Maharashtra : महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसानं थैमान घातलं असून नैसर्गिक आपत्तीची परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्याच्या ज्या भागांमध्ये अल्प पावसाची समस्या होती, अशा ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असून पुढील दोन दिवसदेखील पावसाचा जोर कायम राहणार आहे. या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार, एकनाथ शिंदे व संपूर्ण मंत्रीमंडळ वेगवेगळ्या ठिकाणी दौऱ्यावर आहेत. पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे.

Live Updates

Marathi News : महाराष्ट्रातील पावसासंदर्भातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी...

20:03 (IST) 25 Sep 2025

सांगलीत स्वच्छता सेवा अभियानास प्रतिसाद, स्वच्छतेच्या कार्यात देशसेवा सामावलेली - चंद्रकांत पाटील

परिसराबरोबरच प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक असून, स्वच्छता ही एकप्रकारे देशसेवा असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी केले. ...अधिक वाचा
19:56 (IST) 25 Sep 2025

उध्दव ठाकरेंनी मागण्या लेखी स्वरूपात दिल्यास विचार केला जाईल - बावनकुळे

उद्धव ठाकरे यांच्या मागण्यांवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले, उध्दव ठाकरे यांनी मागण्या माध्यमांमार्फत न करता लेखी स्वरूपात आमच्याकडे केल्यास विचार केला जाईल. ...सविस्तर वाचा
19:52 (IST) 25 Sep 2025

जळगावात ईव्हीएम यंत्र हटविण्याच्या मागणीसाठी जेलभरो आंदोलन

ईव्हीएम यंत्र हटविण्यासह इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी भारत मुक्ती, राष्ट्रीय ओबीसी, राष्ट्रीय परिवर्तन आणि बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने शहरात गुरूवारी जेलभरो आंदोलन करण्यात आले. ...सविस्तर बातमी
19:43 (IST) 25 Sep 2025

मराठा आरक्षण : आतापर्यंत सात ओबीसींची आत्महत्या, याचिकेवर तातडीने सुनावणीची मागणी; उच्च न्यायालयाकडून मात्र...

Maratha OBC Reservation : काही न्यायिक कारणास्तव या याचिकांवर ६ ऑक्टोबरपूर्वी सुनावणी घेणे शक्य नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले व तातडीच्या सुनावणीस नकार दिला. ...सविस्तर बातमी
19:43 (IST) 25 Sep 2025

सांगलीत पावसाळी हंगामातही सौर ऊर्जेद्वारे साडेसदतीस लाख युनिट वीजनिर्मिती

घराच्या छतावर बसविण्यात आलेल्या सौर पॅनलच्या माध्यमातून पावसाळी हंगाम असूनही ऑगस्टमध्ये जिल्ह्यात सौर ऊर्जेद्वारे ३७ लाख ३२ हजार युनिट वीज निर्मिती झाली ...सविस्तर बातमी
19:43 (IST) 25 Sep 2025

सांगलीत पावसाळी हंगामातही सौर ऊर्जेद्वारे साडेसदतीस लाख युनिट वीजनिर्मिती

घराच्या छतावर बसविण्यात आलेल्या सौर पॅनलच्या माध्यमातून पावसाळी हंगाम असूनही ऑगस्टमध्ये जिल्ह्यात सौर ऊर्जेद्वारे ३७ लाख ३२ हजार युनिट वीज निर्मिती झाली ...सविस्तर बातमी
19:34 (IST) 25 Sep 2025

सांगलीत आघाडीच्या निषेध सभेला महायुतीचे ‘इशारा सभा’चे आव्हान; विरोधकांच्या वक्तव्यांचेही प्रदर्शन मांडणार

विरोधकांच्या गैरकारभाराचा समाचार घेण्यासाठी महायुतीतर्फे एक ऑक्टोबर रोजी ‘इशारा सभा’ घेऊन विरोधकांनी केलेल्या वक्तव्याचेही प्रदर्शन ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ...वाचा सविस्तर
19:24 (IST) 25 Sep 2025

कोल्हापुरात सणाच्या काळात भिक्षेकऱ्यांची संख्या वाढली, उपद्रवाने भाविक, पर्यटक त्रस्त

दसरा दिवाळीचे दिवस आले की कोल्हापुरात या कालावधीत भिक्षेकरांची संख्या लक्षणीयरीत्या वाढते. देवदर्शनासाठी आलेल्या भाविक- पर्यटकांच्या अक्षरशः अंगचटीला पडून भीक मागण्याच्या पद्धतीमुळे ते त्रस्त झालेले आहेत. ...सविस्तर बातमी
19:03 (IST) 25 Sep 2025

ऑनलाइन गेमिंग ॲप्सच्या नावाखाली सुरू होता जुगार…. पोलीस तपासात समोर आली धक्कादायक माहिती….

रायगड पोलीसांच्या सायबर सेल विभागाने एका ऑनलाईन जुगाराचा उलगडा गेला आहे. राजस्थान मधून एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून, या प्रकरणात कोट्यावधींचे व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले आहे. ...सविस्तर बातमी
18:51 (IST) 25 Sep 2025

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याबरोबर पुढे निघताना नरेंद्र पाटील मागे 'पडले'!

माथाडी कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे होते. माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निघत असताना,चालकाने गाडी सुरू केल्याने पाटील कोसळले. ...सविस्तर वाचा
18:28 (IST) 25 Sep 2025

दोडामार्ग:​तिलारी घाटात संशयावरून कार पेटवली, चालकाला मारहाण

बेळगाव-दोडामार्ग-गोवा मार्गावरील तिलारी घाटात एका कारला आग लावल्याने खळबळ उडाली आहे. गोमांस वाहतुकीच्या संशयावरून काही अज्ञात व्यक्तींनी ही घटना घडवली. ...सविस्तर बातमी
18:16 (IST) 25 Sep 2025

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना पूर्ण मदत करा, काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांची मागणी

महाराष्ट्रात, विशेषतः मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे सरकारने बाधित शेतकऱ्यांना संपूर्ण मदत करावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे ...वाचा सविस्तर
18:09 (IST) 25 Sep 2025

Dhule Women Health Checkup: स्वस्थ नारी- सशक्त परिवार अभियानात जिल्ह्यात २७ हजार महिलांची तपासणी

‘सशक्त स्त्री- सशक्त परिवार- सशक्त समाज’ या संकल्पनेला बळ देण्यासाठी जिल्ह्यातील ४१ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि २३२ उपकेंद्रांच्या माध्यमातून ग्रामस्तरावर 'स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान' राबविण्यात येत आहे. ...वाचा सविस्तर
17:40 (IST) 25 Sep 2025

पुणे: इंद्रायणी नदीत विवाहितेच उडी; ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून…

पुण्याच्या मावळमध्ये इंद्रायणी नदीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या विवाहित महिलेला वन्यजीव रक्षक आणि ग्रामस्थांनी जीवनदान दिलं आहे. ...वाचा सविस्तर
17:34 (IST) 25 Sep 2025

महामार्गावर आंतरराज्य टोळीकडून लुटमार; एक जण मध्य प्रदेशातून ताब्यात

पोलिसांनी मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील साजीद खान (२० रा. खेरवा) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २३ हजार रुपयांचे दोन भ्रमणध्वनी जप्त केले. ...अधिक वाचा
17:13 (IST) 25 Sep 2025

अतिवृष्टीग्रस्तांसाठी १३३९ कोटी रुपयांचा निधी - मकरंद पाटील मदत व पुनर्वसन मंत्री यांची माहिती

अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा व मदत देण्यासाठी शासन संवेदनशील असून, मदत देण्यासाठी १३३९ कोटी ४९ लाख २५ हजार रुपयांच्या निधीस शासनाने मान्यता दिली आहे. ...सविस्तर बातमी
17:11 (IST) 25 Sep 2025

शेअर बाजारात महिला गुंतवणूकदारांची संख्या वाढतेय… बघा किती आहेत गुंतवणूकदार

एनएसईच्या आकडेवारीनुसार, विद्यमान वर्षात जानेवारीमध्ये बाजारमंचाने ११ कोटींचा टप्पा ओलांडला होता. एनएसईने कामकाज सुरू केल्यानंतर १४ वर्षांनी, १ कोटी गुंतवणूकदारांचा टप्पा गाठला होता. ...वाचा सविस्तर
16:48 (IST) 25 Sep 2025

Devendra Fadnavis Interview: "भाजपाला आता संघाची गरज नाही", देवेंद्र फडणवीसांनी दिलं जे पी नड्डांच्या 'त्या' विधानावर स्पष्टीकरण; म्हणाले...

Devendra Fadnavis News: जे. पी. नड्डांनी लोकसभा निवडणुकांआधी केलेल्या वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ...अधिक वाचा
16:29 (IST) 25 Sep 2025

भाजपकडून सरकारला घरचा आहेर… जळगावात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

जळगावात नैसर्गिक आपत्तीमुळे केळीसह कपाशी, सोयाबीन, ज्वारी, भाजीपाला पिकांची मोठी हानी झाली आहे. असंख्य जनावरे दगावली असून, गोठे व चाऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. ...वाचा सविस्तर
16:28 (IST) 25 Sep 2025

PETA INDIA : माधुरी हत्तीण जिथे आहे तिकडे सुखरूप; पेटा इंडियाने केले समर्थन

कोल्हापूर जिल्ह्यातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला मठाकडे परत नेण्याची मागणी होत असतानाच आता पेटा इंडियाने माधुरी हत्तीणीची जुनी ध्वनिचित्रफीत गुरुवारी समाजमाध्यमावर प्रसिद्ध करीत ती सध्या सुरक्षित ठिकाणी असल्याचे स्पष्ट केले आहे. ...वाचा सविस्तर
16:24 (IST) 25 Sep 2025

खानिवडे रुग्णालयाचे काम धीम्या गतीने केवळ ३० ते ३५ टक्के काम पूर्ण

मागील दहा वर्षांपासून रखडलेल्या खानिवडे येथील ग्रामीण रुग्णालयाच्या कामाला जानेवारी महिन्यात सुरवात करण्यात आली होती. मात्र सुरू असलेले काम हे अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. ...सविस्तर वाचा
16:02 (IST) 25 Sep 2025

Nandurbar Silent March Update: नंदुरबार तोडफोड, दगडफेक…१२७ समाजकंटक ताब्यात…२५ पेक्षा अधिक पोलीस जखमी

जय वळवी या तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ बुधवारी मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चा आटोपल्यानंतर काही समाजकंटकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात तोडफोड आणि दगडफेक केली होती. ...सविस्तर बातमी
15:45 (IST) 25 Sep 2025

Shilpa Shetty  Raj Kundra Fraud case : ६० कोटींच्या फसवणुकीत शिल्पा शेट्टी लाभार्थी ? बँक खात्यात १५ कोटी जमा झाले....

राज कुंद्रा याने व्यावसायिकाच्या ६० कोटी रुपयांच्या केलेल्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात आता अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे देखील नाव समोर आले आहे. ...अधिक वाचा
15:41 (IST) 25 Sep 2025

Rahul Gandhi on Marathwada Rain: मराठवाड्यातील पूरस्थितीवर राहुल गांधींची पोस्ट

महाराष्ट्राच्या मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी व वित्तहानी झाल्याचं वृत्त वेदनादायी आहे. या कठीण प्रसंगी माझ्या संवेदना पीडित कुटुंबीयांसोबत आहेत. माझी सरकार व प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी बचावकार्य वेगाने कराने व पिकांच्या झालेल्या नुकसानीचा लवकरात लवकर अंदाज घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना व नेत्यांना माझा आग्रह आहे की त्यांनी या कामी प्रशासनाला सहकार्य करावे व गरजू व्यक्तींना शक्य ती सर्व मदत करावी - राहुल गांधी, लोकसभा विरोधी पक्षनेते

https://twitter.com/RahulGandhi/status/1971100475413147802

15:34 (IST) 25 Sep 2025

Patrachawl Redevelopment Goregaon : पत्राचाळीतील २३४३ घरांच्या बांधकामाची प्रतीक्षा संपणार....

सर्वोच्च न्यायालयाने गृहप्रकल्पाच्या कामावरील स्थगिती उठवून कामाचा मार्ग मोकळा केला आहे. आता मुंबई मंडळाकडून आठवड्याभरात पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. ...सविस्तर वाचा
15:27 (IST) 25 Sep 2025

Jalgaon Gold Silver Rates: उच्चांकी दरवाढीनंतर… जळगावमध्ये सोने झाले स्वस्त !

जळगावात नवरात्रीच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी सोन्यात प्रति १० ग्रॅम अनुक्रमे ११३३ आणि २१६३ रूपयांची वाढ झाली. त्यामुळे दसऱ्यापर्यंत सोन्याची किंमत आणखी किती उंची गाठते, त्याकडे ग्राहकांसह व्यावसायिकांचे लक्ष होते. ...वाचा सविस्तर
15:17 (IST) 25 Sep 2025

अभिनेत्री पूजा बॅनर्जीची दीड कोटींची फसवणूक, फरार निर्मात्याला अटक

अभिनेत्री पूजा बॅनर्जी मालाड येथे राहते. तिने अनेक हिंदी, तमीळ आणि भोजपुरी चित्रपटात काम केले आहे. तिचा निर्मात शाम डे (४७) याच्यासोबत आर्थिक वाद होता. ...वाचा सविस्तर
15:06 (IST) 25 Sep 2025

राज्य मंडळातील प्रवेशासाठी अनिवासी भारतीय मराठी मुलांची नोंदणी सुरू; गतवर्षी १०३ विद्यार्थ्यांनी केली होती नोंदणी

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर बृहन्महाराष्ट्र मंडळ नॉर्थ अमेरिका व महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभाग यांच्यामध्ये अनिवासी भारतीय मराठी पालकांच्या मुलांना मराठी भाषा शिकता यावी यासाठी डिसेंबर २०२४ मध्ये सामंजस्य करार झाला. ...सविस्तर बातमी
14:44 (IST) 25 Sep 2025

गुजरातला जोडणाऱ्या मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी जय्यत तयारी… घाट दुरुस्तीच्या कामात गरोदर मातांच्या प्रसुतीकडे लक्ष कसे ?

घाटातील हे काम तीन महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होईल. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याची कार्यवाही प्रादेशिक परिवहन विभागाने लवकर करावी. ...वाचा सविस्तर
14:36 (IST) 25 Sep 2025

खुशखबर ! वर्धेकरांना पुन्हा एक अमृत भारत एक्सप्रेस गाडी. आरक्षण नसलेल्यांना,,,,

भारतीय रेल्वेने ब्रह्मपूर (ओडिशा) आणि उधना (सुरत) यांना जोडणारी नवीन साप्ताहिक अमृत भारत एक्सप्रेस सुरू करण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या गाडीचे उद्घाटन २७ सप्टेंबर २०२५ रोजी ब्रह्मपूरहून विशेष सेवा म्हणून होणार आहे. ...सविस्तर बातमी

maharashtra rain damage 57000 hectare farmland affected in jalgaon floods

"जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे कपाशी, मका व इतर पिकांचे मोठे नुकसान." (छायाचित्र - लोकसत्ता टीम)

Marathi News Live Today: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर!