Maharashtra News Highlights: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीनंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियरबाबत एक शासन निर्णय जारी केला आहे. याला राज्यातील काही ओबीसी संघटनांनी विरोध केला आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने देखील साखळी उपोषण सुरू केलं आहे. दरम्यान, ओबीसी विकास मंत्री अतुल सावे हे या आंदोलकांची आज भेट घेणार आहे. सावे यांच्यासमोर उपोषण सोडवण्याचं आवाहन आहे. तर, “मराठा समाजाला आमच्या ताटातून काहीही मिळालेलं नाही, आमचं ताट पूर्णपणे सुरक्षित आहे”, असं वक्तव्य ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केलं आहे.
दरम्यान, उद्या (५ सप्टेंबर) बारामतीत लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली ओबीसींचा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. ‘ओबीसी आरक्षण बचाव’ ही मागणी घेऊन मोर्चा काढणार असल्याची माहिती स्वतः हाके यांनी दिली आहे. तर, “शासन निर्णयातील काही शब्दांवरून संभ्रम निर्माण झाला असून आम्ही कागदपत्रांची जुळवाजुळव करत आहोत. सोमवार किंवा मंगळवापर्यंत आम्ही न्यायालयात जाऊ”, असं छगन भुजबळ यांनी जाहीर केलं आहे. याचबरोबर त्यांनी ओबीसींना आंदोलन न करण्याचं आवाहन केलं आहे.
दुसऱ्या बाजूला, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र ओबीसी आरक्षण उपसमिती गठित करण्यात आली आहे. छगन भुजबळ, अतुल सावे, पंकजा मुंडे, गुलाबराव पाटील, संजय राठोड व दत्ता भरणे हे या उपसमितीचे सदस्य असतील.
Maharashtra Latest News Today: राज्य व देशातील सर्व महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक घडामोडी वाचा एकाच क्लिकवर.
"हा सरसकट आरक्षणाचा GR नाही", देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “छगन भुजबळ हे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून कुठेही गेले नाहीत. त्यांची व माझी चर्चा झाली आहे. मी त्यांना आश्वस्त केलं आहे की आपल्या सरकारने जी अधिसूचना (जीआर) काढली आहे त्याने ओबीसी समाजावर कुठलाही परिणाम होणार नाही. कारण हा सरसकट जीआर नाही. हा केवळ पुराव्याचा जीआर आहे.”
"शिंदे हे फडणवीसांच्या गृह विभागाचे राजकीयदृष्ट्या कपडे काढतायत", 'त्या' पत्रावरून रोहित पवारांचा चिमटा
शासनाच्या निर्णयाची ‘होळी’ चंद्रपुरात ओबीसी आक्रमक; नियमांचे उल्लंघन…
वाशी एपीएमसीत पहिल्यांदाच न्यूझीलंडचे ‘रूज’ सफरचंद दाखल
अकरावी प्रवेशाचा गोंधळ कायम! अमरावती विभागात ६३ हजारांहून अधिक जागा…
कामठीत मतचोरी ; कॉंग्रेसचा आरोप भाजपने फेटाळला, जिल्हा उपाध्यक्षांचा नवा दावा …
मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत शिंदे-फडणवीसांमध्ये मतभेद? दोघांची वेगवेगळी मतं
मुंबईतील मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनप्रकरणी नऊ गुन्हे दाखल झाले आहेत. मुंबईतील झोन एकच्या हद्दीतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये मराठा आंदोलकांविरोधात नऊ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे मागे घेतले जावेत अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्ही आंदोलन काळातील सर्व राजकीय गुन्हे मागे घेणार आहोत.”
दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत म्हणाले की "आत्ता मराठा आंदोलनादरम्यान जे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ते उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दाखल केले आहेत. त्यामुळे त्याच्यावर जो काही निर्णय घ्यायचा असेल तो उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणल्यानंतरच घ्यावा लागेल."
महाराष्ट्राच्या राजकारणामुळे ‘त्यांना’ मोठी संधी… ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी कोणाला दिला सल्ला?
"…केवळ त्यांनाच लाभ मिळेल", फडणवीसांकडून सरकारच्या GR चं विश्लेषण; मराठा आरक्षणाबाबत म्हणाले…
उत्तरमांड भरून वाहिले पण, प्रकल्पग्रस्तांची शिवारं कोरडीच
लवकरच वाढवण बंदर ते तवा प्रवास ३० मिनिटात; वरोर, वाढवण ते तवा द्रुतगती महामार्गासाठी अखेर निविदा प्रसिद्ध
एकाच दिवशी तीन सोनसाखळ्या चोरी… १० लाखांचा ऐवज हिसकावून चोरटे फरार
"आरक्षण हे मुख्य उद्दीष्ट नव्हतं, त्यांना केवळ…", संजय राऊतांकडून मोठा संशय व्यक्त
सावरकर सदनला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याचे प्रकरण; नव्याने शिफारशीचा प्रस्ताव पाठविण्यासाठी महापालिकेला मुदतवाढ
"एका जीआरने मराठ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत", एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, "कायदेशीर अडचणी…"
पनवेलमध्ये खूनातील आरोपीकडून पोलिसांवर कु-हाडीने हल्ला; दोन पोलीस जखमी
मराठा आरक्षणाचे कारण देत वैभव खेडेकर यांचा भाजप पक्ष प्रवेश पुढे ढकला, रत्नागिरी जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण
एका दिवसात ३९४ प्रवाशांची धरपकड, २.९१ लाख रुपये दंड वसूल
मराठा आंदोलन व सरकारच्या निर्णयप्रक्रियेपासून दूर का राहिलात? एकनाथ शिंदे म्हणाले...
एकनाथ शिंदे म्हणाले, "मी त्या सगळ्या आंदोलनात सहभागी कसा होऊ शकतो? परतुं, सरकारने ही जीआर काढला आहे त्यात मुख्यमंत्री, मी स्वतः, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमची उपसमिती, कायदेशीर पथक असे सगळेजण यात सहभागी होती. सर्वांनी बसून, चर्चा करून निर्णय घेतले आणि जीआर काढला. असे निर्णय रस्त्यावर जाऊन आंदोलनात सहभागी होऊन घेता येत नाहीत."
.SOLAR BLAST : दोन कामगारांनी पाय गमावले, स्पोटाचा आवाज १० कि.मी.पर्यंत
.SOLAR BLAST : दोन कामगारांनी पाय गमावले, स्पोटाचा आवाज १० कि.मी.पर्यंत
“जरांगेनी माघार घेऊ नये असं मंत्रिमंडळातील काहींना वाटत होतं”, राऊतांचा रोख नेमका कोणाकडे?
संजय राऊत म्हणाले, "मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन चालू असताना राज्यात जाती-जातीत संघर्ष व्हावा, अशी काही घटकांची इच्छा होती. मुळात मनोज जरांगे यांनी माघार घेऊच नये असंही काहींना वाटत होतं. जरांगे यांच्या आंदोलनाद्वारे देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अडचणीत यावं असं सरकारमधील काही लोकांना वाटत होतं.याआधी मनोज जरांगे यांच्याबरोबर नवी मुंबईतील वाशी येथे गुलाल उधळणारे (एकनाथ शिंदे) सरकारच्या बैठकीला उपस्थित नव्हते. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकारच्या अंतिम बैठकांमध्ये ते नव्हते. मुळात ते असायला हवे होते. जाणीवपूर्वक त्यांना बाजूला ठेवण्यात आलं, हे सगळं संशयास्पद आहे."
मुंबईतील 'अशा' निदर्शनांना प्रतिबंधित करण्यासाठी पावलं उचला : मिलिंद देवरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
"मुंबईतील मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मुंबई जवळपास ठप्प झाली होती" असं म्हणत, अशा प्रकारच्या निदर्शनांना प्रतिबंधित करण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलावी अशी मागणी शिवसेनेचे (शिंदे) नेते मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे.