Marathi News Update, 28 November 2023: महाराष्ट्रात एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना दुसरीकडे विधानसभा अध्यक्षांसमोर चालू असलेल्या आमदार अपात्रता सुनावणीची चर्चा पाहायला मिळत आहे. ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण न देण्यावर छगन भुजबळ आक्रमक झाले आहेत. तर, विधानसभा अध्यक्षच सरकारला संरक्षण देत असताना हे सरकार कसं पडेल? असा सवाल विरोधकांकडून केला जात आहे.
Mumbai Maharashtra Breaking News: आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरून राजकारण पेटलं!
पाहा उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले...
स्वतःच घर न सांभाळता दुसऱ्याच्या घरात डोकावणारे हे भुरटे राज्याला न्याय देऊ शकत नाहीत! - उद्धव ठाकरे
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोशल मीडियावर एक आवाहन करणारं पत्र पोस्ट केलं आहे.
सुनील प्रभूंची उलट तपासणी चालू होती. त्यानंतर आम्हालाही बोलवलं जाईल. त्यामुळे आजची सुनावणी ऐकून तयारी करण्यासाठी आम्ही आलो होतो. विरोधक त्यांची बाजू मांडतीलच. आमच्या वकिलांनी आमची बाजू मांडल्यानंतर अध्यक्ष त्यांचा निर्णय देतील - भरत गोगावले, शिंदे गट
सरकारमध्ये हिंमत असेल तर त्यांनी उद्धव ठाकरेंवर कारवाई करून दाखवावी - अंबादास दानवे, विधानपरिषद विरोधी पक्षनेते
कायदेशीर गोष्टीची पूर्तता करण्यासाठी समितीची आवश्यकता असेलच. ही कोणती राजकीय समिती नाही. ती न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली आहे. त्यामुळे त्या समितीला कायदेशीर आधार आहे. ती समिती बरखास्त करणं योग्य होणार नाही - अशोक चव्हाण
पुणे : जिल्ह्यातील बारामती तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या तालुक्यासह बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुक्यांत पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे या तालुक्यांत पाण्याची उपलब्धता होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालून दुष्काळी बैठक घेण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्स या समाजमाध्यमावरून केली आहे. ही मागणी करताना त्यांनी पालकमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टॅग केले आहे.
तब्बल २९ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली तर दोन मंडळात १०० मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला.
तेलंगणात मला परिवर्तनाची लाट दिसतेय. इथे भाजपाचं सरकार निवडून येईल. लोक बीआरएसच्या भ्रष्ट सरकारला कंटाळले आहेत. काँग्रेस देशात संपुष्टात येणारा पक्ष आहे हेही लोकांना माहिती आहे. शिवाय काँग्रेस नेहमीच तेलंगणाविरोधी राहिली आहे. त्यामुळे इथे भाजपा जिंकून येईल - देवेंद्र फडणवीस
इन्स्टाग्राम या समाज माध्यमावर व्हिडिओ तयार करून स्वतःला ‘डोंबिवलीचा किंग’ म्हणवून घेणाऱ्या सुरेंद्र पाटील याला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे.
नागपूर : इंडिगो विमानात पुण्याहून नागपूरला येणाऱ्या एका महिलेच्या आसनाला कुशन नसल्याने मनस्ताप सहन करावा लागला. या प्रवासी महिलेचे नाव सागरिका असल्याचे समजते. गेल्या रविवारी पुण्याहून नागपूरला येणाऱ्या इंडिगो विमानाने प्रवास करण्यासाठी तिकीट बूक केले होते.
जळगाव – अहमदाबादहून औरंगाबादकडे जाणाऱ्या खासगी प्रवासी बसला मंगळवारी चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे गावानजीक अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या खाली उतरून उलटली. अपघातात तीन प्रवासी जखमी झाले.
शेतकरी रडतोय. सरकारनं तिजोरीकडे बोट दाखवून हात वर करू नये. आम्ही २ तारखेपासून मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांची पाहणी करणार आहोत. त्याआधी सरकारनं पंचनामे करून मदतीची घोषणा करावी. अधिवेशनाची वाट पाहण्याची गरज नाही. सरकारला आमचा इशारा आहे, शेतकऱ्याला त्वरीत मदत घोषित करा - विजय वडेट्टीवार
एकीकडे अवकाळी पावसाची हवामान खात्यानं सूचना दिल्यानंतर सरकारने काय उपाय केले? अवकाळी पावसामुळे राज्यातल्या ६७६ हेक्टर जमिनीवरच्या पिकाचं नुकसान झालं आहे. अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. पण सरकार मात्र तेलंगणामध्ये प्रचारात व्यग्र आहे. आता तातडीनं पंचनामे करायचे असताना सरकार मदत कधी देणार? हा प्रश्न आहे. शेतकऱ्यांचा वाली कोण? केंद्राकडून अडीच हजार कोटींच्या मदतीचं खोटं आश्वासन शेतकऱ्यांना देऊन दिशाभूल करण्याचं काम चालू आहे. २०२२ चा निधी अद्याप मिळालेला नाही. देतो म्हणायचं आणि फसवणूक करायची हा सर्रास धंदा राज्य सरकारने सुरू केला आहे - विजय वडेट्टीवार
नागपूर : ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांच्या प्लएटआईम क्रिएशन या निर्मिती संस्थेतर्फे विविध चित्रपट, वेब सिरीज, मालिकांची निर्मिती केली जाते. हे करीत असताना संस्थेमार्फत सामाजिक दायित्व जपण्याचा सतत प्रयत्न केला जातो. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून संस्थेतर्फे निर्मित चित्रपट, मालिका किंवा मालिकेचे चित्रीकरण ज्या शहरात असते तिथे २०० झाडे लावली जातात.
वर्सोवा – विरार सागरी सेतू प्रकल्पामुळे वर्सोवा – विरार किनाऱ्यालगतचे कोळीवाडे आणि येथील मच्छिमार व्यवसाय कायमस्वरूपी बाधित होणार आहेत.
अतुल मुंढे हे करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकपदावर सेवेत होते.
पुणे : मुलीला अनिवासी भारतीय विद्यार्थी (एनआयए) कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून लष्करातील निवृत्त जवानची २७ लाख २६ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत निवृत्त जवानाने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जयेश शिंदे, पवन सूर्यवंशी (दोघे रा. चिखली), माजी नगरसेवक राहुल तुपेरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी : किरकोळ वादातून टोळक्याने गहुंजेत धुडगूस घातला. कोयत्याने घराच्या खिडकीची काच फोडून नुकसान करत आरडा-ओरड केली. ही घटना सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.
नागपूर: प्रदूषणकारी वातावरण दूर करण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू असून आता ‘सर्क्युलर इकानॉमी पार्क’ तयार करण्याची योजना आहे.
महाराष्ट्राने दिलेल्या सुविधा, इथली सुरक्षितता, इथल्या मराठी लोकांची मानसिकता ह्यामुळेच तुमचा व्यापार-व्यवसाय बहरतोय... मग इथल्या भाषेचा, कायद्याचा, स्थानिकांचा अवमान करण्याची मुजोरी येते कुठून? - मनसे
बुलढाणा: रविवारी रात्रभर झालेल्या अवकाळी पावसामुळे ३३ हजार ९५१ हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
बोरीवलीमधील ६५ वर्षीय व्यक्तीवर उपचार करण्याच्या नावाखाली बनावट डॉक्टरांच्या टोळीने ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
अग्निवीर प्रशिक्षण घेणाऱ्या २० वर्षीय तरूणीने आत्महत्या केल्याची गंभीर घटना मालाड येथे घडली.
नागपूर: रविवार आणि सोमवार विदर्भातील इतर शहरात गारपीटीसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. मंगळवारी सकाळपासून मात्र नागपूर शहरात मुसळधार पावसाने ठाण मांडले.
वर्धा: रात्रीपासून पावसाची सततधार शेतकऱ्यांची दैना करणारी ठरत आहे. पांढरे सोने म्हटल्या जाणाऱ्या कापसाचे आगार म्हणून जिल्ह्याची ओळख आहे. पण पावसाने ही ओळख मिटविण्याचा चंगच बांधल्याचे चित्र आहे.
अमरावती: तिवसा येथे राहणाऱ्या एका ५५ वर्षीय सराफा व्यावसायिकाच्या घरात शिरून हत्या करण्यात आली. त्यानंतर मारेकऱ्यांनी त्याच्या घरातील सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना सोमवारी रात्री उघड झाली.
यवतमाळ: जिल्ह्यात सध्या चोरी, घरफोडींना उच्छाद मांडला आहे. ‘दिवसा रेकी आणि रात्री चोरी’ अशी पद्धत चोरटे वापरत असल्याने बहुतांश चोरींचा शोध घेण्यात पोलिसही अपयशी ठरत आहे.
धर्मवीर -२ चित्रपटाच्या मुहूर्तासाठी आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जुन्या आनंद आश्रमाचे नेपथ्य पाहून भारावून गेले.
संपूर्ण राज्य दुष्काळाच्या भयाण संकटात सापडले असून देखील राज्य सरकार अद्यापही गंभीर दिसत नाही. आधी दुष्काळ जाहीर करताना केवळ चाळीस तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले, आम्ही सर्वांनी पाठपुरावा केला तेव्हा बाकी तालुके समाविष्ट केले खरे... पण नंतरच्या तालुक्यांना किती मदत मिळेल? याबाबत शासनाने काहीही स्पष्टता दिलेली नाही. आता तर त्याहून पुढे जात शासनाने कहरच केला, दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या मदतीसाठी केंद्राकडे जे प्रस्ताव पाठवले जातात, ते प्रस्ताव केवळ चाळीस तालूक्यांचेच पाठवले आहेत. याचाच अर्थ उर्वरित तालुक्यांना एक रुपयाची देखील मदत मिळणार नाही. राज्य सरकारने शेतकऱ्यांना अशाप्रकारे वाऱ्यावर सोडणे योग्य नाही. त्यामुळे राज्य सरकारने केंद्र सरकारकडे संपूर्ण राज्याच्या मदतीसाठी प्रस्ताव पाठवावा व राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मदत करावी. ही विनंती. - रोहित पवार
Mumbai Maharashtra Breaking News: राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला