scorecardresearch

Maharashtra News : टेंभी नाक्यावरील देवीच्या उत्सवाला रश्मी ठाकरेंची उपस्थिती? यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर…

Maharashtra Political Crisis, Shinde vs Thckeary : राज्यातील राजकारण, न्यायालयीन घडामोडी आणि अन्य बातम्या वाचा एकाच ठिकाणी.

Maharashtra News : टेंभी नाक्यावरील देवीच्या उत्सवाला रश्मी ठाकरेंची उपस्थिती? यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर…
महाराष्ट्र मराठी ब्रेकिंग न्यूज

Maharashtra Breaking News Updates, 29 September 2022 : नवरात्रोत्सवादरम्यान ठाण्यामधील टेंभी नाक्यावरील देवीच्या दर्शनासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना आणि शिंदे गट आमने-सामने आल्याचं चित्र दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्यामधील वादामुळे आधीच टेंभी नाक्याचा नवरात्रोत्सव यंदा अधिक चर्चेत आहे. शिंदे आणि विचारे यांचे राजकीय गुरु आनंद दिघेंनी सुरु केलेल्या या उत्सवाला रश्मी ठाकरे हजेरी लावणार असल्याने गर्दी गोळा करण्यासाठी मुंबईतून महिला आणल्या जातील अशी शक्यता शिंदे गटाने व्यक्त केली आहे.

तर भाजपा नेत्या पंकजा मुंडे गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांनी एका कार्यक्रमात केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्या नाराजीवरून तर्क-वितर्क सुरू झाले होते. त्यानंतर खुद्द पंकजा मुंडेंनीही त्यावर स्पष्टीकरण देत आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढल्याचं सांगितलं होतं. बीडमधील त्यांच्या या विधानानंतर आता अजून एका उपहासात्मक विधानाची चर्चा आहे. बीडच्याच एका कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडेंनी ‘मी सध्या बेरोजगारच आहे’, असं म्हणताच उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली. यावेळी पंकजा मुंडेंनी सोशल मीडियावरच्या ट्रोलिंगचाही समाचार घेतला.

या घडामोडींसह राज्य, देश तसेच जगभरातील सर्व घडामोडींचा आढावा एका क्लिकवर

Live Updates

Mumbai-Maharashtra Latest News Updates, 29 September 2022 : राज्यातील राजकारण, न्यायालयीन घडामोडी आणि अन्य बातम्या वाचा एकाच ठिकाणी 

19:04 (IST) 29 Sep 2022
संजय शिरसाठांच्या हवाल्याने खैरेंचा एकनाथ शिंदे यांच्याबाबत नवा गौप्यस्फोट ; अशोक चव्हाणांच्या वक्तव्यात नवी भर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतून फुटून काँग्रेसमध्ये जाणार होते,  असे आपणास आमदार संजय शिरसाठ यांनी काही वर्षांपूर्वी सांगितले होते. तेव्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे सरकार होते. पण पृथ्वीराज चव्हाण यांनी ते काही होऊ दिले नाही, असा नवा गौप्यस्फोट करत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी अशोक चव्हाण यांच्या वक्तव्यात नवी भर टाकत एकनाथ शिंदे यांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सविस्तर वाचा…

18:46 (IST) 29 Sep 2022
अमरावतीत कॉफी कॉर्नरमध्ये प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे; दोन जोडपी ताब्यात

शहरातील अनेक कॉफी कॉर्नर, फास्ट फूड सेंटर व काही हॉटेल्समध्ये प्रेमीयुगुलांना अश्लील चाळे करण्यासाठी पैसे मोजून जागा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस कारवाईतून गेल्या काही दिवसांमध्ये समोर आला आहे. गानुवाडी परिसरातील ग्राउंड व्ह्यू कॉफी कॉर्नरमध्येही असे प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर राजापेठ पोलिसांनी या तेथे छापा टाकून दोन प्रेमीयुगुलांना आक्षेपार्ह अवस्थेत पकडले.

सविस्तर वाचा…

18:32 (IST) 29 Sep 2022
मुंबईः विक्रोळीत दुचाकीस्वाराच अपघातात मृत्यू

विक्रोळीमधील गांधीनगर पुलावर बुधवारी रात्री १० च्या सुमारास रस्त्यावर ठेवलेल्या ब्लॉकला धडकून बेस्ट बस खाली आल्यामुळे एका २१ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी बेस्ट बस चालकाला पार्कसाईट पोलिसांनी अटक केली. सविस्तर वाचा…

18:21 (IST) 29 Sep 2022
बच्चू कडूंना राग का येतो ?

माजी राज्यमंत्री आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्याच कार्यकर्त्याला कानशिलात लगावल्याची चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर पुन्हा एकदा बच्चू कडूंना येणारा संताप आणि हात उगारण्याच्या घटनांची चर्चा रंगू लागली आहे. शिंदे -फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाने हुलकावणी दिल्याने बच्चू कडू यांची चिडचिड वाढलेली तर नाही ना अशीही कुजबूज सुरू झाली आहे.  सविस्तर वाचा…

18:19 (IST) 29 Sep 2022
कोल्हापुरात ग्रामपंचायत सदस्य , ग्राम विकास अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले

कोल्हापूर : सार्वजनिक शौचालय बांधकाम बांधकामाच्या देयकाची रक्कम मंजूर करण्यासाठी लाचेची रक्कम मागितल्या प्रकरणी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक यांना गुरुवारी रंगेहात पकडण्यात आले. बातमी वाचा सविस्तर …

17:50 (IST) 29 Sep 2022
नंदुरबारच्या शहादामध्ये ट्रॅव्हल्स आणि आयशरची जोरदार धडक

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरातील बायपास रस्त्यावर खाजगी ट्रव्हल्स आणि आयशर यांच्यात भीषण धडक झाली आहे. बातमी वाचा सविस्तर …

17:40 (IST) 29 Sep 2022
सामान्य लोकलच्या फेऱ्यांवर गंडांतर ; वातानुकूलित लोकलच्या २३ फेऱ्या वाढविणार – पश्चिम रेल्वेवर १ ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू

पश्चिम रेल्वेने १ ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या वेळापत्रकात वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या असून १५ डब्यांच्या लोकलचा विस्तार करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेने आणखी ३१ वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सविस्तर वाचा…

17:06 (IST) 29 Sep 2022
एकल महिलांच्या सन्मानासाठी ‘अभया’ अभियान

पुणे : विधवा, परित्यक्ता, एकटी बाई, घटस्फोटित, नवरा सोडलेली, नवऱ्याने टाकलेली, बिना लग्नाची असे शब्द वापरून आपण एकल महिलांचा अपमान करतो. अशा शब्दांचा त्या व्यक्तीवर सखोल परिणाम होत असतो. बातमी वाचा सविस्तर …

16:55 (IST) 29 Sep 2022
मद्यपी मुलाकडून आईवर चाकूने हल्ला ; लोणी काळभोरच्या कदमवाक वस्तीमधील घटना

दारूच्या आहारी गेलेल्या मुलाने आईवरच चाकूने हल्ला करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. लोणी काळभोरमधील कदमवाक वस्ती येथील बालाजी हाईस इमारतीत ही घटना घडली. याप्रकरणी आरोपीला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. अभिजित गोपीचंद दरेकर (वय ३२, रा. बालाजी हाईटस, संभाजीनगर, कदमवाकवस्ती) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सविस्तर वाचा…

16:35 (IST) 29 Sep 2022
बुलढाणा : लहान बाळासह वाहनात बसून दाम्पत्याचे उपोषण

संगणक परिचालक नियुक्तीमध्ये करण्यात आलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ एका दाम्पत्याने जिल्हा परिषद समोर लहान बाळासह वाहनात बसून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. नीलेश तायडे व अस्मिता तायडे असे या दाम्पत्याचे नाव आहे. ११ महिन्यांच्या बाळासह त्यांनी महेंद्र पिकअप या वाहनात उपोषण सुरू केले आहे. सविस्तर वाचा…

16:34 (IST) 29 Sep 2022
सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धेत कल्याण डोंबिवली पालिकेच्या अभियंत्यांचे यश

कल्याण : सातार येथे गेले अनेक वर्षापासून आयोजित करण्यात येत असलेल्या सातारा हिल मॅरेथाॅन या अवघड स्पर्धेत कल्याण डोंबिवली पालिकेतील अभियंता असलेल्या दोन सायकल पटुंनी महत्वाची कामगिरी बजावली आहे. बातमी वाचा सविस्तर …

16:20 (IST) 29 Sep 2022
सप्तश्रृंग गडावरील पायऱ्यांवर बोकड बळीस सशर्त परवानगी ; उच्च न्यायालयाचा निकाल

नाशिक : कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गडावर दसऱ्याच्या दिवशी मंदिराच्या पायऱ्यांवरील दसरा टप्प्यावर पूर्वीपासून सुरु असलेली बोकड बळी देण्याची प्रथा पाच वर्षांपासून प्रशासनाने बंद केलेली होती. प्रथा पुन्हा सुरू करण्यासाठी दाखल जनहित याचिकेवर गुरुवारी उच्च न्यायालयात सुनावणी होवून न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या बाजूने निकाल देत अटी-शर्तीनूसार बोकड बळी देण्याची प्रथा परंपरा पूर्ववत सुरु करण्यास परवानगी दिली आहे. बातमी वाचा सविस्तर …

16:10 (IST) 29 Sep 2022
राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने निसर्गप्रेमींना पर्वणी ; १ ते ९ ऑक्टोबरदरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील निसर्ग माहिती केंद्रातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही १ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या  सप्ताहाच्या निमित्ताने विविध माहितीपर कार्यक्रम, निसर्ग सहली, कार्यशाळा, प्रदर्शन आणि इतर शैक्षणिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सविस्तर वाचा…

15:58 (IST) 29 Sep 2022
पतीने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करूनही पत्नी गर्भवती

गोंदिया : दोन अपत्ये झालीत, तिसरा होऊ नये म्हणून शासनाच्या नियमाचे पालन करीत आणि आपली आर्थिक स्थिती लक्षात घेऊन पतीने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतली. मात्र, पत्नी आठ महिन्याची गर्भवती असल्याचे समोर येताच त्याला धक्का बसला. बातमी वाचा सविस्तर …

15:49 (IST) 29 Sep 2022
फडणवीसांचे दुसरे सरकार अयशस्वी करण्यातही एकनाथ शिंदे यांचा सहभाग पुन्हा चर्चेत 

२०१९ साली महाविकास आघाडी सरकारची जुळवाजुळव चाललेली असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार यांनी केलेले बंड आणि त्यातून आलेले फडणवीस-पवार सरकार अयशस्वी करण्याच्या  मोहिमेत इतर नेत्यांसोबत एकनाथ शिंदेही ‘आघाडीवीर’ होते. मुंबई विमानतळावरून पळून जाणार्‍या एका अजित पवार समर्थक आमदाराला ताब्यात घेत शिंदे यांनी नंतर हा आमदार शरद पवार यांच्या स्वाधीन केल्याचीही नोंद सापडते. 

सविस्तर वाचा…

14:59 (IST) 29 Sep 2022
ठाणे शहरात दोन दिवसांत सात हजार महिलांची आरोग्य तपासणी

ठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून संपुर्ण शहरात राबविण्यात येत असलेल्या ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानामध्ये गेल्या दोन दिवसांत पालिकेच्या आरोग्य पथकाने सात हजार महिलांची आरोग्य तपासणी केली आहे. त्यापैकी ३ हजार ९८७ महिलांची टेंभीनाक्यावरील देवीच्या मंडपाजवळ आयोजित शिबीरात आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. बातमी वाचा सविस्तर …

14:47 (IST) 29 Sep 2022
कल्याण : मुख्यमंत्री समर्थक आमदार धावले बंड्या साळवींच्या मदतीला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला ठाणे जिल्हयात भरभरून प्रतिसाद मिळत असताना, कल्याणचे शिवसेना नेते विजय उर्फ बंड्या साळवी यांनी मात्र, उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहण्याचा निर्णय घेतला. २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणूकीत जेमतेम अडीच हजार मतांनी पराभवाच तोंड पाहाव लागलेले बंड्या साळवी हे कल्याणातील शिवसेनेची धडाडती तोफ म्हणून ओळखले जातात. सविस्तर वाचा…

14:26 (IST) 29 Sep 2022
मोदींकडून सूरतमध्ये तब्बल ३४०० कोटींच्या प्रकल्पांचं उद्घाटन, म्हणाले “सूरत म्हणजे मिनी-भारत, येथे…”

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून सूरतमध्ये त्यांनी तब्बल ३४०० कोटींच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन केलं आहे. यावेळी नरेंद्र मोदींच्या हस्ते यावेळी भूमीपूजन पार पडलं. गुजरातमध्ये ३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पार पडणार असून, नरेंद्र मोदींच्या हस्ते त्याचं उद्धाटन होणार आहे. गुजरातमध्ये पहिल्यांदाच ही स्पर्धा होत आहे. मोदींच्या स्वागतासाठी सूरतमध्ये लोकांची गर्दी झाली होती.

सविस्तर बातमी

14:24 (IST) 29 Sep 2022
Thackeray vs Shinde: निवडणूक आयोगाकडे प्रकरण गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच केलं भाष्य, म्हणाले “काही तोतये…”

राज्यात सत्तांतर झाल्यानतंर ‘खरी शिवसेना कोणाची’ यावरुन शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात संघर्ष सुरु आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेलं असून, पक्षचिन्हाचा निर्णय निवडणूक आयोगाकडे सोपवण्यात आला आहे. न्यायालयातील प्रलंबित खटल्याचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगापुढील सुनावणी स्थगित करावी, अशी विनंती शिवसेनेने केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला. न्यायालयाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच यावर भाष्य केलं आहे.

सविस्तर बातमी

14:19 (IST) 29 Sep 2022
कचरा विल्हेवाट यंत्रात बिघाड टाळण्यासाठी ठाणे महापालिकेकडून चाळणीचा वापर

ठाणे : भंडार्ली येथे कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी उभारलेला तात्पुरता प्रकल्पातील यंत्रामध्ये साडी, गाद्या, फर्निचरचा कचरा अडकून हा प्रकल्प बंद पडला असून असा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून ठाणे महापालिका प्रशासनाने आता कचरा चाळूणच तो यंत्रात सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बातमी वाचा सविस्तर …

14:03 (IST) 29 Sep 2022
“अशोक चव्हाणांचा ‘आदर्श’ सर्वांना माहिती आहे”

ठाणे : २०१४ मध्ये शिवसेनेकडून काँग्रेसकडे सत्ता स्थापनेसाठी प्रस्ताव आला होता, त्यावेळी शिवसनेच्या शिष्टमंडळात एकनाथ शिंद देखील उपस्थित होते, असा मोठा गौप्यस्फोट काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी नुकताच केला होता. यावर पत्रकार परिषदमध्ये नरेश म्हस्के यांनी अशोक चव्हाण यांच्यावर सडकून टीका केली आहे. बातमी वाचा सविस्तर …

13:35 (IST) 29 Sep 2022
कल्याण मधील मेट्रो माॅल समोर नवी मुंबई परिवहनच्या बसला आग

कल्याण : कल्याणहून नवी मुंबई दिशेने कल्याण-शिळफाटा रस्त्याने धावत असलेल्या नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या एका मिडी बसला बुधवारी रात्री साडे दहा वाजता अचानक कल्याण पूर्वेतील मेट्रो माॅल समोर आग लागली. बातमी वाचा सविस्तर …

12:55 (IST) 29 Sep 2022
चंद्रकात पाटील म्हणतात गणेशोत्सवात थोडा अतिरेक झाला….

पुणे : राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वडगाव मावळ येथे पक्षाच्या बैठकीनंlर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट केली. “राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यंदा सगळे सण आणि उत्सव जल्लोषात आणि कोणत्याही निर्बंधांशिवाय साजरे केले जातील अशी घोषणा केलेली आहे. दसरा मेळाव्यावरून त्यांनी त्यांच्या पक्षाची चिंता करावी, आम्ही आमच्या पक्षाची चिंता करू अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. बातमी वाचा सविस्तर …

12:28 (IST) 29 Sep 2022
नंदुरबार जिल्ह्यात राज्य महामार्गावरील पूल कोसळला ; लालपरी थोडक्यात बचावली

नंदुरबार : जिल्ह्यातील राज्य महामार्ग क्रमांक सहावरील ६८ मीटर लांबीचा पूल गुरुवारी सकाळी कोसळला. हा पूल धानोरा आणि ईसाईनगर गावाजवळील रंका नदीवर आहे. बातमी वाचा सविस्तर …

12:09 (IST) 29 Sep 2022
वाहतूक कोंडीमुळे कल्याणवासियांचा श्वास कोंडला

कल्याण : कल्याण मधील दुर्गाडी किल्ला येथे नवरात्रोत्सवासाठी दुर्गाडी किल्ल्या जवळ वाहतुकीत बदल करण्यात आल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून कल्याण शहरातील पत्रीपूल, शिवाजी चौक, लाल चौकी, आधारवाडी, सहजानंद चौक परिसर वाहतूक कोंडीत अडकत आहे. अपुरे वाहतूक पोलीस आणि एकाच वेळी दसपटीने वाहने रस्त्यावर येत असल्याने कल्याण मधील वाहतुकीचे नियोजन पूर्ण कोलमडून गेले आहे. बातमी वाचा सविस्तर …

11:56 (IST) 29 Sep 2022
उल्हास नदीच्या पूररेषेचे फेर सर्वेक्षण होणार

बदलापूर : बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पुररेषाचे फेर सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आदेश दिले. दोन वर्षांपूर्वी जलसंपदा विभागाने उल्हास नदीची पुररेषा जाहीर केली होती. बातमी वाचा सविस्तर …

11:55 (IST) 29 Sep 2022
मुलाच्या हातून वडिलांनी मोबाईल हिसकला अन् शाळेत पाठवले, मग मुलाने केले असे काही…

चंद्रपूर : मोबाईल खेळण्यात गुंग असलेल्या मुलाच्या हातून वडिलांनी मोबाईल हिसकावून घेत त्याला शाळेत पाठवले. वडिलांच्या या कृतीचा राग आल्यामुळे अकरा वर्षीय मुलाने स्वत:चे अपहरणाचे नाट्य रचले. बातमी वाचा सविस्तर …

11:30 (IST) 29 Sep 2022
खोट्या देयकाच्या आधारे कोट्यवधींची करचोरी, नागपूरच्या व्यापाऱ्याला अटक

नागपूर : ३९ कोटींच्या बेकायदेशीर व्यवहारांच्या माध्यमातून खोट्या देयकाच्या आधारे शासनाचा ६.९८ कोटी रुपयांचा कर बुडवणाऱ्या नागपूरच्या विजय लक्ष्मणराव पेशने या व्यापाऱ्यास महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने अटक केली. बातमी वाचा सविस्तर …

11:29 (IST) 29 Sep 2022
अल्पवयीन मुलगी प्रियकरासोबत ‘नको त्या अवस्थेत’ दिसली अन्..

नागपूर : नवव्या वर्गात शिकणारी मुलगी अभ्यासाच्या खोलीत प्रियकरासोबत ‘नको त्या’ अवस्थेत सापडली. त्यामुळे आईने मुलीला व तिच्या प्रियकराला चांगला चोप दिला. या प्रकरणात मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. बातमी वाचा सविस्तर …

11:29 (IST) 29 Sep 2022
चंदनाच्या झाडांची कत्तल करणाऱ्याला पोलिसांकडून अटक

नागपूर : शासकीय निवासस्थानातून चंदनाच्या झाडांची कत्तल करून चंदन चोरी करणाऱ्याला सीताबर्डी पोलिसांनी पाठलाग करून मुसक्या आवळल्या. आसीफ पठाण (२४) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने आरोपीला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली. बातमी वाचा सविस्तर …

11:26 (IST) 29 Sep 2022
नागपूर : बेवडा म्हटल्यामुळे युवकाचा दगडाने ठेचून खून

नागपूर : रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाखाली बसून दारू पित बसलेल्या एका युवकाला वाटसरू युवकाने ‘बेवडा’ म्हटले आणि शिवी दिली. त्यामुळे चिडलेल्या युवकाने दगडाने ठेचून वाटसरू युवकाचा खून केला. बातमी वाचा सविस्तर …

10:48 (IST) 29 Sep 2022
निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत काय होणार? उज्ज्वल निकम म्हणाले…

सर्वोच्च न्यायालयामध्ये मंगळवारी दिवसभर झालेल्या सुनावणीनंतर खरी शिवसेना कोणाची’, या राज्यातील सत्तासंघर्षांमधील अत्यंत महत्त्वाच्या मुद्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने सुनावणी घ्यावी असा निर्णय घटनापीठाने दिला आहे. या निर्णयामुळे शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हासंदर्भातील निर्णय घेण्याचा आयोगाचा मार्ग मोकळा झाला. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय शिंदे गटासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. मात्र आता निवडणूक चिन्हासंदर्भात निवडणूक आयोग नेमका निकाल कसा घेणार यासंदर्भातील दावे-प्रतिदावे केले जात असतानाच ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी अशा वादामध्ये नेमका कशापद्धतीने निर्णय घेतला जातो यासंदर्भातील माहिती दिली.

सविस्तर वाचा –

10:48 (IST) 29 Sep 2022
शरद पवार पुन्हा सत्तेत येणार? सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, म्हणाल्या “महाराष्ट्राचा एक दौरा…”

शिवसेनेमध्ये झालेल्या अंतर्गत बंडखोरीमुळे अडीच वर्ष सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे राज्यातून गेलेली सत्ता पुन्हा आणण्यासाठी शरद पवार आता कोणती रणनीती अवलंबणार याची चर्चा आहे. यादरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी एक मोठं विधान केलं आहे. त्या इंदापूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलत होत्या.

सविस्तर बातमी

10:47 (IST) 29 Sep 2022
शशी थरुर यांनी मजरुह सुलतानपुरींचा शेर केला ट्वीट, लोक म्हणाले “त्यांना तर नेहरुंनी सरकारविरोधी लिखाण केल्याने…”

काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत असणारे खासदार शशी थरुर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी एक ट्विट केलं आहे. या ट्विवट्च्या माध्यमातून त्यांनी आपल्या उमेदवारीला पाठिंबा वाढत असल्याचा दावा अप्रत्यक्षरीत्या केला आहे. यासाठी त्यांनी प्रसिद्ध गीतकार व शायर मजरूह सुलतानपुरी यांच्या एका प्रसिद्ध शेरची मदत घेतली. मात्र त्यांनी हा शेर ट्वीट केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना इतिहासाची आठवण करुन दिली.

सविस्तर बातमी

10:47 (IST) 29 Sep 2022
शरद पवार पुन्हा सत्तेत येणार? सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

शिवसेनेमध्ये झालेल्या अंतर्गत बंडखोरीमुळे अडीच वर्ष सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे राज्यातून गेलेली सत्ता पुन्हा आणण्यासाठी शरद पवार आता कोणती रणनीती अवलंबणार याची चर्चा आहे. यादरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी एक मोठं विधान केलं आहे. त्या इंदापूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलत होत्या.

सविस्तर वाचा –

10:47 (IST) 29 Sep 2022
जम्मू काश्मीरमध्ये आठ तासांत आणखी एक रहस्यमय स्फोट, नेमकं काय चालू आहे?

जम्मू काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात आणखी एक रहस्यमय स्फोट झाला आहे. बस स्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये गुरुवारी सकाळी हा स्फोट झाला. गेल्या आठ तासातील अशा प्रकारचा हा दुसरा स्फोट आहे. सुदैवाने, या स्फोटात कोणीही जखमी झालेलं नाही. जम्मू काश्मीर पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

सविस्तर बातमी

10:46 (IST) 29 Sep 2022
‘…नंतर म्हणाल कंडोम द्या,’ सॅनिटरी पॅडची मागणी करणाऱ्या विद्यार्थिनींना महिला IAS अधिकाऱ्याचं अजब उत्तर

सॅनिटरी पॅड मोफत उपलब्ध करुन देण्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थिनींना बिहार महिला विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी अजब उत्तर दिलं आहे. ‘आज तुम्ही सॅनिटरी पॅड मागत आहात, उद्या कंडोम मागाल’, असं उत्तर त्यांनी दिल्याने सध्या चर्चा रंगली आहे.

सविस्तर बातमी

10:45 (IST) 29 Sep 2022
दिपक केसरकरांचं पक्षप्रमुख पदाबद्दल महत्त्वाचं विधान

मुंबई उच्च न्यायालयाने मागील आठवड्यामध्ये उद्धव ठाकरे गटाला दसरा मेळाव्यासाठी दादारमधील शिवाजी पार्कच्या वापराची परवानगी दिल्यानंतर आता वांद्रे-कुर्ला संकुल येथे शिंदे गटाचा मेळावा होणार आहे. पुढील आठवड्यात वांद्रे-कुर्ला संकुलात होणारा दसरा मेळावा अधिक भव्य करण्याचा निर्धार शिंदे गटाने केला असून याच निमित्त शिंदेंच्या निवासस्थानी शिंदे गटातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे गटाचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री दिपक केसरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख पदाबद्दल मोठं विधान केलं आहे.

सविस्तर वाचा –

सर्वोच्च न्यायालयातील पहिला निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाजूने लागल्याने शिवसेनेनं पहिल्यांदाच पक्ष म्हणून आपली बाजू मांडली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संपादक असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखामधून ‘सर्व प्रकारच्या लढाईस आम्ही सज्ज आहोत’ असं सांगत शिवसेनेनं निवडणूक आयोगासमोरील लढाईसाठीची तयारी दर्शवली आहे. इतकंच नाही तर शिंदे गट आणि भाजपावर सडकून टीका करताना, “आईला आई व बापाला बाप न मानणाऱ्यांची नवी अवलाद कमळाबाईने महाराष्ट्राच्या विरोधात उभी केली” असा टोलाही शिवसेनेनं लगावला आहे.

संबंधित बातम्या