मुंबई: गोरेगाव पश्चिम येथील उन्नतनगर तीनमधील ६३ वर्षे जुन्या सहकारी गृहनिर्माण संस्थेतून रस्त्यालगत असलेल्या ‘अनधिकृत’ व्यावसायिक सदनिकाधारकांच्या दोन स्वतंत्र गृहनिर्माण संस्थांना म्हाडा उपनिबंधकांनी मान्यता दिल्यामुळे एकत्रित पुनर्विकासात निर्माण झालेल्या पेचावर तोडगा काढण्याची जबाबदारी मुंबई गृहनिर्माण मंडळावर सोपविण्यात आली आहे. तिन्ही संस्थांची सुनावणी घेऊन एकत्रित पुनर्विकासाबाबत आदेश जारी करण्याच्या सूचना म्हाडा उपाध्यक्षांनी दिल्या आहेत. 

उन्नतनगर विभाग तीनमधील मूळ सहकारी गृहनिर्माण संस्थेत १८ ब्लॉक्समध्ये (प्रत्येकी आठ रहिवाशी) एकूण १४४ रहिवाशी होते. यापैकी एक ते तीन आणि चार ते सहा ब्लॉकमधील दोन स्वतंत्र सहकारी गृहनिर्माण संस्थेला म्हाडा उपनिबंधक अदिनाथ दगडे यांनी मान्यता दिली. या नव्या संस्थांमध्ये सर्वाधिक रहिवाशी अनधिकृतपणे व्यावसायिक वापर करीत आहेत. या रहिवाशांनी मोकळी जागाही अतिक्रमित करून व्यावसायिक वापर सुरू केला आहे. या सर्व सदनिका १८ मीटर रस्त्याला लागून आहेत. या दोन स्वतंत्र संस्था झाल्याने या वसाहतीच्या एकत्रित पुनर्विकासाला फटका बसला. एकत्रित पुनर्विकासात या वसाहतीला चार इतके चटईक्षेत्रफळ मिळू शकले असते. आता मात्र तिन्ही सहकारी संस्थांना तीन इतक्या चटईक्षेत्रफळावर समाधान मानावे लागणार आहे.

Municipal Commissioner Bhushan Gagrani ordered to speed up process of auctioning seized goods of defaulters
थकबाकीदारांच्या जप्त वस्तूंच्या लिलावाच्या प्रक्रियेस वेग द्यावा, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे आदेश
reserve bank
सोने तारण कर्जाचे रोखीत वितरण २०,००० रुपयांच्या मर्यादेपर्यंतच ;वित्तीय कंपन्यांना काटेकोर पालनाचे रिझर्व्ह बँकेचे निर्देश
mumbai municipal corporation seizes six motor garages for non payment of property tax
मालमत्ता कर न भरणाऱ्या सहा मोटार गॅरेजवर जप्तीच मालमत्ता करवसुलीसाठी महानगरपालिकेकडून कठोर कारवाईला सुरुवात
mumbai, Bhabha Hospital, Nurse Assaulted, Nurse Assaulted at Bhabha Hospital, Nurses warns Strike, Nurses Safety Concerns, Bhabha Hospital nurses warns Strike, hospital news, Bhabha hospital news, nurse assaulted news,
मुंबई : परिचारिका आंदोलनाच्या पवित्र्यात, सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी कर्मचारी संघटना आक्रमक
sex racket busted at unisex salon prostitution in guise of a unisex salon
युनिसेक्स सलूनच्या आड देहव्यापार – विवाहित महिलेची….
CJI Chandrachud says enactment of three new criminal laws
नवीन फौजदारी कायदे समाजासाठी ऐतिहासिक! न्याय व्यवस्थेचे नवीन युगात संक्रमण झाल्याची सरन्यायाधीशांकडून प्रशंसा
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Mumbai, Redevelopment dispute,
मुंबई : सिंधी निर्वासितांच्या पुनर्विकासाचा वाद न्यायालयात

हेही वाचा… भाजपचे आता महालक्ष्मी व्रत; महालक्ष्मी साहित्यामधून प्रचाराचा फंडा

याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन म्हाडा उपाध्यक्ष संजीव जैस्वाल यांनी हे आदेश दिले. 
संस्थेचा एकत्रित पुनर्विकास करण्याचे ठरवून निविदा मागविण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली, त्याच काळात या अनधिकृत व्यावसायिक वापर करणाऱ्या १ ते ३ व ४ ते ६ ब्लॉकमधील रहिवाशांनी वेगळी चूल मांडली. महाराष्ट्र सहकार कायदा कलम १८ मधील नियम १७ अन्वये मूळ संस्थेची मान्यता घेणे आवश्यक होते. मात्र तसे न करता म्हाडा उपनिबंधकांनी दोन स्वतंत्र संस्थांना मान्यता दिली. स्वयंपुनर्विकासाचा दावा करणाऱ्या या गुंतवणूकदार रहिवाशांची क्षमता आहे. मात्र इतर रहिवाशांची तशी परिस्थिती नाही. त्यामुळेच स्वयंपुनर्विकासाचा प्रस्ताव फेटाळण्यात आला, याकडे मूळ संस्थेचे सचिव अजय नाईक यांनी लक्ष वेधले. 

हेही वाचा… पालिकेच्या विभाग कार्यालयात उंदीर आणि घुशी सोडणार; मनसेचा इशारा

१ ते ३ व ४ ते ६ ब्लॉक सहकारी संस्थेच्या वतीने वास्तुरचनाकार अरविंद नांदापूरकर यांनी मात्र या आरोपांचा इन्कार केला. घाईघाईत विकासकामार्फत पुनर्विकास करण्यास आमचा विरोध आहे. या परिसरात अनेक प्रकल्प रखडले असल्याचा अनुभव गाठीशी असल्याने आमचा स्वयंपुनर्विकासाचा आग्रह होता. मात्र तो बहुमताने फेटाळण्यात आला. त्यामुळे आम्हाला स्वतंत्र संस्था स्थापन कराव्या लागल्या. व्यावसायिक सदनिकाधारक केवळ आमच्याच नव्हे तर इतर १२ चाळीतही आहेत. उन्नत नगरात याआधीही आणखी काही संस्थांनाही स्वतंत्र संस्था म्हणून मान्यता मिळालेली आहे. आम्ही स्वतंत्र झाल्याने एकूण पुनर्विकासावर परिणाम होणार नाही, असा दावाही त्यांनी केला.