Maharashtra Monsoon Session 2025 Live Updates, 11 July : राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विविध मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येत असल्याचं पाहायला मिळत आहे. यातच गुरुवारी विधानसभेत जनसुरक्षा विधेयक मंजूर करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जनसुरक्षा विधेयक सादर केलं, त्यानंतर त्यावर चर्चा झाली आणि नंतर आवाजी मतदानाने हे विधेयक मंजूर करण्यात आलं. आता हे विधेयक विधानपरिषदेत सादर करण्यात येण्याची शक्यता आहे.
या अधिवशनाच्या दरम्यान आकाशवाणी आमदार निवासाच्या कॅन्टिनमधील एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याने संजय गायकवाड यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली. या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची देखील चर्चा आहे. या बरोबरच राज्यभर विविध ठिकाणी मुसळधार पावसानेही हजेरी लावल्याचं दिसत आहे. दरम्यान, राज्यातील राजकीय व इतर महत्त्वाच्या घडमोडी या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Latest Maharashtra News Live Today : राज्यातील राजकीय व इतर महत्त्वाच्या घडमोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
'तो' भोंदू बाबा बघायचा पॉर्न व्हिडिओ; पोलीस तपासात धक्कादायक खुलासे, अनेक भक्तांचे व्हिडिओ…
विधिमंडळ अंदाज समितीमुळे गाजलेल्या धुळे विश्रामगृह रोकड प्रकरणी अखेर खंडणीचा गुन्हा
नाशिक बाजार समितीच्या माजी सभापतीविरुध्द गुन्हा
मुख्यमंत्रीपदासाठी शिंदे भाजपमध्ये विलीनीकरणास तयार, गुरुपौर्णिमेनिमित्त अमित शहांची पूजा केली - संजय राऊत यांचा दावा
वैद्यनाथ देवस्थानच्या जमिनीवर घरकुलांचे वाटप; परळीतील पुजाऱ्यांचा आरोप
‘शक्तिपीठ’साठी रास्त मोबदला देणार; शेतकऱ्यांची तयारी - राजेश क्षीरसागर
चांदोली अभयारण्यग्रस्तांना रोख मोबदला देण्याची मागणी
पंढरपुरात सामाजिक कार्यकर्त्यास १० लाखांची खंडणी घेताना अटक
पंढरीत आषाढी यात्रेची सांगता; हजारो भाविक सामील
शक्तिपीठ रद्दसाठी कोल्हापुरात कृती समितीचे महालक्ष्मीला साकडे
कोयनेतून जलविसर्गाचे नियोजन करा - शंभूराज देसाई
इचलकरंजीचा पाणी प्रश्न भरकटवण्यासाठी झेडएलडी योजना; विरोधकांचा आरोप
Sudhir Mungantiwar: दारूबंदी विधेयकाचा प्रस्ताव मांडताना सुधीर मुनगंटीवारांचे अजब विधान; म्हणाले, 'दारुड्यांना अशी शिक्षा द्या की…'
कँटिन कर्मचारी मारहाण प्रकरण: आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल
मंत्रालयाजवळील आमदार निवासामधील उपहारगृहातील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वायरल चित्रफीतीच्या आधारे मरिन ड्राईव्ह पोलिसांनी स्वतः याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गायकवाड यांनी केलेल्या मारहाणीची मुद्दा सभागृहातही गाजला होता.
विधानपरिषदेत जनसुरक्षा विधेयक मंजूर
राज्याचं अधिवेशन सुरु असून आज विधानपरिषदेत जनसुरक्षा विधेयक मंजूर कण्यात आलं आहे. याआधी हे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आलं होतं. या विधेयकाच्या मंजुरीला विरोधकांनी सभात्याग केला. मात्र, विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर हे विधेयक मंजूर करण्यात आलं आहे.
Video: ‘अशी’ केली जाते दूध भेसळ, पाहा काय मिसळलं जातंय रोजच्या दुधात; विधानभवनाबाहेर गोपीचंद पडळकरांचं प्रात्याक्षिक!
Gopichang Padalkar on Milk Adulteration: दुधात भेसळ होते की नाही? झाली तर कोणत्या प्रकारची होते? आपल्या घरात येणारं दूध हे चांगलं आहे की भेसळयुक्त? दूध कधी अचानक पातळ किंवा कधी घट्ट का येतं? असे अनेक प्रश्न आपल्याला रोजच्या रोज पडत असतात. कारण दुकानातून आणलेली दुधाची पिशवी किंवा डेअरीतून थेट घरपोच येणारं दूध या दोन माध्यमातूनच बहुतांश घरांमध्ये दूध पोहोचत असतं. पण याच दुधाबाबत अनेकदा संशय वा शंका निर्माण होते. या पार्श्वभूमीवर दुधात नेमकी भेसळ कशी केली जाते, याचं प्रात्याक्षिक भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज विधानभवनाबाहेर दिलं आहे!
वाचा सविस्तर
Sanjay Shirsat Viral Video : "५० खोके एकदम ओके'मधला एक खोका आज दिसला", आदित्य ठाकरेंची संजय शिरसाटांवर टीका
Sanjay Shirsat: संजय शिरसाट यांच्या घरातील कथित पैशाच्या बॅगेचा व्हिडिओ कोणी व्हायरल केला? शिरसाट म्हणाले, 'आमच्याकडे…'
“पैशांनी भरलेली बॅग, हातात सिगारेट”, राऊतांकडून शिरसाटांचा VIDEO शेअर; म्हणाले, “IT च्या नोटिशीनंतर…”
शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व शिवसेनेचे (शिंदे) नेते संजय शिरसाट यांच्याबद्दल गंभीर दावे केले आहेत. “मंत्री हॉटेलमध्ये पैशांच्या बॅगा घेऊन बसले आहेत”, असा दावा राऊत यांनी केला आहे. यासह राऊत यांनी एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसतंय की मंत्री संजय शिरसाट एका खोलीमधील बेडवर फोनवर बोलत आहेत व सिगारेट ओढत आहेत. या व्हिडीओमध्ये बेडशेजारी एक बॅग देखील दिसत आहे. या बॅगेत नोटांची बंडलं आहेत. या व्हिडीओमध्ये संजय शिरसाट यांची श्वान देखील दिसत आहे.
‘एकनाथ शिंदेंनी फडणवीसांची दिल्लीत तक्रार केली’ : संजय राऊत यांचा दावा
“देवेंद्र फडणवीस हे कोंडी करत आहेत, ते आम्हाला काम करू देत नाहीत, आमच्या आमदारांच्या चौकशा लावल्या आहेत. ते आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारच्या तक्रारी एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे केल्या आहेत”, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
“तसेच एकनाथ शिंदेंनी एक ऑफर दिली की महाराष्ट्रात मराठी माणसांची जी एकजूट होत आहे. ही एकजूट अधिक भक्कम होईल. त्याचा त्रास महायुतीला होईल. त्यामुळे काहीही करून तुम्हाला (अमित शाह) यामध्ये लक्ष घालावं लागेल. मराठी माणसांची एकजूट कशा प्रकारे तोडता येईल हे पाहावं लागेल. जर ही एकजूट तुटली नाही तर राजकीय दृष्ट्या आपल्याला फार नुकसान होईल, यावर एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याशी चर्चा केली”, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
Sanjay Raut : "एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी पक्ष भाजपात विलीन करायला तयार", 'या' नेत्याचा मोठा दावा; राजकारणात खळबळ
Brij Bhushan Singh : "…तर ते तुम्हाला झेपणार नाही"; ब्रिजभूषण शरण सिंह यांचा राज ठाकरेंना इशारा; म्हणाले, "भाषा…"
"मुख्यमंत्री पदासाठी पक्ष भाजपात विलिन करायला शिंदे तयार", संजय राऊत यांचा दावा
"उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरु पौर्णिमेनिमित्तच्या निमित्ताने दिल्ली जाणार होते. मी जे काही बोलत असतो ती माहिती अधिकृत असते. याआधी देखील मी त्यांच्या भेटीबाबत सांगितलं आहे. एकनाथ शिंदे यांनी गुरु म्हणून अमित शाह यांची पूजा केली. त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं, चरणावर चाफ्याची फुले वाहिली. त्यानंतर ते त्या ठिकाणी इतर नेत्यांना देखील भेटले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची तक्रार केली", असं संजय राऊत यांनी म्हटलं. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षासह भाजपात विलीन व्हायला तयारी दर्शवली. मात्र, मुख्यमंत्री करा अशी अट शिंदेंनी अमित शाह यांच्याकडे ठेवल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
Video : नंदुरबार जिल्ह्यात विद्यार्थ्यांचा धोकादायक शालेय प्रवास
वसमतच्या दोन भाविक महिलांचा कर्नाटकातील अपघातात मृत्यू, शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार
महायुतीतील अंतर्गत कुरघोड्यांमुळे एकनाथ शिंदे दिल्लीत? आमदार रोहित पवारांचा मोठा दावा; म्हणाले, “फक्त शिंदेंकडेच…”
Eknath Shinde Delhi Visit: गेल्या दोन दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या दिल्ली दौऱ्याची मोठी चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. ऐन अधिवेशनाच्या गडबडीत उपमुख्यमंत्र्यांनी अचानक दिल्ली गाठल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात महत्त्वाची विधेयके चर्चेला येण्याची शक्यता असूनही एकनाथ शिंदे दिल्लीला गेल्यामुळे त्यामागे नेमकं काय कारण होतं? यावर तर्कवितर्क चालू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी मोठा दावा केला आहे.
पावसामुळे भाज्या कडाडल्या; सर्वच भाज्यांचे दर ४० रुपये पावशेरपुढे
DCM Eknath Shinde News: महायुतीतील अंतर्गत कुरघोड्यांमुळे एकनाथ शिंदे दिल्लीत? आमदार रोहित पवारांचा मोठा दावा; म्हणाले, "फक्त शिंदेंकडेच…"
"अशीही लपवालपवी...", रोहिणी खडसे यांच्या ट्विटची चर्चा
"सध्या राज्याचे विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे. मात्र विधिमंडळ परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनापासून अवघ्या ५० फुटांवर हा कचऱ्याचा ढीग आहे. आज सकाळी माध्यमांनी विधीमंडळ परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे, ही बाब समोर आणली. त्यानंतर अपेक्षा होती विधिमंडळ परिसरात असलेला कचरा तत्काळ उचलला जाईल. मात्र, झालं उलट यांनी आपल्या चुका लपवण्यासाठी माध्यमांना वार्तांकन करण्यापासून रोखलं आणि या ठिकाणी कचरा झाकण्यासाठी मोठे पडदे लावले. लपवाछपवी करण्यात या सरकारला अवॉर्डच दिले पाहिजे. आपल्या चुका सुधारणार नाहीत पण त्यावर पांघरूण घालण्यात हे माहीर आहेत", असं रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे.
"लपवालपवी अशीही लपवालपवी, विधानभवनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात बाजूला साचलेला कचरा नंतर अशाप्रकारे पांढरे कपडे लावून झाकण्यात आला", असं रोहिणी खडसे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
https://platform.twitter.com/widgets.jsPart - 2
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) July 10, 2025
लपवालपवी अशीही लपवालपवी !
विधानभवनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात बाजूला साचलेला कचरा नंतर अशाप्रकारे पांढरे कपडे लावून झाकण्यात आला. https://t.co/nSe6oQGT60 pic.twitter.com/szJLW2Lecn
राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरु असून विविध मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येत असल्याचं पाहायला मिळत आहे. (फोटो-संग्रहित छायाचित्र)