ लाख ५५ हजार ३८६ नागरिकांच्या तपासणीसाठी १,३७६ सर्वेक्षण पथके

राज्य शासनाच्या आरोग्य सेवा विभागामार्फत धुळे जिल्ह्यात १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ या कालावधीत कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येणार आहे. ...सविस्तर वाचा
16:56 (IST) 13 Nov 2025

डोंबिवलीतील ठाकरे गटाचे शहरप्रमुख, मनसे पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश, मनसेची डोंबिवलीतील तगडी फळी भाजपच्या वाटेवर

ठाकरे गटाचे म्होरके भाजपमध्ये दाखल झाल्याने ठाकरे गटाला डोंबिवलीत खिंडार पडले आहे. ...वाचा सविस्तर
16:51 (IST) 13 Nov 2025

सीआरपीएफ उप महानिरीक्षकाच्या मुलीची आत्महत्या,एम्स पुन्हा हादरले

एम्स वैद्यकीय अभ्यासक्रमाचे पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या आणखी एका विद्यार्थीनीने सायंकाळी तिच्या सदनिकेत गळफास लावून आत्महत्या केली. बुधवारी सायंकाळी हा प्रकार निदर्शनास आल्याने एम्समध्ये खळबळ उडाली आहे ...अधिक वाचा
16:36 (IST) 13 Nov 2025

ठाणे महापालिका अधिकाऱ्यांना ‘स्मृतीदोष’, परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत आयुक्तांनी असं का म्हटलं?

मंत्री सरनाईक यांनी विचारलेल्या प्रश्नांवर अधिकारी निरुत्तर असल्याचे पाहून आयुक्त सौरभ राव हे संतापले आणि त्यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. ...अधिक वाचा
16:34 (IST) 13 Nov 2025

भाजप आमदार बंटी भांगडिया यांना धक्का, समर्थकाचा कॉग्रेसमध्ये प्रवेश

चिमूर नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांना धक्का बसला आहे. त्यांचे कट्टर समर्थक जुनेद खान आणि संतोष गोहणे यांनी कॉग्रेस पक्षात प्रवेश केला. ...वाचा सविस्तर
15:36 (IST) 13 Nov 2025

TET 2025 : इतर राज्ये याचिका करत असताना महाराष्ट्राची टाळाटाळ का? शिक्षक संघटनांचा सवाल; आंदोलनाचा इशारा

सेवेतील शिक्षकांना दोन वर्षांत शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी, या मागणीसाठी राज्यातील शिक्षक संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ...सविस्तर वाचा
15:24 (IST) 13 Nov 2025

"मदतीच्या नावावर केवळ शेतकऱ्यांची फसवणूक केली", रोहित पवार यांची सरकारवर टीका

आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या मतदीवरून महायुती सरकारवर टीका केली आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये रोहित पवार म्हणाले की, "महायुती सरकारने मदतीच्या नावावर केवळ शेतकऱ्यांची फसवणूक केली हे आता हळूहळू समोर येत आहे. राज्यभरात ७० लाख हेक्टर पिकांचं नुकसान झालं, हजारो जनावरं दगावली, बळीराजा अक्षरश: कोलमडून पडला तरी सरकारच्या काळजाला सरसकट ₹५० हजार मदत करण्याचा पाझर फुटलेला नाही."

ते पुढे म्हणाले की, "हेक्टरी ५० हजार तर दिले नाहीतच, पण जी तुटपुंजी मदत दिली त्यात देखील बागायती अनुदानासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना कोरडवाहूप्रमाणे आणि कोरडवाहू शेतकऱ्यांना कुणाला ₹३ तर कुणाला ₹४ हजार अशी तुटपुंजी मदत देऊन तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू आहे. एकप्रकारे शेतकऱ्यांचा विश्वासघात या सरकारने केला असून राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये सरकारच्या या फसवणुकीबाबत संताप आहे. शिवाय अजूनही ना खरडून गेलेल्या जमिनीचे पैसे आले, ना जनावर दगावल्याचे पैसे मिळाले. सरकारने आता तरी अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची चेष्टा करणं बंद करावं आणि त्यांना पुरेशी मदत द्यावी, ही विनंती!"

15:16 (IST) 13 Nov 2025

आमदार सुरेश धस समर्थक ‘खोक्या’ सुटणार !

संतोष देशमुख यांच्या हत्यांकाडानंतर बीड जिल्ह्यात नेते कसे गुंड पाळतात याचे उदाहरण म्हणून खोक्याचा संबंध सुरेश धस यांच्याशी जोडण्यात आला होता. ...सविस्तर वाचा
15:00 (IST) 13 Nov 2025

नवरदेवासह आईच्या अपघाती मृत्यूस वाहन चालक जबाबदार; पोलिसांकडून गुन्हा दाखल....

नागपूर-सुरत महामार्गावर साक्री शिवारात झालेल्या भीषण अपघातात नवरदेवासह त्याची आई आणि आणखी एक व्यक्ती अशा तिघांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ...वाचा सविस्तर
14:54 (IST) 13 Nov 2025

लोणावळ्यात महायुती तुटण्याची शक्यता; माजी मंत्री बाळा भेगडेंचा शेळकेंच्या फॉर्म्युलाला विरोध

लोणावळ्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची दिशाभूल करू नये असं आवाहन माजी मंत्री बाळा भेगडे यांनी आमदार सुनील शेळके यांना केलं आहे. ...अधिक वाचा
14:24 (IST) 13 Nov 2025

रेल्वेत आसनाच्या वादातून प्रवाशावर ‘कात्री’ने वार, प्रवास खरोखर सुरक्षित आहे का?

चोरीच्या घटना अनेकदा एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांमध्ये घडतात. परंतु आता प्रवाशावर हल्ला झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...अधिक वाचा
14:07 (IST) 13 Nov 2025

"हाच निर्णय लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत घेतला असता चित्र खूप वेगळे असते", रोहित पवारांची प्रतिक्रिया चर्चेत

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून निवडणूक आयोगाने पिपाणी (ट्रम्पेट) हे चिन्ह वगळण्याचा निर्णय घेतला आहे. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार रोहित पवार म्हणाले की, "निवडणूक चिन्हातून पिपाणी (ट्रम्पेट) हे चिन्ह वगळल्याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार..! लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या पिपाणीचा खूप मोठा फटका आम्हाला सहन करावा लागला. हाच निर्णय लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत घेतला असता तर आजचं चित्र खूप वेगळं असतं...!

13:28 (IST) 13 Nov 2025

अखेर सुभाष पवार भाजपात दाखल; रविंद्र चव्हाणांच्या उपस्थितीत प्रवेश, इतर पदाधिकारीही भाजपात

आमदार किसन कथोरे यांच्याविरूद्ध निवडणुक लढवलेले सुभाष गोटीराम पवार यांनी गुरूवारी किसन कथोरे यांच्याच पुढाकाराने भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. ...सविस्तर वाचा
13:16 (IST) 13 Nov 2025

डोंबिवलीत रिक्षा चालकाने दुचाकी स्वाराच्या कपाळावर पेव्हर ब्लाॅक मारून केले जखमी

रिक्षा चालकाने दुचाकी स्वाराच्या पत्नी आणि लहान मुला समक्ष दुचाकी स्वाराला बेदम मारहाण केली. शिवम कैलास पवार (२१) असे रिक्षा चालकाचे नाव आहे. ...वाचा सविस्तर
13:10 (IST) 13 Nov 2025

वाटाघाटी फिस्कटल्या, भाजपने हात झटकले आणि शिंदे सेनेचे एकला चलो…

सुईच्या टोकावर बसतील एव्हडे पण देवू शकणार नाही, असा नाईलाजवजा सूर बालपांडे यांना ऐकावा लागला. बालपांडे म्हणतात की पालकमंत्री भोयर यांनी जागा सोडण्यास असमर्थता व्यक्त केली. ...वाचा सविस्तर
12:26 (IST) 13 Nov 2025

Mumbai Dahisar Toll Plaza  Relocation : दहिसर पथकर नाका ‘तात्पुरता’ ५० मीटर पुढे स्थलांतरित !

Mumbai Traffic Congestion : इतक्या संघर्षानंतर पथकर नाका फक्त ५० मीटरच पुढे सरकल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. ...सविस्तर बातमी
12:15 (IST) 13 Nov 2025

Maharashtra Local Body Elections : निवडणुकीचा प्रचार रंगतदार ठरण्याची "चिन्हे"; जातं-रोबोट.. डाल-माऊस..ग्रामोफोन-सीसीटिव्हीमध्ये लढत.. आणखी काय-काय?

Local Body Elections Symbols List : फणस विरुद्ध कणीस आणि ऊस व द्राक्षांमध्येही लढत दिसणार आहे. ...वाचा सविस्तर
12:12 (IST) 13 Nov 2025

डोंबिवली कोपरमधील बेकायदा इमारती विरूध्द मुंबईत आझाद मैदानात उपोषण

कोपर गावमध्ये मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर हे बेकायदा बांधकाम करण्यात येत आहे. या प्रभागात यापूर्वी बेकायदा इमारती उभारण्यात आल्या आहेत. ...अधिक वाचा
12:10 (IST) 13 Nov 2025

MSRTC Negligence : दोन वेळा जाताना, तीन वेळा परतताना! एसटी बसच्या बिघाडांमुळे वारकऱ्यांनी भोगला 'वनवास'; थेट परिवहन मंत्र्यांकडे तक्रार...

ST Bus Breakdown : वारीसाठी बुक केलेली बस वाड्यावरून जाताना दोनदा तर परतीच्या प्रवासात तीन वेळा बंद पडल्याने महामंडळाच्या नियोजनातील गंभीर त्रुटी उघडकीस आल्या असून, वारकऱ्यांनी दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. ...सविस्तर बातमी
12:01 (IST) 13 Nov 2025

जुगार खेळणाऱ्यांना मोकाट सोडले..मग पालिकेच्या ई प्रभागात झाली लग्नाची केळवण मेजवानी

पालिकेच्या आरोग्य विभागातील रूपेश जाधव, कमलेश सोनावणे, अनिल शिरपूरकर हे कर्मचारी मागील काही महिन्यांपासून तक्रारी आणि चौकशीच्या फेऱ्यात आहेत. ...सविस्तर वाचा
12:00 (IST) 13 Nov 2025

नवी मुंबईत घराणेशाहीचा महापौर नसणार.... मंदा म्हात्रे यांचा वनमंत्री गणेश नाईक यांना टोला

Navi Mumbai Municipal Elections : आरक्षण सोडतीत १११ पैकी तब्बल ५६ जागा महिलांसाठी राखीव असल्याने महिलाराज असल्याचे बोलले जात आहे. ...सविस्तर वाचा