Maharashtra Live News Updates, 23 October 2025: राज्यात येत्या काही आठवड्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने काँग्रेसचे काही नेते ठाकरेंशिवाय निवडणुकीत उतरण्याची भाषा करू लागले आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही ठिकाणी महायुती स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले आहे. यासह राज्यातील विविध क्षेत्रांतील घडामोडींचा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आढावा घेऊया.

Live Updates

Maharashtra Marathi News Live Updates 23 Oct 2025

14:31 (IST) 23 Oct 2025

पुणे शहराच्या राजकीय संस्कृतीची,एक माणुस वाट लावत आहे : रविंद्र धंगेकर यांना मुरलीधर मोहोळ यांचा टोला

वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका केली जात आहे.हे लक्षात घेता,राजकीय नैराश्यामधून टीका केली जात आहे.त्यामुळे वैफल्यग्रस्त माणसाकडून दुसरी काय अपेक्षा ठेवणार,अशा शब्दात रविंद्र धंगेकर यांना मुरलीधर मोहोळ यांचा टोला ...अधिक वाचा
14:02 (IST) 23 Oct 2025

भटक्या श्वानांच्या विषयावरून डोंबिवलीत केबल व्यावसायिकाला दोघांची मारहाण

बालाजी गार्डन गृहसंकुलात भटक्या श्वानांच्या विषयावरून परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. ...सविस्तर वाचा
13:56 (IST) 23 Oct 2025

उबाठाचे माजी आमदार सुभाष भोईर भाजपच्या वाटेवर ? मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

शिवसेनेतील फुटीनंतरही अनेक आजी-माजी आमदार, नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची साथ दिली होती. मात्र, माजी आमदार भोईर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ दिली. ...वाचा सविस्तर
13:37 (IST) 23 Oct 2025

१६ वर्षीय मुलाचा कर्करोगाशी लढा; १२ वर्षीय चिमुकल्या भावाने 'स्टेम सेल्स' दानातून दिले जीवदान; दिवाळीत भाऊबीजेच्या पर्वावर…

अकोल्यातील एका लहान भावाने आपल्या मोठ्या भावाचा जीव वाचवण्याचे प्रेरणादायी कार्य केले. जीवन (नाव बदलले आहे) हा १६ वर्षीय मुलगा आपल्या आई-वडिलांसह आणि १२ वर्षीय लहान भावासोबत अकोला येथे राहतो. ...सविस्तर वाचा
13:18 (IST) 23 Oct 2025

विश्लेषण : मुंबईतील पूर्व उपनगरांसाठी लवकरच पहिली मेट्रो… काय आहेत मेट्रो २ ब ची वैशिष्ट्ये?

डायमंड गार्डन - मंडाले असा मेट्रो प्रवास करण्याचे मुंबईकरांचे स्वप्न येत्या काही दिवसांतच पूर्ण होणार आहे. मंडाले, मानखुर्द, बीएसएनएल, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि डायमंड गार्डन यादरम्यान मेट्रो प्रवास करता येणार आहे. ...सविस्तर वाचा
13:05 (IST) 23 Oct 2025

कम्मालच झाली…डोंबिवलीत महसूल मंत्र्यांच्या सहीने विवादित जमिनीचा बनावट आदेश काढला; अज्ञाता विरूध्द गुन्हा दाखल

डोंबिवली पश्चिमेतील महसुली हद्द मौज आयरे कोपर रस्त्यावरील शास्त्रीनगर रुग्णालयाजवळील सर्वे क्र. ३४-५, ३९-११, ४०-१ई, ८६-२ या जमिनीचा हा वाद आहे. ...सविस्तर बातमी
12:57 (IST) 23 Oct 2025

बदलत्या वातावरणासह प्रदुषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम; सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ

दिवसा कडक ऊन तर संध्याकाळी पडणारा पाऊस या बदलत्या हवामानामुळे वातावरणात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यातच दिवाळीत फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांमुळे प्रदूषणाचे प्रमाण अधिक वाढले असून, या सर्वांचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर स्पष्टपणे जाणवू लागला आहे. ...सविस्तर वाचा
12:18 (IST) 23 Oct 2025

जोगेश्वरीतील बेहरामबागमधील व्यावसायिक इमारतीला भीषण आग

मुंबईतील जोगेश्वरी पश्चिम भागातील जेएमएस बिझनेस सेंटरमध्ये भीषण आग लागली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, इमारतीच्या वरच्या मजल्यावर काही लोक अडकलेल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

https://www.youtube.com/shorts/KuOAVszvPXo

12:18 (IST) 23 Oct 2025

विविध बँकांमध्ये ४५२ कोटी ३९ लाख रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी!

भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाच्या निर्देशानुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि इतर वित्तीय संस्थांच्या सहकार्याने “तुमची संपत्ती तुमचाअधिकार” या नावाने मोहीम राबविण्यात येत आहे. ...अधिक वाचा
12:09 (IST) 23 Oct 2025

ठाण्यात आगीचे सत्र सुरूच… दिवाळी पाडव्याच्या दिवशी सहा ठिकाणी लागली आग

दिवाळीच्या काळात शहरात आग लग्नाचे सत्र सुरूच असून बुधवारी, दिवाळी पाडव्याच्या दिवशी ठाणे शहरात आठ ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. ...सविस्तर बातमी
11:47 (IST) 23 Oct 2025

कचऱ्यात गेलेला सोन्याचा हार अखेर परत! कल्याणच्या कचरा संकलन केंद्रावरील कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा

दिवाळीनिमित्त परिधान करण्यासाठी तिजोरीतून बाहेर काढलेला सोन्याचा सुमारे पाच ते सहा लाख रूपये किमतीचा कल्याण पूर्वेतील एका महिलेचा हार बुधवारी दारात कचरा गोळा करण्यासाठी आलेल्या स्वच्छता कामगाराच्या कचऱ्याच्या डब्यात महिलेच्या नजरचुकीने गेला. ...अधिक वाचा
11:39 (IST) 23 Oct 2025

'समृद्धी'वर उत्तर प्रदेशचा अट्टल गुन्हेगार जेरबंद; देशी कट्ट्यासह चार जीवंत काडतुस जप्त

सदर आरोपीची अधिक चौकशी व त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची पडताळणी करण्यात आली असता नमूद आरोपीविरुद्ध उत्तर प्रदेश राज्यात दरोडा, जबरी चोरी, फसवणूक, लूटपाट, गैंग कायदा कलम, तसेच शस्त्र कायदा विस्फोटक पदार्थ बाळगण्याचे ७ गुन्हे दाखल असल्याचे आढळून आले. ...अधिक वाचा
11:23 (IST) 23 Oct 2025

सावधान! चिचडोह बॅरेजचे ३८ दरवाजे बंद करणार, गडचिरोली-चंद्रपुर जिल्ह्यात वैनगंगा नदीकाठच्या नागरिकांनी…

वैनगंगा नदीवर चामोर्शी तालुका मुख्यालयापासून उत्तरेस ५ किमी अंतरावर चिचडोह धरणचे बांधकाम जून २०१८ मध्ये पूर्ण झालेले आहे. धरणाची एकूण लांबी ६९१ मीटर असून १५ मीटर लांबीचे व ९ मीटर उंचीचे ३८ लोखंडी उभे उचल दरवाजे बसविण्यात आलेले आहेत. ...वाचा सविस्तर
11:22 (IST) 23 Oct 2025

"नेत्यांवर निष्ठा ठेवणे बंद करा," बच्चू कडू असे का म्हणाले?

बच्चू कडू यांनी नेत्यांवर निष्ठा ठेवणे बंद करून आपल्या आई-वडिलांवर आणि मायभूमीवर निष्ठा ठेवावी, असे आवाहन करत सरकारवर शेतकऱ्यांच्या वेदनांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. ...सविस्तर वाचा
11:22 (IST) 23 Oct 2025

नागपूर जिल्ह्यात एकाच घरातील ४९ मतदार असे आले समोर

डिगडोह जागृती मंचाने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, प्रभाग क्रमांक १२ मधील प्लॉट क्रमांक १५ए या एकाच पत्त्यावर अनेक मतदारांची नावे नोंदवली गेली आहेत. ...अधिक वाचा
11:21 (IST) 23 Oct 2025

"बळीचं राज्य म्हणजे संविधानाचं राज्य, मात्र आजचे सत्ताधारी…" जितेंद्र आव्हाड नेमके काय म्हणाले? वाचा…

किसान अधिकार अभियानतर्फे आयोजित १७ वा “बळी महोत्सव ” महात्मा लॉन, नालवाडी येथे उत्साहात पार पडला. ...वाचा सविस्तर
11:03 (IST) 23 Oct 2025

MMR Development: सविस्तर…. मुंबईच्या निवडणुकीत तिसऱ्या, चौथीचीच चर्चा

MMR Development : गेल्या काही वर्षांत राज्यातील महायुती सरकारने आपला मोर्चा तिसऱ्या, चौथ्या मुंबईच्या विकासाकडे वळवला आहे. ते पाहता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीचा त्यातही भाजपच्या प्रचाराची दिशा काय राहील हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. ...सविस्तर बातमी
11:02 (IST) 23 Oct 2025

भाजपने शिंदे गटाच्या गळ्याभोवती फास आवळला… पाचोऱ्यात मोठ्या घडामोडींना वेग !

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागल्यापासून भाजपसह शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील बेबनाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ...सविस्तर वाचा
11:02 (IST) 23 Oct 2025

नवी मुंबई महापालिकेची दिवाळी सणात रात्री ११ पासून पहाटे ३ वा पर्यंत विशेष स्वच्छता !

लक्ष्मीपूजनाच्या सणानंतर त्या रात्री म्हणजेच २१ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजल्यापासून बेलापूर ते दिघा अशा आठही विभाग कार्यालय क्षेत्रात स्वच्छतेची विशेष मोहीम २२ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ वाजेपर्यंत राबविण्यात आली. ...सविस्तर बातमी
10:59 (IST) 23 Oct 2025

Maharashtra News Live Update: “आम्हाला मुंबई अदाणींच्या घशात घालण्यापासून वाचवायची आहे”, महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची प्रतिक्रिया

गेल्या काही दिवसांत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात जवळीक पाहायला मिळत आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते मुंबई महानगरपालिका निवडणुकीत एकत्र लढवतील अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतील काँग्रेसमधील काही नेत्यांनी काँग्रेसने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासह निवडणूक याप्रकारे लढवावी अशी भावना व्यक्त केली आहे. यावर शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी भाजपाला पराभूत करून राहुल गांधींना पंतप्रधान करायचे आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले, "काँग्रेस हा इंडिया आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्ष आहे. या दोन्ही आघाड्या या एकाच पक्षामुळे निर्माण झाल्या नाहीत. यामध्ये काँग्रेसबरोबर अनेक पक्ष आहेत. आता मुंबई महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणी वेगळी भूमिका घेतली असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही आमच्या मित्रपक्षांना अडचणीत येणारी भूमिका घेणार नाही. आम्हाला भाजपाचा पराभव करायचा आहे. आम्हाला मुंबई अदाणींच्या घशात घालण्यापासून वाचवायचीआहे."