Mumbai Maharashtra Breaking News, Dahihandi 2023: राज्यात ठिकठिकाणी आज गोविंदांमध्ये दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. दुसरीकडे राजकीय वर्तुळात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापू लागला आहे. राज्य सरकारकडून कुणबी प्रमाणपत्राबाबत आश्वासन मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्याचवेळी भारत की इंडिया या वादाचे पडसाद राज्याच्या राजकारणातही उमटताना पाहायला मिळत आहेत.

Live Updates

Maharashtra Breaking News Live Today: महाराष्ट्रातील दहीहंडी व इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

19:56 (IST) 7 Sep 2023
फडणवीस यांच्याकडेच आरक्षण देण्याची नियत; अन्य नेत्यांकडून केवळ राजकारण – शिवेंद्रराजे

मराठा समाजासोबत आजवर प्रत्येक नेत्याने केवळ मतांचे राजकारण केले आहे. या समाजास आरक्षण देण्याचे काम केवळ देवेंद्र फडणवीस यांनीच केले. तशी नियत केवळ याच नेत्याकडे आहे. त्यांनी दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात टिकवले, जे पुढे आघाडीच्या नेत्यांना सर्वोच्च न्यायालयात टिकवता आले नाही.

सविस्तर वाचा

18:40 (IST) 7 Sep 2023
१२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट आयटी कंपनीत नोकरी, वाचा काय आहे प्रकरण

बारावीचे शिक्षण पूर्ण करून आयटी कंपनीत आंतरवासिता(इंटर्नशिप) करण्याची व कायम नोकरीची संधी महाराष्ट्र समग्र शिक्षा कार्यक्रमाद्वारे एचसीएल कंपनीसोबत झालेल्या सामंजस्य करारामुळे मिळाली आहे.

सविस्तर वाचा

18:29 (IST) 7 Sep 2023
"खरंतर हे नागडंउघडं..."; किरीट सोमय्यांच्या 'त्या' व्हिडीओवरून पत्रकारांवर गुन्हा दाखल होताच संजय राऊतांचा हल्लाबोल, म्हणाले...

भाजपाचे नेते किरीट सोमय्यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. यानंतर या व्हिडीओचा मुद्दा थेट विधीमंडळाच्या अधिवेशनात गाजला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी या व्हिडीओचा पेन ड्राईव्ह विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे दिला. मात्र, आता या प्रकरणी हा पत्रकार कमलेश सुतार, अनिल थत्ते यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर हल्लाबोल केला. तसेच भांडाफोड झालेल्या महाराष्ट्रद्वेष्ट्या व्यक्तीची चौकशी करण्याऐवजी पत्रकारांवर गुन्हा दाखल होत असल्याचा आरोप केला. ते गुरुवारी (७ सप्टेंबर) पत्रकारांशी बोलत होते.

सविस्तर वाचा...

18:26 (IST) 7 Sep 2023
Video: आकर्षक कारंजी, नितीन गडकरी आणि त्यांची नात..; वाचा

गडकरी नागपुरात असले तरी दिवसभर विविध कार्यक्रम, बैठकांमध्ये व्यस्त असतात.त्यातूनही वेळ मिळाला तर ते  कुटुबियांसमवेत वेळ घालवता. त्यांचे नातवंडांवर विशेष प्रमे. वेळ मिळताच ते  त्यांच्यासोबत गप्पा करतात.  बुधवारी रात्री  ते बडकस चौकातील दहीहंडी कार्यक्रमात सहभागी झाले.

सविस्तर वाचा

18:25 (IST) 7 Sep 2023
VIDEO: खळबळजनक! ढोल, नगाड्याच्या तालावर नक्षलवाद्यांचे नृत्य; व्हायरल व्हिडिओची समाजमाध्यमांवर चर्चा

गेल्या तीन दशकांपासून गडचिरोली जिल्हा नक्षल्यांच्या हिंसक कारवायांमुळे होरपळून निघत आहे. तेलंगण आणि छत्तीसगड सीमा लागून असल्याने या भागात ते कायम सक्रिय असतात. परंतु पोलिसांनी मागील काही वर्षांपासून राबविलेल्या आक्रमक नक्षलविरोधी अभियानामुळे नक्षल चळवळ खिळखिळी झाली आहे.

सविस्तर वाचा

18:19 (IST) 7 Sep 2023
मोदी सरकारचा निवडणूक आयोग व न्यायव्यवस्थेतही हस्तक्षेप; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका

अकोला: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सर्व क्षेत्रात हस्तक्षेप वाढला आहे, यातून निवडणूक आयोग व न्यायव्यवस्था सुद्धा सुटलेली नाही, असा आरोप काँग्रेस नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज येथे केला.

सविस्तर वाचा...

18:18 (IST) 7 Sep 2023
VIDEO: कर्नाळा जवळ जेएसडब्ल्यू कंपनीच्या बसचा अपघात, १९ कामगार जखमी

पनवेल: मुंबई गोवा महामार्गावर कर्नाळा अभयारण्यालगत गुरुवारी दुपारी कामगारांची वाहतूक करणारी बस महामार्गावर कलंडली. वळण असलेल्या महामार्गावर पावसात बस भरधाव वेगात असल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.

सविस्तर वाचा...

18:08 (IST) 7 Sep 2023
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा इशारा, मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव हाणून पाडणार

चंद्रपूर : सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा वाद पेटला आहे, मराठा समाजाला ओबीसी समाजातून कुणबी प्रमाणपत्र द्वारे आरक्षण देण्याचा डाव सुरू आहे, त्याला हाणून पाडण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ तर्फे चंद्रपूर शहरात ओबीसी महापंचायतीचे आयोजन करण्यात आले आहे.

वाचा सविस्तर...

18:06 (IST) 7 Sep 2023
मराठा आरक्षणासाठीच तरुणाची आत्महत्या, ग्रामस्थांचा दावा; कार पेटवून निषेध

धाराशिव : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठीच गावातील तरूणाने आत्महत्या केली असल्याचा दावा उमरगा तालुक्यातील माडज येथील ग्रामस्थांनी केला आहे.

वाचा सविस्तर...

17:41 (IST) 7 Sep 2023
Dahihandi 2023: ...हा बालिशपणा आहे - आदित्य ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना टोला

परिवर्तन होत आहे हे भाजपाच म्हणतंय ही चांगली गोष्ट आहे. पण उत्सवांच्या दिवशी राजकीय विधानं करणं हा बालिशपणा आहे. त्यांनी बालिशपणातच राहावं. महाराष्ट्रात दुष्काळाची चिन्ह आहेत. त्यावर भाष्य झालं पाहिजे. वरळीत परिवर्तन होईल वगैरे बॅनरबाजी खूप झाली. कामाचं बोला, मुद्द्याचं बोला - आदित्य ठाकरे

17:19 (IST) 7 Sep 2023
मराठा समाजाला कुणबी म्हणून दाखले देण्याचा शासन निर्णय जारी, निवृत्त न्यायमूर्तीची समिती स्थापन

नागपूर : मराठा समाजातील ज्या व्यक्तींची ‘कुणबी’ अशी निजामकालीन नोंद असेल, त्यांना इतर मागास प्रवर्गातील (कुणबी) दाखले दिले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केली. याबाबत लवकरात लवकर अध्यादेश काढला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले होते. त्यामुळे विदर्भापाठोपाठ मराठवाड्यातीलही पात्र मराठ्यांना कुणबी दाखला मिळणार आहे.

सविस्तर वाचा...

17:17 (IST) 7 Sep 2023
वाशी-कोपरखैरणे प्रदूषणावर फिरत्या हवागुणवत्ता तपासणी वाहनाची करडी नजर

नवी मुंबई: नवी मुंबई शहरात आज ही औद्योगिक पट्यालगत असलेल्या वाशी- कोपरखैरणे विभागात वायू प्रदूषण कायम आहे.

सविस्तर वाचा...

17:04 (IST) 7 Sep 2023
“महाराष्ट्रात आता ‘ईडा’ सरकार”; नाना पटोलेंची टीका म्हणतात, “लढाई अडाणी नव्हे तर मोदानीशी…”

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पंतप्रधान नरेंद्र मोदी असो किंवा महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार असो यांच्याशी थेट भिडण्यास मागे पुढे पाहत नाही, अशी त्यांची ओळख झाली आहे. पटोले म्हणतात, की आमची लढाई कोण्याएका अडाणी सोबत नव्हे तर मोदानी सोबत आहे.

सविस्तर वाचा

17:02 (IST) 7 Sep 2023
माणुसकी शून्य आणि ओतप्रोत माणुसकी दोन्हीचे दर्शन 

नवी मुंबई: नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे माणुसकी शून्यता आणि अज्ञात व्यक्ती विषयी माणुसकी हे टोकाचे स्वभाव एकाच घटनेतून समोर आले आहेत.

सविस्तर वाचा...

17:02 (IST) 7 Sep 2023
माजी आमदार वाघमारे यांची टीका, म्हणाले, “मोदी घरी आले तरी भाजपामध्ये जाणार नाही”

गोंदिया : आजची भाजपा विचारधारेची पार्टी राहिली नाही, आता भाजपामध्ये अटलजी आणि आडवाणीजींचे सर्वसमावेशक विचार चालत नाही तर पंतप्रधान मोदींचीच हुकूमशाही चालते. लहान कार्यकर्त्यांच्या समस्या ऐकल्या जात नाहीत, म्हणून मी बीआरएस पक्षाशीच एकनिष्ठ राहायचे, असे ठरवले. आता तर पंतप्रधान मोदी घरी आले तरी भाजपामध्ये जाणार नाही, असे बीआरएसचे विभागीय समन्वयक व तुमसरचे माजी आमदार चरण वाघमारे म्हणाले.

सविस्तर वाचा..

16:41 (IST) 7 Sep 2023
कल्याणमध्ये हॉटेल मालकाच्या मुलाकडून शहापूरच्या ग्राहकाला बेदम मारहाण

कल्याण येथील पश्चिमेतील भानुसागर सिनेमा जवळील रुचिरा बार आणि रेस्टाॅरंच्या मालकाच्या मुलाने शहापूर येथील एका ग्राहकाला हाॅकीने बेदम मारहाण केली. मंगळवारी दुपारी हा प्रकार घडला आहे. जुम्मु शेख (५३, रा. शहापूर) असे मारहाण झालेल्या ग्राहकाचे नाव आहे. ते शहापूर भागात फळ विक्रीचा व्यवसाय करतात.

सविस्तर वाचा

16:39 (IST) 7 Sep 2023
मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारची विनंती फेटाळली; म्हणाले, “अध्यादेशात…!”

जरांगे पाटील म्हणतात, “जोपर्यंत अध्यादेशातील शब्द बदलून येत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार आहे. मराठा समाजाला…!”

वाचा सविस्तर

16:28 (IST) 7 Sep 2023
कल्याण जवळील मोहने येथे तरुणीचा डेंग्युने मृत्यू

कल्याण: कल्याण जवळील मोहने येथे एका २१ वर्षाच्या तरुणीचा डेंग्युने मृत्यू झाला. या तरुणीला चार ते पाच दिवस ताप येत होता.

सविस्तर वाचा...

16:23 (IST) 7 Sep 2023
कसब्याच्या पराभवाचा भाजपने घेतला धसका, पुण्यात बैठकांचा सपाटा; पुढील आठवड्यात रा. स्व. संघाची महत्त्वाची बैठक

कसबा विधानसभा मतदारातील पराभवाचा धसका भाजपने घेतला असून, आगामी पुणे लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपने आतापासून प्रचारासाठी नवनवीन फंडे वापरण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच निवडणूक लढविणार असल्याची ‘पुडी’ सोडून चर्चा घडवून आणली आहे.

सविस्तर वाचा

16:08 (IST) 7 Sep 2023
राज्यात सौर ऊर्जेतून १,६५६ मेगावॅट वीजनिर्मिती; सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या वीज ग्राहकांची संख्या एक लाखाच्या पार

चंद्रपूर: छतावर सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून वीजनिर्मिती करणाऱ्या राज्यातील वीज ग्राहकांच्या संख्येने एक लाखाचा आकडा ओलांडला आहे. ग्राहकाचे वीजबिल कमी झाले असून गरजेपेक्षा अधिक वीज निर्माण झाली तर ती नेट मिटरिंगद्वारे महावितरणला विकून नंतरच्या बिलात सवलत मिळत आहे. यामुळे रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविलेल्या ग्राहकांना कधी कधी शून्य वीजबिलही येते आहे. त्यामुळे रूफ टॉप सोलर फायद्याचे ठरले आहे.

सविस्तर वाचा..

16:06 (IST) 7 Sep 2023
Mumbai Monsoon Update: मुंबई, ठाणेसह पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

गेले अनेक दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने गुरुवारी सकाळपासूनच मुंबई शहर तसेच उपनगरांत पुन्हा दमदार हजेरी लावली. मुंबई सकाळपासून संततधार पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान विभागाने मुंबई, ठाणे, तसेच पालघरमध्ये गुरुवारी व शुक्रवारी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

सविस्तर वाचा

16:05 (IST) 7 Sep 2023
Weather Update: पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, दहीहंडी पावसातच फुटणार

पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने त्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्या राज्यातील काही भागात पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे.

सविस्तर वाचा

15:53 (IST) 7 Sep 2023
Dahihandi 2023: "अहंकाराची हंडी फुटली आणि...", मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

राज्य सरकार विकासाचे थर लावत आहे. तसे हे गोविंदांचे विकासाचे थर लावले जात आहेत. अहंकाराचे थर कोसळले आणि विकासाचे थर सुरू झाले आहेत. मी राजकीय भाष्य करू इच्छित नाही. पण देशात, राज्यात मोदींच्या विरोधात सगळे इंडि आघाडी एकत्र आले आहेत. पण कितीही एकत्र आले तरी २०२४ ची लोकसभेची हंडी नरेंद्र मोदीच फोडतील असा विश्वास आहे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

15:42 (IST) 7 Sep 2023
Dahihandi 2023: सनातन धर्मातही दहीहंडीला अनन्यसाधारण महत्त्व - एकनाथ शिंदे

ही मानाची हंडी आहे. सगळी पथकं टेंभी नाक्याला आनंद दिघेंच्या दहीहंडीला आधी सलामी देतात. ही जुनी परंपरा आहे. सर्व गोविंदांना मी शुभेच्छा देतो. पाऊस पडतोय, त्यामुळे गोविंदांना आणखीन उत्साह संचारला आहे. इथे तरुणांचा उत्साह पाहायला मिळत आहे. ही आपली संस्कृती वाढली पाहिजे हे ध्येय समोर ठेवून आनंद दिघेंनी गणेशोत्सव, नवरात्रौत्सवस, दहीहंडी असे अनेक सण सुरू केले. सनातन धर्मातही या गोविंदाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यावर्षी राज्य सरकारने प्रो गोविंदाचंही आयोजन केलं. प्रत्येक गोविंदाला १० लाखांचं विम्याचं कवचही सरकारने दिलं. अपघात झाले, तर गोविंदांच्या उपचारांचं नियोजन सरकारने केलं. सरकारने गेल्या वर्षी सर्व उत्सवांवरचे निर्बंध हटवले - एकनाथ शिंदे

15:41 (IST) 7 Sep 2023
“एक तडीपार देशाचा गृहमंत्री तर माझ्यासारखा आदिवासी राज्यात…”, वसंत पुरके यांचे वक्तव्य; म्हणाले…

जिल्ह्यात काँग्रेस पक्षाकडून सुरू असलेल्या जनसंवाद यात्रेनिमित्त नेत्यांची रेलचेल आहे. गुरुवारी माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांनी भेट दिली. यावेळी पत्रपरिषदेत ते म्हणाले की, मणिपूरसारख्या घटनांवर पंतप्रधान मोदींसह सर्व सत्ताधारी गप्प आहेत.

सविस्तर वाचा

15:26 (IST) 7 Sep 2023
फडणवीसांविरोधातील याचिकेचा निकाल उद्या; न्यायालय जो निर्णय…

नागपूर : २०१४ च्या विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन गुन्हेगारी खटल्यांची माहिती दिली नसल्याचा आरोप करीत प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर ५ सप्टेंबरला निकाल जाहीर केला जाणार होता. मात्र, न्यायालयाने निकाल राखून ठेवला असून आता शुक्रवार ८ सप्टेंबरला तो जाहीर केला जाणार आहे.

सविस्तर वाचा..

15:07 (IST) 7 Sep 2023
“भारतात जेवढे वाईट होते, त्याहून ४० पट चांगले काम होते,” सरसंघचालक मोहन भागवत यांचे मत; म्हणाले…

नागपूर : भारतात जेवढे वाईट होते, त्याहून ४० पट जास्त चांगले कामही होत आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

वाचा सविस्तर...

15:05 (IST) 7 Sep 2023
महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेतील गुणांच्या सीमारेषेची ‘स्‍पर्धा’ चर्चेत; कारण काय, वाचा…

अमरावती : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ४ जून २०२३ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२३ मधील राज्य सेवा गट-अ व गट-ब परीक्षेचा निकाल ६ सप्‍टेंबरला आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. या पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेकरिता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावांची यादी व गुणांच्‍या सीमारेषेची (कट ऑफ) माहिती महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा...

14:51 (IST) 7 Sep 2023
गोंदिया जिल्हा कारागृह निर्मितीचे भिजत घोंगडे; हालचाली थंडावल्या, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

गोंदिया : गोंदिया जिल्हा निर्मितीला २४ वर्षे पूर्ण झाले त्यानंतर जिल्ह्याचा वाढता व्याप बघता आणि भंडारा येथील केंद्रीय कारागृहाची बंदी क्षमता लक्षात घेता गोंदियात कारागृह उभारण्याच्या हालचाली २०११-१२ साली सुरू झाल्या. प्रस्तावही तयार झाला. मात्र गेल्या १० वर्षांपासून हा प्रस्ताव केवळ कार्यालयीन भ्रमंतीवरच आहे.

सविस्तर वाचा..

14:44 (IST) 7 Sep 2023
टोलवरून झालेल्या वादामुळे टॅक्सीचालकाने आमदारालाच गाडीतून खाली उतरवले, हात-पाय तोडून ठार मारण्याची धमकी दिली

टोलच्या मुद्यावरून संपूर्ण राज्यात वातावरण तापलेले आहे, असे असतानाच मुंबईत टोलवरून झालेल्या वादातून चक्क एका आमदारालाच टॅक्सीचालकाने टॅक्सीतून खाली उतरवल्याची घटना घडली.

सविस्तर वाचा...

Mumbai Maharashtra News Live

महाराष्ट्र न्यूज

Maharashtra Breaking News Live Today: महाराष्ट्रातील दहीहंडी व इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर