Maharashtra Live News Updates, 29 October 2025 : शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी मंगळवारी (२८ ऑक्टोबर) संध्याकाळपासून नागपूर हैदराबाद महामार्गावर शेतकऱ्यांसह ठिय्या मांडला आहे. त्यामुळे यवतमाळ नागपूर, चंद्रपूर -नागपूर हे सर्व महामार्ग बंद पडले आहे. महामार्गांवर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या चक्काजाम आंदोलनात भाजपाचे आमदारही अडकल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, बच्चू कडू यांनी सरकारला इशारा दिला आहे की दुपारी १२ वाजेपर्यंत “आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही महाराष्ट्र जाम करणार.” तर, “बच्चू कडू यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष ठेवून आहेत”, असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं.
नागपुरातील आंदोलनामुळे चार राष्ट्रीय महामार्ग ठप्प असून १४ तासांहून अधिक काळ वाहतूक बंद आहे. यामुळे नागपूर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. या आंदोलनाच्या सर्व बातम्यांचा आढावा आपण या लाइव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
दरम्यान, फलटणमधील डॉक्टर तरुणीचा मृत्यू गळफासामुळेच झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं आहे. तर, मुलीच्या कुटुबियांनी हत्येचा आरोप केला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक धागेदोरे मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणातील सर्व अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत.
शिवसेनेने (उबाठा) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली असून मुंबई महानगरपालिकेत पक्ष नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे ज्यांचं वय ६० वर्षांहून अधिक असेल त्यांनी पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.
मोंथा चक्रीवादळाने आंध्र प्रदेश व ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावर थैमान घातलं आहे. या चक्रीवादळाने आतापर्यंत तिघांचा बळी घेतला आहे. तर, सुरक्षिततेसाठी हजारो लोकांना किनाऱ्यापासून दूर हलवण्यात आलं आहे.
Maharashtra Weather Today Live Updates : राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातील राजकीय व सामाजिक घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.
Bacchu Kadu Farmers Protest Nagpur : समृद्धी मार्गावर टायर जाळले; बच्चू कडूंच्या आंदोलनाने घेतले उग्र वळण...
पाच वर्षांत देशात वाढणार ७५ हजार वैद्यकीय जागा! वैद्यकीय शिक्षणाच्या दर्जाचा मुद्दा अधांतरीच….
पाच वर्षांत देशात वाढणार ७५ हजार वैद्यकीय जागा! वैद्यकीय शिक्षणाच्या दर्जाचा मुद्दा अधांतरीच….
Bacchu Kadu Farmers Protest Nagpur : शेतकऱ्यांसाठी बच्चू कडूंचा निर्धार! रस्त्यावर रात्र, सकाळी ठिय्या...
पुण्यात रिक्षांमुळे वाहतूक कोंडी, परवाने देणे बंद करा, कोणी केली राज्य सरकारकडे मागणी !
अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेशाच्या आमिषाने २१ लाखांची फसवणूक
Nagpur Farmers Protest : वर्धा, चंद्रपूर ,यवतमाळकडे जाणारी वाहतूक पूर्णत: थांबली; रस्त्यावरच झोपले आंदोलक
अहिल्यानगर जिल्ह्यात पक्षांतराला सुरुवात
Police Recruitment 2025 : तरूणांना पोलीस बनण्याची संधी... जळगावमध्ये १७१ जागांसाठी भरती !
विश्लेषण : टाटा ट्रस्ट्समधून हकालपट्टी झालेले मेहली मिस्त्री कोण? टाटा विरुद्ध मिस्त्री वादाचा फटका?
मुख्यमंत्री फडणवीसांची अजित पवारांवर कुरघोडी
"मुंबईला येणार नाही, चर्चा करायची असेल तर...", नागपूर जाम केल्यानंतर बच्चू कडूंचा सरकारला इशारा
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "सरकार बच्चू कडूंसह सर्व शेतकरी नेत्यांशी, आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करण्यासाठी तयार आहे. मात्र, कोणताही नेता चर्चेला यायला तयार नाही. सरकार चर्चा करायला तयार आहे. मात्र, ते लोक चर्चेसाठी का येत नाहीत ते आम्हाला माहिती नाही."
दरम्यान, बच्चू कडू म्हणाले, "आम्ही आंदोलकांना सोडून, आंदोलन अर्ध्यात सोडून मुंबईला जाणार नाही. सरकारला आंदोलकांशी, शेतकऱ्यांची चर्चा करायची असेल तर त्यांनी नागपूरला येऊन चर्चा करावी. सर्व मागण्या मान्य कराव्या किंवा त्यावर तोडगा काढावा. आम्ही देखील सरकारची चर्चा करण्यासाठी तयार आहोत."
Farmers Protest Nagpur : शेतकरी आंदोलन तापले! बच्चू कडू, राजू शेट्टी, महादेव जानकर रस्त्यावरच झोपले.....वाहतूक कोंडी
कबुतरखान्यांवर तोडगा काय? पर्यायी जागेचे आयुक्तांचे जैन शिष्टमंडळाला आश्वासन
Bacchu Kadu Farmers Protest : चक्काजाम आंदोलनात भाजप आमदार अडकले; प्रहार कार्यकर्त्याने पकडून बच्चू कडूकडे नेले
म्हाडाच्या पुण्यातील ४,१८६ घरांची सोडत लांबणीवर; अर्जविक्री-स्वीकृतीला मुदतवाढ
Vijay Wadettiwar Income Tax Notice : ओबीसींचा महामोर्चा काढणारे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांना आयकर खात्याची नोटीस
Maharashtra Agriculture Department : नोव्हेंबर क्रांती ! आता कृषी अधिकारी-कर्मचारी थेट शेतकऱ्यांच्या संपर्कात
Rohit Sharma or Virat Kohli : सविस्तर : विश्वचषकासाठी रोहित किंवा विराट? सिडनी सामन्यानंतर परिस्थितीत बदल ?
अंधारात शेतकरी, प्रकाशात लावणी: असंवेदनशील राष्ट्रवादीचा ‘नागपूर पॅटर्न’
"आमदारच नव्हे दोन-चार मंत्र्यांना कापा", शेतकरी आंदोलनावेळी रवीकांत तुपकरांचं वादग्रस्त वक्तव्य
"केवळ आमदारच नव्हे तर दोन-चार मंत्र्यांना कापा", असं वादग्रस्त वक्तव्य रवीकांत तुपकर यांनी केलं आहे. कर्जमाफीसाठी नागपुरात शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे. यावेळी आंदोलकांना संबोधित करताना तुपकरांनी सल्ला दिला की "कर्जमाफीसाठी दोन-चार मंत्र्यांना कापा. नेपाळमध्ये मंत्र्यांना तुडवून मारलं, त्यानंतर ते देश सोडून पळून गेले, तसंच इथल्या भ्रष्ट राजकारण्यांना मारलं पाहिजे. बच्चू कडू यांनी आपल्याला सांगितलं की आमदाराला कापा, मी त्यापुढे जाऊन सांगतो की दोन-चार मंत्र्यांना कापा."
