Mumbai Maharashtra Breaking News Today, 06 December 2023: राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र, त्याचवेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्यामुळे हा मुद्दा तापू लागला आहे. तिकडे नागपुरात हिवाळी अधिवेशनासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून सत्ताधारी व विरोधकांच्या पत्रकार परिषदांमधून अधिवेशनकाळ नेमका कसा जाणार आहे, त्याचा अंदाज येण्याची शक्यता आहे.

uddhav thackeray amit shah latest news
Maharashtra News : “अमित शाहांना एवढंच सांगायचंय की तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत…”, उद्धव ठाकरेंचा ‘त्या’ विधानावरून टोला!
Chandrashekhar Bawankule on Gajanan Kirtikar
‘विरोधकांच्या मागे लागणे भाजपाची नवी संस्कृती’, शिंदे गटाच्या आरोपाला चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर
cm eknath shinde gudhi padwa
“जो विकासाच्या आड येईल, त्याला आडवा करून…”, एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला; ठाण्याच्या शोभायात्रेत बोलताना केलं लक्ष्य!
Mayawati will start BSPs campaign in Maharashtra from Nagpur
बसपाच्या महाराष्ट्रातील प्रचाराचे रणशिंग मायावती नागपुरातून फुंकणार
Live Updates

Today’s Breaking News Updates: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

18:34 (IST) 6 Dec 2023
Maharashtra Live News Update : विजय वडेट्टीवारांना फडणवीसांचा टोला

वडेट्टीवारांनी एनसीआरबीच्या अहवालाचा हवाला दिला. तो अहवाल कसा वाचायचा, हेही कधीतरी शिकलं पाहिजे. त्या त्या प्रकारात एकूण गुन्हे प्रती लोकसंख्या किती आहे, यावर त्याचा आढावा घेतला जातो. लोकसंख्येचा विचार करता महाराष्ट्र गुन्ह्यात दुसऱ्या स्थानी आहे वगैरे. पण ही वस्तुस्थिती नाही. लोकसंख्येच्या बाबतीत आपण देशात आठव्या क्रमांकावर आहोत. हत्येच्या बाबतीत आपण १७व्या क्रमांकावर आहे. महिलांविरोधी गुन्ह्यांत आपण सातव्या स्थानी आहोत. बलात्काराच्या गुन्ह्यात महाराष्ट्र १२व्या क्रमांकावर आहे. अपहरणाच्या बाबतीत महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे एनसीआरबीचा अहवाल कसा वाचला पाहिजे याबाबतीतलं प्रशिक्षण विरोधी पक्षाला देण्याची गरज आहे - फडणवीस

18:31 (IST) 6 Dec 2023
Maharashtra Live Update: फडणवीसांचा विरोधकांना टोला

आज विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार घातला. चहापान चर्चेसाठी होतं. पण कदाचिक विरोधी पक्षाचा स्वभाव पाहाता पुढच्या वेळी सुपारीपान ठेवावं लागेल.. म्हणजे कदाचित ते येतील अशी शक्यता मला दिसतेय. मात्र आज विरोधी पक्षाने न येण्याची कारणं आणि जे पत्र दिलं आहे.. त्यांच्या पत्रकार परिषदेत काही लोक झोपी गेले होते. तीन राज्यांत जसे झोपले, तसे पत्रकार परिषदेतही ते झोपी गेले होते. पण तशाच झोपेत हे पत्र लिहिलंय का हा प्रश्न पडावा असं पत्र विरोधकांनी दिलं आहे. एकतर मला आश्चर्य वाटतं की नागपूरचं अधिवेशन विदर्भ, मराठवाड्याच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी यासाठी होत असतं. पण विरोधी पक्षाच्या पत्रात विदर्भ, मराठवाड्याच्या समस्यांचा उल्लेखच नाही. त्यांना विदर्भ, मराठवाड्याचा विसर पडल्याचं या पत्रावरून दिसतंय. दुसरं राज्यात काय चाललंय याचं भानही त्यांना नाही. त्यांनी पत्रात कंत्राटी भरतीच्या जीआरचा विषय काढला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सहीनं निघालेला जीआर दीड महिन्यापूर्वी एकनाथ शिंदेंनी रद्द केला हेही ज्या विरोधी पक्षाला माहिती नाही त्या विरोधी पक्षाची काय अवस्था आहे हे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे - देवेंद्र फडणवीस

18:25 (IST) 6 Dec 2023
कबड्डीपटूंना महापालिका कायम सेवेत करण्यासाठी धोरण ठरवणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सरकारने खेळाला नेहमी प्राधान्य दिले आहे. त्यात अगदी दहीहंडीपासून ते कबड्डीपर्यंतच्या खेळांचा समावेश आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

सविस्तर वाचा...

18:02 (IST) 6 Dec 2023
गोरेगावमधील ‘त्या’ सोसायट्यांना अखेर एकत्रित पुनर्विकास करावा लागणार! व्यावसायिक सदनिकाधारकांच्या स्वतंत्र पुनर्विकासाच्या प्रयत्नांना सुरुंग

मुंबई: गोरेगाव पश्चिम येथील उन्नतनगर तीनमधील ६३ वर्षे जुन्या सहकारी गृहनिर्माण संस्थेतून रस्त्यालगत असलेल्या ‘अनधिकृत’ व्यावसायिक सदनिकाधारकांच्या दोन स्वतंत्र गृहनिर्माण संस्थांना म्हाडा उपनिबंधकांनी मान्यता दिल्यामुळे एकत्रित पुनर्विकासात निर्माण झालेल्या पेचावर तोडगा काढण्याची जबाबदारी मुंबई गृहनिर्माण मंडळावर सोपविण्यात आली आहे.

सविस्तर वाचा...

17:57 (IST) 6 Dec 2023
‘बिद्री’तील विजयाचा राजकीय संबंधावर परिणाम नाही – हसन मुश्रीफ

निवडणुकीचे राजकीय परिणाम काय होतील या प्रश्नावर मुश्रीफ यांनी सावध प्रतिक्रिया दिली.

सविस्तर वाचा...

17:27 (IST) 6 Dec 2023
सांगली : निवृत्त शिक्षणाधिकाऱ्याकडे ८३ लाखांची अपसंपदा, गुन्हा दाखल

या कृतीस पत्नीनेही अपप्रेरणा दिली असल्याने पती- पत्नी विरूद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

17:26 (IST) 6 Dec 2023
जमिनींच्या मोजण्या त्वरेने करण्यासाठी राज्य सरकारची नामी शक्कल; घेतला ‘हा’ निर्णय

पुणे: राज्यात जमिनींच्या सुमारे लाखभर मोजण्या शिल्लक आहेत. या मोजण्या त्वरेने करण्यासाठी राज्य सरकारने नामी शक्कल काढली आहे. या निर्णयामुळे जमिनींच्या मोजण्या लगेच होणार असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

सविस्तर वाचा...

17:26 (IST) 6 Dec 2023
सांगली : अवकाळीने खराब झालेली द्राक्षे मातीआड

लाखो रूपयांची द्राक्षे मातीआड करताना शेतकरी अस्वस्थ झाला आहे.

सविस्तर वाचा...

17:01 (IST) 6 Dec 2023
‘जेएनपीए’ची माहिती फसवी, संघर्ष समितीचा आरोप; प्रदूषण नियंत्रण विभागाच्या कारवाईकडे जनतेचे लक्ष

मुंबई, रायगड येथील मच्छिमारांचे सुद्धा आर्थिक नुकसान होणार असल्याचा दावा बंदर विरोधी आंदोलन कार्यकर्त्यांकडून बैठकीत करण्यात आला.

सविस्तर वाचा...

16:27 (IST) 6 Dec 2023
ओडिशातून गांजा तस्करी, यवतमाळ व पुसदमध्ये कारवाई; तिघांना अटक

वाहनाची तपासणी केली असता, डिक्कीत एका पोत्यात तीन लाख सात हजार ४४० रुपये किंमतीचा १५ किलो ३७२ ग्रॅम गांजा आढळला.

सविस्तर वाचा...

16:18 (IST) 6 Dec 2023
“फक्त दहा दिवसांच्या अधिवेशनासाठी येणाऱ्या मान्यवरांचे मनःपूर्वक स्वागत”, शरद पवार गटाकडून सरकारवर ‘बॅनरास्त्र’

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दरवर्षी नागपूरला होत असताना पूर्वी तीन ते चार आठवडे अधिवेशन होत असे.

सविस्तर वाचा...

15:29 (IST) 6 Dec 2023
वृद्धाश्रमात आजी आजोबांनी घेतला लग्न समारंभाचा आनंद; पूर्वतयारी, मंगलाष्टके, कन्यादानात सक्रिय सहभाग

लग्न सोहळ्याच्या निमित्ताने सजावट व उर्वरित तयारी करण्यास आजी व आजोबांनी गेल्या दोन दिवसांपासून तयारीची लगबग सुरू केली होती.

सविस्तर वाचा...

15:10 (IST) 6 Dec 2023
भाईंदर : गंभीर आजारांवरील उपचारांसाठी शंभर खाटांचे रुग्णालय, २३ जानेवारी रोजी लोकार्पण; रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया

ठाणे येथील गंगूबाई संभाजी शिंदे रुग्णालयाच्या धर्तीवर याठिकाणी १०० खाटांचे हे रुग्णालय चालवण्याचा संयुक्त निर्णय महापालिका आणि राज्य शासनाने घेतला आहे.

सविस्तर वाचा...

15:09 (IST) 6 Dec 2023
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नोव्हेंबरमध्ये मालामाल! माल वाहतूक, तिकीट विक्री आणि तपासणीतून कोट्यवधींचे उत्पन्न

गोंदिया: दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागाने नोव्हेंबर २०२३ मध्ये १.३७ दशलक्ष टन मालवाहतूक करून १५७.२० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले. चोरीच्या सामानाच्या ५० हजार ४९६ गुन्ह्यांची नोंद झाली असून संबंधितांकडून २ कोटी ३१ लाख रुपये दंड स्वरूप वसूल करण्यात आले आहेत. याशिवाय रेल्वे आणि मुख्य रेल्वे स्थानकांवर राबविण्यात आलेल्या नियमित तपासणी मोहिमेअंतर्गत नोव्हेंबर महिन्यात धुम्रपानाची १०९ प्रकरणे नोंदवण्यात आली असून २१ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. रेल्वे आवारात कचरा टाकण्याच्या ६१० गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून यातून ६३ हजार ९०० रुपये वसूल करण्यात आले आहेत. नोव्हेंबरमध्ये विभागात १.७० दशलक्ष तिकिटांची विक्री झाली,यातून २६.१३ कोटी रुपये कमावलेले उत्पन्न मागील वर्षीच्या याच कालावधीपेक्षा १३.९१ टक्के अधिक आहे.

14:57 (IST) 6 Dec 2023
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा गडचिरोली दौरा पुढे ढकलला; कारण काय? जाणून घ्या...

गडचिरोली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा येत्या ९ डिसेंबरचा गडचिरोली जिल्हा दौरा व प्रस्तावित कार्यक्रम तूर्त रद्द करण्यात आला आहे. शाह यांच्या दौऱ्याची पुढील तारीख मिळाल्यानंतर हे कार्यक्रम ठरविले जातील, अशी माहिती खासदार अशोक नेते यांनी दिल्ली येथील कार्यालयातून दिली.

सविस्तर वाचा

14:48 (IST) 6 Dec 2023
पुणे : टीईटी घोटाळ्यातील तुकाराम सुपेंकडे सापडली कोट्यवधींची माया; सांगवी पोलिसात गुन्हा दाखल

१९८६ ते २१ डिसेंबर २०२१ दरम्यान त्यांनी एकूण ३ कोटी ५९ लाख ९९ हजारांची माया भ्रष्टाचारातून कामावल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

सविस्तर वाचा...

14:42 (IST) 6 Dec 2023
पालिकेच्या विभाग कार्यालयात उंदीर आणि घुशी सोडणार; मनसेचा इशारा

मुंबई: सांताक्रुझ येथील अनेक भागांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून दूषित तसेच अपुरा पाणीपुरवठा होत आहे. ही समस्या मार्गी लावण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयात दोन वेळा मोर्चा काढण्यात आला.

सविस्तर वाचा...

14:26 (IST) 6 Dec 2023
ललित पाटीलला ससूनमधून पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या सहाच आरोपींविरुद्ध आरोपपत्र; अन्य आरोपींविरुद्ध का नाही?

पुणे: अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलला ससून रूग्णालयातून पसार होण्यासाठी मदत करणाऱ्या सहा आरोपींविरुद्ध पोलिसांनी न्यायालयात मंगळवारी आरोपपत्र दाखल केले.

सविस्तर वाचा...

14:09 (IST) 6 Dec 2023
Maharashtra News Live Update: शरद पवार उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या भेटीला, फोटो पोस्ट करून म्हणाले...

शरद पवार उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या भेटीला, फोटो पोस्ट करून म्हणाले...

https://twitter.com/PawarSpeaks/status/1732302090066874676

14:08 (IST) 6 Dec 2023
पिंपरी: कर्मचाऱ्याला नोटीस दिल्याने भाजपच्या माजी नगरसेविकेच्या पतीची सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्याला मारहाण

पिंपरी: विनापरवाना गैरहजर आणि उद्धट वर्तनाबाबत कर्मचाऱ्याला नोटीस दिल्याने भाजपच्या माजी नगरसेविकेच्या पतीने महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्याला मारहाण केली. ही घटना भोसरीतील ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयात घडली.

सविस्तर वाचा...

14:06 (IST) 6 Dec 2023
हिवाळी अधिवेशन, नवीन वर्षाच्या तोंडावर हॉटेल व्यवसायात चैतन्य; नागपुरातील हॉटेलचे दर बघून व्हाल थक्क…

नागपूर: हिवाळी अधिवेशन त्यापाठोपाठ आलेल्या नाताळाच्या सुट्या आणि नववर्षाचे स्वागत अशा तिहेरी योगामुळे हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये चैतन्याचे वारे वाहताहेत. या निमित्ताने मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होणार आहे.

वाचा सविस्तर...

13:56 (IST) 6 Dec 2023
शिक्षणाधिकाऱ्याकडे सापडली सहा कोटींची अवैध मालमत्ता

त्यानंतर थोड्याच दिवसांत लोहार यांना एका शिक्षणसंस्थाचालकाकडून २५ हजार रूपयांची लाच घेताना रंगेहात पकडले होते.

सविस्तर वाचा...

13:49 (IST) 6 Dec 2023
पैसे दे नाहीतर अश्लिल छायाचित्र प्रसारित करेन; मालकीनीला धमकावून खंडणी उकळणाऱ्या लेडिज टेलरला अटक

ठाणे : मालकीनीचे अश्लिल छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी देऊन तिच्याकडून वारंवार खंडणी उकळणाऱ्या एका लेडिज टेलरला श्रीनगर पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली आहे. विशाल राठोड (४१) असे आरोपीचे नाव असून त्याने महिला आणि तिच्या कुटुंबियांकडून आतापर्यंत १ लाख १० हजार रुपये उकळल्याचे तपासात समोर आले आहे.

सविस्तर वाचा

13:35 (IST) 6 Dec 2023
धक्कादायक! चेष्टा मस्करी जीवावर बेतली; काॅम्प्रेसर पाइपमधील हवा पोटात सोडल्याने १६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

पुणे: हडपसर ओैद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात चेष्टा मस्करीतून काॅम्प्रेसर यंत्रातील हवा पाइपद्वारे अल्पवयीन मुलाच्या पोटात सोडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.

सविस्तर वाचा...

13:35 (IST) 6 Dec 2023
मीरा भाईंदर शहरात १८३ बांधकामे अनधिकृत, प्रशासनाकडून पहिल्यांदाच यादी प्रसिद्ध

अशा बांधकामांची यादी महापालिकेने पहिल्यांदाच संकेत स्थळावर प्रसिद्ध केली असून नागरिकांना या पासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

सविस्तर वाचा...

13:13 (IST) 6 Dec 2023
सावित्रीबाई पुणे विद्यापीठात बसने फिरा मोफत!

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक, नागरिकांसाठी मोफत बससेवा पूर्ववत करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा...

13:01 (IST) 6 Dec 2023
शेतकऱ्यांना दिलासा... पीक विमा खात्यात जमा होण्यास सुरुवात

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम पीकविम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे आपदग्रस्त  पन्नास लाख शेतकऱ्यांना  दिलासा मिळणार आहे.राज्यात ४९ लाख ५ हजार ०३२  शेतकऱ्यांना २,०८६ कोटी ५४ लक्ष रुपये अग्रीम पीकविमा म्हणून मंजूर झाले आहे. त्याचे वाटप  चालू  झाले आहे.

सविस्तर वाचा

12:38 (IST) 6 Dec 2023
जागतिक उत्पादन केंद्र बनण्याची भारताला संधी – एस अँड पी; २०३० पर्यंत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याचाही दावा

जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून आगामी तीन वर्षांत भारताचे स्थान कायम असेल.

सविस्तर वाचा...

12:32 (IST) 6 Dec 2023
राष्ट्रीय महामार्गावरील सेवा रस्ते गिळंकृत, राडारोड्याच्या ढिगाऱ्यामुळे ये-जा करण्याचे मार्ग बंद

वसई: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तयार करण्यात आलेले सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकला जाऊ लागला आहे. त्यामुळे हे रस्ते गिळंकृत होऊ लागले आहे. याचा आपत्कालीन परिस्थितीत वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहे.

वाचा सविस्तर...

12:26 (IST) 6 Dec 2023
शेतकऱ्यांना दिलासा... पीक विमा खात्यात जमा होण्यास सुरुवात

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम पीकविम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे आपदग्रस्त  पन्नास लाख शेतकऱ्यांना  दिलासा मिळणार आहे.राज्यात ४९ लाख ५ हजार ०३२  शेतकऱ्यांना २,०८६ कोटी ५४ लक्ष रुपये अग्रीम पीकविमा म्हणून मंजूर झाले आहे.

सविस्तर वाचा

12:26 (IST) 6 Dec 2023
उपराजधानीत थंडी, पण राजकीय तापमान वाढले,उद्यापासून अधिवेशन

नागपूर: विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन गुरूवारपासून नागपुरात सुरू होत असून, त्यानिमित्ताने संपूर्ण मंत्रिमंडळ दोन आठवडे नागपुरात मुक्कामी असणार आहे.एकीकडे पावसाळी वातावरण आणि त्यामुळे तापमानात घट झाली असतानाच अधिवेशनात सत्ताधारी विरूद्ध विरोधक असा संघर्ष रंगणार असल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

सविस्तर वाचा

12:24 (IST) 6 Dec 2023
उरणमध्ये मंगळवार ठरला घातवार; कंटेनरच्या धडकेत एकाच दिवशी अपघात; दोघांचा मृत्यू

उरण: मंगळवार हा उरणसाठी ठरला अपघात वार ठरला. दिघोडे मार्गावर कंटेनर वाहनांच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. अवजड कंटेनर अपघातातील बळींची संख्या वाढू लागली. ग्रामस्थांचा उद्रेक दिघोडे नाक्यावर रस्ता रोको करीत निषेध नोंदवला.

सविस्तर वाचा...

12:09 (IST) 6 Dec 2023
तलाठी भरतीतील अडचणींचा फेरा संपेना; आता ‘या’ कारणामुळे भरती रखडणार

पुणे: आदिवासीबहुल ठिकाणी सरकारी नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जमाती (एसटी) या आरक्षण प्रवर्गात असलेल्या स्थानिक उमेदवारांसाठी ज्यादा आरक्षण देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा...

11:48 (IST) 6 Dec 2023
बाबासाहेबांच्या वस्तूंना संग्रहालय कधी मिळणार? शांतिवन चिचोली प्रकल्प अद्यापही अपूर्णच

नागपूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक वस्तू आणि दस्तऐवज चिरकाल जतन करण्यासाठी शांतिवन चिचोली येथे संग्रहालयाची निर्मिती करण्यात येत आहे. शासनाने संग्रहालयाची भव्यदिव्य इमारत उभी केली आहे, मात्र त्यातील संग्रहालयचे कार्य अद्यापही अपूर्णच आहेत.

सविस्तर वाचा

11:47 (IST) 6 Dec 2023
५२ वर्षीय विकृत व्यक्तीचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मुलगी गर्भवती

वर्धा, गीरड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावात संतापजनक घटना उजेडात आली आहे.या गावातील बावण वर्षीय  आरोपीची सातव्या वर्गात शिकणाऱ्या  मुलीवर नजर गेली.त्याने एक वर्षापासून तिच्यावर अत्याचार सुरू केले होते.

सविस्तर वाचा

11:47 (IST) 6 Dec 2023
शस्त्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्ता डॉक्टरांच्या मदतीस, काय आहे हा प्रकार.

कृत्रिम बुध्दीमत्ता हा येत्या काळात परवलीचा शब्द ठरणार तर. सावंगी येथील दत्ता मेेघे अभिमत विद्यापिठात ‘शिक्षण व तंत्रज्ञानात कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर’ या विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंबईच्या टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे वैज्ञानिक अधिकारी डॉ.बी सत्यनारायणा बोलत होते.

सविस्तर वाचा

11:46 (IST) 6 Dec 2023
संडे मार्केटचे आता मुख्य मार्गावर अतिक्रमण; महापालिका, पोलीस विभाग व जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष

चंद्रपूर : नागपूर-चंद्रपूर महामार्ग अतिक्रमणाच्या विळख्याने अरुंद झाल्यानंतर आता शहरातील मुख्य गांधी चौक ते जटपुरा गेट या मुख्य मार्गावर ‘संडे मार्केट’ने अतिक्रमण केल्याने वाहतुकीची चांगलीच कोंडी झाली आहे. विशेष म्हणजे, संडे मार्केटच्या या अतिक्रमणाकडे जिल्हा व पोलीस प्रशासनाप्रमाणेच महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

सविस्तर वाचा

11:46 (IST) 6 Dec 2023
अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे, चंद्रशेखर बावनकुळे, नाना पटोले यांना एकाच इमारतीत खोली

नागपूर : अधिवेशनासाठी येणाऱ्या विधानसभा व विधान परिषद सदस्यांची येथील आमदार निवासात मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. इमारत क्रमांक एकमध्ये माजी मुख्यमंत्री व शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नावाने खोल्या आरक्षित आहेत.

सविस्तर वाचा

11:31 (IST) 6 Dec 2023
संघप्रणीत संघटनेचा रेशीमबागेतून सरकारविरोधात मोर्चा; ११ डिसेंबरला विधानभवनावर धडकणार

नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने ११ डिसेंबरला नागपुरातील संघाच्या रेशीमबाग कार्यालयाजवळील मैदानातून विधानभवनात मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. मोर्चाला परवानगी नाकारल्यास ऊर्जामंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा वळवण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

सविस्तर वाचा

11:23 (IST) 6 Dec 2023
पीएमआरडीएच्या मेट्रोला ‘राजभवन’कडून नकार… जाणून घ्या कारण

पुणे: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) करण्यात येणाऱ्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोची अडथळ्यांची शर्यत काही थांबण्याचे नाव नाही.

सविस्तर वाचा...

11:01 (IST) 6 Dec 2023
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात पालिकेला आता आली जाग, मराठी पाट्यांची तपासणी करण्याचे दिले आदेश

ठाणे : महापालिका क्षेत्रातील दुकाने आणि आस्थापनांच्या पाट्या मराठीत आहेत कि नाही याची खातरजमा करण्याचे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्व प्रभाग समिती सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. तसेच मराठी देवनागरी भाषेत पाट्या नसणाऱ्यांवर कारवाई करताना सर्व आवश्यक बाबी तपासून घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत.

वाचा सविस्तर...

11:01 (IST) 6 Dec 2023
मुलांच्या जीवाशी खेळ! विद्यार्थ्यांची धोकादायक पद्धतीन वाहतूक

पुणे: मैत्रिणीने प्रेमसंबंध तोडल्याने एका १६ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना येरवडा भागात घडली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.

सविस्तर वाचा...

11:00 (IST) 6 Dec 2023
ठाण्यात हिंदायान सायकल मोहिम १७ फेब्रुवारीला

ठाणे : सायकल मोहिमांना जनसामान्यांमध्ये पोहोचवण्यासाठी हिंदायान फाऊंडेशनतर्फे देशभरात विविध ठिकाणी वेगवेगळ्या सायकल मोहिमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यापैकी ठाणे ते मुंबई अशी सायकल मोहिम १७ फेब्रुवारीला होणार असून यादिवशी ठाणे महापालिकेच्या सहकार्याने शालेय विद्यार्थ्यांसाठी पाच किमी अंतराची सायकल मोहिमही आयोजित केली जाणार आहे.

सायकल मोहिमांबाबत माहिती देण्यासाठी मंगळवारी महापालिका मुख्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि हिंदायान फाऊंडेशनचे समन्वयक विष्णुदास चापके उपस्थित होते. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयातर्फे हिंदायान सायकल मोहिमांचा पुरस्कार करण्यात आला आहे. गेल्यावर्षी झालेल्या मोहिमेत भारतीय लष्कर आणि नौदल संघांनी सहभाग घेतला होता.

यंदा ही सायकल मोहिम दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यातून जाणार आहे. नवी दिल्ली, आग्रा, जयपूर, गांधीनगर, अहमदाबाद, ठाणे, मुंबई आणि पुणे या शहरातून ही मोहिम मार्गक्रमण करणार आहे, अशी माहिती हिंदायान फाऊंडेशनचे समन्वयक विष्णुदास चापके यांनी दिली. त्याचप्रमाणे युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाने सुचवल्याप्रमाणे शाळांतील मुलांसाठीही सायकल मोहिमांचे आयोजन केले जाणार आहे. त्यास ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे १७ फेब्रुवारी २०२४ या दिवशी ठाणे महापालिका शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पाच किमी अंतराच्या सायकल मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे. भारतामध्ये लांब पल्ल्याच्या सायकल मोहिमा, शर्यती होत नाहीत. येथील सायकल स्वारांना ती संधी मिळावी या उद्देशाने हिंदायानतर्फे या शर्यती आणि मोहिमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे चापके यांनी स्पष्ट केले.

दिल्ली ते आग्रा - यमुना एक्सप्रेस वरून (२२० किमी), मुंबई – पुणे जुना हायवे आणि १०० किमींच्या प्रत्येकी तीन शर्यतींत व्यावसायिक सायकलस्वार सहभागी होऊ शकतील. तसेच इतरांना ठाणे ते मुंबई- वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गे, मुंबई ते वाशी, लोणावळा ते पुणे आणि अहमदाबाद ते गांधीनगर या सायकल मोहिमा आहे.

10:58 (IST) 6 Dec 2023
Maharashtra News Live Update: जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला 'तो' व्हिडीओ

मुंब्रा बायपासवर रात्री पैसे जमा करणारे कोण आहेत? - व्हिडीओ पोस्ट करत जितेंद्र आव्हाडांचा सवाल

https://twitter.com/Awhadspeaks/status/1732268033630937264

10:58 (IST) 6 Dec 2023
मलनि:सारण केंद्रासाठी १५४ झाडे कापण्याचा पालिकेचा निर्णय

भाईंदर : मीरा भाईंदर शहरात तीन ठिकाणी मल नि:सारण केंद्राचा विकास करण्याच्या दुष्टीने तब्बल १५४ झाडे कापण्याचा निर्णय पालिकेकडून घेण्यात आला आहे. या झाडाच्या मोबदल्यात ४९८ नग झाडे ही रस्त्याच्या दुतर्फा तर ११२ झाडांचे पुर्न:रोपण करण्याचा ठराव प्रशासनाने मंजूर केला आहे.मात्र इतक्या मोठ्या संख्येने झाडे कापली जात असल्यामुळे प्रशासनाच्या कामाजाकावर पर्यावरण प्रेमी कडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

मीरा भाईंदर मधून निघणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने शहरात ११ ठिकाणी मल नि:सारण प्रकल्प उभारले आहेत. परंतु शहरातील झपाट्याने वाढणारी लोकसंख्या पाहता यात वाढ करण्याची गरज निर्माण झाली आहे.त्यामुळे महापालिकेने शहरातील तीन विविध ठिकाणी हे केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे.यात मीरा रोड येथील अय्यप्पा मंदिर शेजारी असलेला भूखंड, १५ नंबर बस स्टॉप शेजारी असलेला भूखंड आणि भाईंदर येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स शेजारी असलेल्या भूखंडाची निवड करण्यात आली आहे.

मात्र या केंद्राची उभारणी करण्यापूर्वी विविध प्रजातीची १५४ झाडे कापावी लागणार असल्याचे सर्वेक्षण पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.यातील ११२ झाडांचे पुर्न:रोपण करणे शक्य असले तरी ४२ झाडे ही मुळासकट काढावी लागणार आहे.त्यामुळे नियमाप्रमाणे ४२ झाडे कापत असताना त्यांच्या अंदाजित वयोमानानुसार जवळपास ४९८ नग झाडे लावण्याचा प्रस्ताव उद्यान विभागाकडून देण्यात आला आहे. शिवाय ही झाडे रस्त्याच्या दुतर्फा लावण्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.त्यामुळे एकूण १५२ झाडे कापत असल्याचे महापालिकेने वृत्तपत्रात तसेच संकेत स्थळावर प्रसिद्ध केल्यानंतर त्यावर कोणतीही हरकत अथवा सुचना न आल्यामुळे त्यास प्रशासकीय मंजुरी देत असल्याचा ठराव महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी मंजुर केला आहे.मात्र एकीकडे प्रदूषणात झालेली वाढ समोर असताना देखील नागरी वस्तीतील १५४ झाडे कापण्याचा निर्णय प्रशासनाने घेणे धक्कादायक असल्याचे मत पर्यावरण प्रेमी वर्गाकडून व्यक्त केले जात आहे.

कोणत्या ठिकाणी किती झाड कापली जाणार.?

ठिकाण- झाडांची संख्या

मीरा रोड अय्यप्पा मंदिर (झोन ६)- १०४

मीरा रोड १५ नंबर बस स्टॉप (झोन ८)- ४०

भाईंदर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स (झोन ४) १०

10:58 (IST) 6 Dec 2023
Maharashtra News Live Update: इंडिया आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार उद्धव ठाकरे?

इंडिया आघाडीमध्ये नेतृत्वाच्या चेहऱ्याविषयी चर्चा होईल. उद्धव ठाकरे हे एक हिंदुत्ववादी व राष्ट्रीय चेहरा आहेत. ज्या व्यक्तीला इंडिया आघाडीची मंजुरी मिळेल, ती व्यक्ती आघाडीची पंतप्रधानपदाची उमेदवार असेल. याव्यतिरिक्त मला याबाबत काही म्हणायचं नाही. मला बाहेर असं काहीही बोलायचं नाही ज्यामुळे आघाडीमध्ये मतभेद निर्माण होतील - संजय राऊत

https://twitter.com/ANI/status/1732268305904525537

10:48 (IST) 6 Dec 2023
Maharashtra News Live Update: धर्मराव बाबा अत्राम कार्यालयाबाबत म्हणाले...

मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी नागपूर विधिमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय अजित पवार गटाचंच असल्याची भूमिका घेतली आहे. "शरद पवार गटाचे नेते तिथे आले, तर त्यांना चहा-नाश्ता देऊ", अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली आहे. त्यामुळे आता शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गटही कार्यालयांवरून एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

election maharashtra Legislative Council Speaker

विधान परिषद सभापतीपदाची निवडणूक हिवाळी अधिवेशनात होणार का? (छायाचित्र - लोकसत्ता ग्राफिक्स)

Today’s Breaking News Updates: मराठा आरक्षण, हिवाळी अधिवेशन व इतर महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा