Maharashtra Breaking News Live Updates : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच राज ठाकरे यांनी रविवारी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. या भेटीत आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात राजकीय चर्चा झाल्याचं सांगितलं आहे.
या बरोबरच देवेंद्र फडणवीस यांनी साखर कारखान्यांना मोठा इशारा दिला आहे.‘शेतकऱ्यांचा काटा मारणारे कारखाने मी शोधलेत, आता त्या कारखान्यांना मी दाखवतो’, अशा शब्दांत फडणवीस यांनी इशारा दिला आहे. तसेच देशाचे गृहमंत्री अमित शाह हे रविवारी अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी अमित शाह यांनी शेतकऱ्यांना केंद्र सरकार मदत करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. दरम्यान,राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Marathi News Live Update : राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Manoj Jarange : ‘जरांगेंच्या हाती बंदूक द्या अन् ओबीसींचा खात्मा करा’, वडेट्टीवारांच्या विधानावर जरांगे म्हणाले, “ओबीसींच्या नेत्यांनी…”
स्वस्तात वाहन घ्यायचंय?.....'या' दिवशी लिलावात व्हा सहभागी
'२० लाखांची गादी–सोफा वापरणारे सरकार आनंदाचा शिध्यासाठी निधी देत नसेल तर...', रोहित पवारांची टीका
"निवडणुका सरो..मतदार मरो' या तत्वाने काम करणाऱ्या देवा भाऊ सरकारने आता आनंदाचा शिधा योजनेवर देखील गदा आणली आहे. योजनेला निधी उपलब्ध न करून अप्रत्यक्षपणे योजनाच बंद करण्याचा नवा फॉर्म्युला या सरकारने आणला असून आनंदाचा शिधा योजनेबाबत देखील तेच होताना दिसत आहे. गणपती नंतर दिवाळीत देखील आनंदाचा शिधा मिळणार नसल्याचं समोर येत आहे. निधी नाही म्हणून की शिंदे साहेबांनी आणलेली योजना म्हणून ही योजना बंद केली जातेय हा संशोधनाचा विषय असला तरी २० लाखांची गादी–सोफा वापरणारे अलिशान सरकार आनंदाचा शिधा योजनेसाठी निधी देऊ शकत नसेल तर मग या सरकारला काय म्हणावे?", अशी टीका रोहित पवारांनी केली आहे.
https://platform.twitter.com/widgets.js'निवडणुका सरो..मतदार मरो' या तत्वाने काम करणाऱ्या देवा भाऊ सरकारने आता आनंदाचा शिधा योजनेवर देखील गदा आणली आहे. योजनेला निधी उपलब्ध न करून अप्रत्यक्षपणे योजनाच बंद करण्याचा नवा फॉर्म्युला या सरकारने आणला असून आनंदाचा शिधा योजनेबत देखील तेच होताना दिसत आहे... गणपती नंतर दिवाळीत…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 6, 2025
एनइटीएफकडून प्राध्यापकांसाठी लवकरच नवीन पोर्टल... एआय तंत्रज्ञानामुळे शिक्षणात आव्हाने!
परभणीत पावसाचा हाहाकार; अनेक वस्त्या-घरांत पाणी शिरले !
देशभरातील पोलीस कोठडीतून ७८८ आरोपी पळाले, ‘एनसीआरबी’चा अहवाल; महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी
मुख्यमंत्र्यांची मोठी घेषणा: एमपीएससीची भरती प्रक्रिया गतिमान करण्यासाठी नवीन समिती; परीक्षा, निकालाला…
Pune Crime News: पुण्यात पोलिसच असुरक्षित; विधी महाविद्यालय रस्त्यावर पोलीस कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार
PUNE METRO : पुणे मेट्रोत हजारो लाइटर, किलोंनी तंबाखू, गुटखा जप्त... महामेट्रोपुढे आव्हान!
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रभू रामचंद्रांनी सद्बुद्धी द्यावी, माणसाला माणूस म्हणून जगू द्यावे”, शेतकरी नेत्याची भावनिक साद
निवडणुका कशा जिंकायच्या ते माहीत... एकनाथ शिंदे यांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
कुंभमेळ्याची हजारो कोटींची कामे गुजरातच्या ठेकेदारांना दिल्याचा आरोप… आता कुंभमेळा प्राधिकरणाचे आदेश
गोल्ड ट्रेडिंगच्या नावाखाली महिलेची ११ लाख ६० हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक; रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
"कोणी काही म्हणत असलं तरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संवाद हा अतिशय घट्ट आहे. कोणीही कितीही देव पाण्यात बुडऊन ठेवले असले तरी बात बहोत दूर तक चली गई है, माघारीचे दोर आता नाहीत. त्यामुळे कोण्ही काय म्हटलं, हे कसे एकत्र येतात हे पाहू वैगेरे. पण आता तुमच्या छातीवर पाय ठेऊन ठाकरे बंधू उभे राहण्याच्या मनस्थित आहेत", असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
तुमच्या शहरांत पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या आजचे दर
पेट्रोल आणि डिझेल हा सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक सर्वसामान्य तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरुन महागाई वाढली आहे की नाही याचे अंदाज लावत असतात. आज ०६ ऑक्टोबर २०२५ रोजी पेट्रोल व डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत. इंधनाचे दर सकाळी सहा वाजता जाहीर केले जातात आणि मग ते सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. तर आज तुमच्या शहरांत इंधनाची किंमत काय, हे तुम्ही खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घेऊ शकता.
तुमच्या शहरांत पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या आजचे दर, (फोटो-संग्रहित छायाचित्र)