Maharashtra News Updates, 26 August 2025 : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील येत्या २९ ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलन करणार आहेत. त्यासाठी ते उद्या (२७ ऑगस्ट) जालन्यातील आंतरवाली-सराटी येथून निघणार आहेत. त्यांनी सरकारला आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी दोन दिवसांचा वेळ दिला असून. यावेळी आरक्षण दिलं नाही तर सरकार उलथवून टाकू, असा इशारा देखील जरांगे यांनी दिला आहे. दरम्यान, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “लोकशाही मार्गाने मुंबईत आंदोलन करा. परंतु, गणेशोत्सवात विघ्न आणू नका. छत्रपती शिवाजी महाराज सण-उत्सात खोडा घालणाऱ्यांचा निःपात करायचे.” या वक्तव्यासह फडणवीसांनी जरांगे यांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. यासंबंधीच्या बातम्यांचा आढावा आपण या लाइव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.

गेवराई येथील राड्याप्रकरणी लक्ष्मण हाके यांच्यासह १४ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हाके हे नंबर एकचे आरोपी असून पोलिसांनी सुमोटोनुसार ही कारवाई केली आहे. दुसऱ्या बाजूला भंडाऱ्यातही मोठी उलथापालथ चालू आहे. गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयार हे आता भंडारा जिल्ह्याचे नवे पालकमंत्री असतील. तर संजय सावकारे यांना या पदावरून हटवण्यात आलं आहे. भोयार यांच्याकडे वर्ध्यासह भंडाऱ्याची देखील अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. तर, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्री म्हणून वर्णी लागली आहे. भंडाऱ्यासह राज्यात घडणाऱ्या इतर राजकीय घडामोडींवर आपलं लक्ष असेल.

‘वनतारा’ची एसआयटी चौकशी होणार

कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सर्वत्र उत्सवाची तयारी चालू आहे. यावरही आपलं लक्ष असेल. दुसऱ्या बाजूला रिलायन्स फाऊंडेशनतर्फे गुजरातच्या जामनगरमध्ये चालवल्या जाणाऱ्या ‘वनतारा’ प्रकल्पाची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याचे आदेश सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले. वन्यजीव संरक्षण कायदा आणि देशविदेशातून वन्यप्राणी ताब्यात घेण्याच्या प्रकल्पाच्या विद्यमान प्रक्रियेबाबत चौकशी केली जाणार आहे. यासह देशभरात घडणाऱ्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत.

Live Updates

Mumbai Breaking News Live Update : राज्यासह देशभरातील राजकीय व सामाजिक घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर. 

12:30 (IST) 27 Aug 2025

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जाणार की नाही? गृहविभागाचा महत्त्वाचा निर्णय

अंतरवाली सराटीत झालेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी तणाव निर्माण झाला होता. यावेळी पोलिसांनी २०० हून अधिक मराठा आंदोलकांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केले होते. मनोज जरांगे पाटील यांनी हे गुन्हे मागे घेण्याची विनंती केली होती. यावर मंगळवारी मराठा उपसमितीच्या बैठकीत चर्चा झाली. परंतु, हे गुन्हे अत्यंत गंभीर असल्याने मागे घेण्यात अडचणी येत असल्याचं गृह विभागानं आपल्या अहवालात म्हटलं आहे. यावर काय मार्ग काढता येतो यावर उपसमिती विचार करत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

20:24 (IST) 26 Aug 2025

ठाण्यात गणेशोत्सवात दिवसा अवजड वाहनांना बंदी; पोलीस आयुक्तांची अंमलबजावणीची अधिसूचना

गणेशोत्सवात अवजड वाहने केवळ रात्री आणि पहाटे प्रवेश करु शकतात. तसेच विसर्जनाच्या दिवशी म्हणजेच, २८ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट, २ सप्टेंबर, ६ सप्टेंबर या दिवशी विसर्जन मिरवणूका संपेपर्यंत अवजड वाहनांना बंदी लागू असेल. ...सविस्तर वाचा
19:36 (IST) 26 Aug 2025

‘‘गडचिरोलीतील दारूबंदी फसवी, समीक्षा व्हावी,” खुल्या चर्चासत्रातील सूर

गडचिरोली जिल्हा निर्मितीच्या ४३ व्या वर्धापनदिनानिमित्त आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या ‘कर्तव्यकक्ष’ कार्यालयात दुपारी १२ ते २ या वेळेत चर्चासत्र पार पडले. ...अधिक वाचा
18:55 (IST) 26 Aug 2025

Manoj Jarange Protest: मनोज जरांगेंना नवी मुंबईतच रोखणार ?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महासंचालक डॉ. रश्मी शुक्ला यांच्याशी राज्यातील कायदा व सुव्यवस्था आणि जरांगे यांच्या आंदोलनासंदर्भात मंगळवारी दुपारी चर्चा केली. ...अधिक वाचा
18:37 (IST) 26 Aug 2025

गुंतवणूकीवर जादा परताव्याचे अमीष दाखविणाऱ्या सराफाला ७ वर्ष सश्रम कारावास

फेब्रुवारी २०१८ ते एप्रिल २०१९ या कालावधीत संतोष शेलार याने तक्रारदार आणि त्यांच्या मुलाला सोन्याच्या योजनेत १५ महिने गुंतवणूक केल्यास चांगला परतावा किंवा सोन्याचे दागिने देण्याचे अमीष दाखविले होते. ...वाचा सविस्तर
18:02 (IST) 26 Aug 2025

देशात सर्वसमावेशक राजकीय नेतृत्वाची वानवा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी मंगळवारी वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी ही टीका केली. ...सविस्तर वाचा
17:40 (IST) 26 Aug 2025

पिंपरीत प्रारूप प्रभाग रचनेवर अवघ्या दोन हरकती; मतदान केंद्र निश्चितीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती

हरकती व सूचना चार सप्टेंबरपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. मतदान केंद्राच्या निश्चितीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...वाचा सविस्तर
16:59 (IST) 26 Aug 2025

गणेश आगमन आणि विसर्जनाच्या दिवशी शहरात अवजड वाहनांना बंदी घालावी ! जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे यंत्रणेला आदेश

गणेशोत्सव दरम्यान ठिकठिकाणी मंडप, मिरवणुका, आरास तसेच भक्तांची प्रचंड गर्दी होत असते. शहरातील रस्त्यांवर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढते, विसर्जनाच्या मिरवणुका चालतात. ...वाचा सविस्तर
16:58 (IST) 26 Aug 2025

नागपुरात अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्यतेमुळेच अपघात… ॲड. अक्षय समर्थ, डॉ. चंद्रशेखर मोहिते कारण सांगतांना म्हणाले…

उपराजधानीचा विकास वेगाने होत आहे. परंतु येथील अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे अपघातांची संख्या वाढली आहे. अशा शब्दात ॲड. अक्षय समर्थ आणि डॉ. चंद्रशेखर मोहिते यांनी शहरातील वाहतुकीच्या सद्यस्थितीवर भाष्य केले. ...वाचा सविस्तर
16:45 (IST) 26 Aug 2025

अमरावती पोलिसांमार्फत यवतमाळतील वाहनधारकांना नोटीस, काय आहे प्रकरण?

अमरावती वाहतूक पोलिसांनी यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो वाहनधारकांची वाहने 'ओव्हर स्पीड' असल्याने त्यांचे वाहन चलान केले. या संदर्भात अमरावती पोलिसांनी लोक अदालतमध्ये उपस्थित राहण्याची नोटीस या वाहनधारकांना पाठवल्याने खळबळ उडाली आहे ...सविस्तर बातमी
16:35 (IST) 26 Aug 2025

" पैसे द्या, पैसे द्या… देवा भाऊ पैसे द्या.." कंत्राटदारांनी मागितली भीक … नागपुरात…

नागपुरातील संविधान चौकात मंगळवारी देयक मिळण्यासाठी 'भीक मांगो ' आंदोलन करण्यात आले. आदोलनात कंत्राटदारांनी काळ्या रंगाच्या टी शर्ट घालून नागरिकांना भीक मागितली. ...अधिक वाचा
16:24 (IST) 26 Aug 2025

मनोज जरांगे मुंबईत धडकण्याआधीच सरकारकडून एक मागणी मान्य; मराठा आरक्षण उपसमितीचा मोठा निर्णय

मराठा आरक्षणासाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीने मंगळवारी (२६ ऑगस्ट) मोठा निर्णय घेतला आहे. उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांच्यी एक मागणी मान्य करण्यात आली आहे. हैदराबाद गॅझेटबाबत न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ देण्याची त्यांची मागणी होती. ही मागणी मान्य करण्यात आली असून या समितीला सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करताना मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना सरकारी नोकरी देण्याबाबत जरांगे यांनी मागणी केली होती. पुढील तीन महिन्यांत उरलेल्या नऊ लोकांना नोकरी देण्यात येईल, असंही विखे पाटील यांनी स्पष्ट केलं.

16:15 (IST) 26 Aug 2025

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुलांच्या दरात दुप्पटीने वाढ; २०० रूपये दराने विकल्या जाणाऱ्या फुलांची ४०० रूपये दराने विक्री

गणेशोत्सवाच्या तोंडावर ही दरवाढ झाली असून शेवंतीचे दर ४०० रूपये किलो तर, गुलाब ६०० रूपये किलोने विकला जात आहे. इतर फुलांचे दरही दुप्पटीने वाढले आहेत. ...सविस्तर बातमी
16:01 (IST) 26 Aug 2025

डोंबिवलीत गणेशमूर्तीकार पळाला… गणेशभक्त, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पदाधिकाऱ्यांमध्ये संताप

सोमवारी रात्रीपासून गणेशमूर्तीकार प्रफुल्ल तांबडे कारखान्यातून गणेशभक्तांना कोणतीही पूर्वसूचना न देता पळून गेला आहे आणि त्यांचा मोबाईलही बंद लागत असल्याने गणेश भक्तांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ...सविस्तर बातमी
15:48 (IST) 26 Aug 2025

ठाणे स्थानकाबाहेरील मंडपाने अडवली प्रवाशांची वाट

सकाळी सायंकाळी प्रवाशांनी भरलेल्या ठाणे स्थानकातील पश्चिमेस सॅटीस पुलाखालील पायऱ्यांलगतच गणेश मंडप उभारण्यात आला आहे. ...सविस्तर बातमी
15:45 (IST) 26 Aug 2025

Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ऐन गणेशोत्सवात जरांगे यांनी मुंबईत येऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ...अधिक वाचा
15:45 (IST) 26 Aug 2025

Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ऐन गणेशोत्सवात जरांगे यांनी मुंबईत येऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ...अधिक वाचा
15:32 (IST) 26 Aug 2025

डोंबिवलीत आयरेगाव तलावा काठच्या बेकायदा चाळी, जोते भुईसपाट

मागील दोन ते तीन महिन्याच्या काळात भूमाफियांनी या बेकायदा चाळींची उभारणी केली होती. तसेच, बेकायदा चाळी उभारणीसाठी आयरेगाव तलाव काठ परिसरात जोत्यांची उभारणी केली होती. ...वाचा सविस्तर
15:15 (IST) 26 Aug 2025

ठाण्यात गणेशोत्सवात टंचाईची समस्या; नदी पात्रातील पाणी पातळी खाली गेल्याने पाणी उपसा कमी होतोय

ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २७ लाख इतकी आहे. शहरासाठी प्रतिदिन ६२१ दशलक्षलीटर इतक्या पाण्याची गरज आहे. परंतु शहराला प्रत्यक्षात दररोज ५९० दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होतो. ...सविस्तर वाचा
15:02 (IST) 26 Aug 2025

कल्याण, डोंबिवलीत बाजारपेठांच्या गजबजाटात; शिळफाटा रस्त्यासह अंतर्गत रस्तेही कोंडले

डोंबिवलीत प्रवेश करणाऱ्या, शिळफाटा रस्त्यावरील वाहनांना पाण्यातून वाट काढत जावे लागते, अशा तक्रारी करूनही गवार कंपनीचा ठेकेदार दाद देत नसल्याच्या तक्रारी आहेत. ...अधिक वाचा
14:53 (IST) 26 Aug 2025

Terminal 1 at Mumbai Airport: मुंबई विमानतळाचं टर्मिनल १ पाडलं जाणार, पण नवी मुंबई विमानतळामुळे मिळतेय मुदतवाढ, वाचा नेमकं काय आहे नियोजन!

Mumbai Airport Terminal 1: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पुनर्विकास प्रकल्पाचा भाग म्हणून टर्मिनल १ पूर्णपणे बंद करून पाडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ...सविस्तर बातमी
14:50 (IST) 26 Aug 2025

अमरावतीच्या ' या ' मातीच्या गणपतीला ३७५ वर्षांची परंपरा…

अमरावतीतील पाटलाच्या वाड्यातील देशमुख कुटुंब गेल्या ३७५ वर्षांपासून एक आगळीवेगळी परंपरा जपत आहे.दरवर्षी मातीची मूर्ती तयार केली जाते. गणेश चतुर्थीला तिची स्थापना होते, आणि पुढील वर्षीच्या गणेशोत्सवापर्यंत ही मूर्ती वर्षभर मंदिरात पूजेसाठी ठेवली जाते. ...सविस्तर वाचा
14:50 (IST) 26 Aug 2025

हरितालिकेला सोने वधारले… जळगावमध्ये किती दर ?

सोन्याच्या दरात ८०० रूपयांची वाढ नोंदली गेली असताना, चांदीची किंमत मात्र सलग दुसऱ्या दिवशी स्थिर राहिली. ...अधिक वाचा
14:45 (IST) 26 Aug 2025

"आझाद मैदानात आंदोलन करायचं असेल तर आधी..." उच्च न्यायालयाचे मनोज जरांगेंना निर्देश

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे – पाटील यांनी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मोर्चा आणण्याचे जाहीर केले आहे. मात्र, जरांगे यांना परवानगीशिवाय हे आंदोलन करता येणार नाही. तसेच, त्यांना परवानगी देण्यात आली तरी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची, तसेच कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी त्यांना मुंबईऐवजी खारघर येथील जागेचा आंदोलनासाठी पर्याय द्यावा, असे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला दिले.

14:43 (IST) 26 Aug 2025

कल्याणमधील सुभेदारवाडा गणेशोत्सवाचा शताब्दी पुरस्कार कल्याण गायन समाजाला

हा पुरस्कार वितरणाचा सोहळा २ सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडे सात वाजता सुभेदारवाडा शाळा येथील सभागृहात होणारआहे. ...सविस्तर बातमी
14:32 (IST) 26 Aug 2025

Ganesh Utsav 2025 : गणेशाची प्रतिष्ठापना आणि गौरी आवाहन, विसर्जनाच्या मुहूर्त जाणून घ्या….!

गणेशाच्या प्रतिष्ठापनेसाठी कोणतेही कमी भासू नये यासाठी काही दिवस आधीपासूनच तयारी सुरू असते. यामध्ये मंडळात आणि घरगुती प्रतिष्ठापनेसाठी आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई आणि रंगीबेरंगी आरास, पुजेचे साहित्य, फळे, फुले, नैवेद्य यांचे नियोजन केले जाते. ...सविस्तर बातमी
14:21 (IST) 26 Aug 2025

Video : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्णयाविरोधात भिवंडीकरांचा रस्त्यावर संताप

ठाणे शहरात अवजड वाहनांना निर्बंध आहेत. ठाणे पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार, घोडबंदर शहरात अवजड वाहनांना दररोज दुपारी १२ ते ४ आणि रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत परवानगी आहे. ...वाचा सविस्तर
14:21 (IST) 26 Aug 2025

कोकणवासीयांचे विघ्न संपता संपेना, कोकण रेल्वेच्या नियोजनाचा बट्ट्याबोळ; गाड्या चार-पाच तास उशिरा, प्रवाशांचे हाल

Konkan Railway Updates : कोकण रेल्वेच्या नियोजनाचा बट्ट्याबोळ झाला असून गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. ...सविस्तर बातमी
14:15 (IST) 26 Aug 2025

" गाडीसे उतरकर मेरा आशीर्वाद लो "…महिला गाडीतून उतरल्या, आणि…

साधूचा वेष धारण करून रस्तालूट करणाऱ्या पाच दरोडेखोरांना धुळ्यातील मोहाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. ...सविस्तर बातमी
14:05 (IST) 26 Aug 2025

Ganesh Chaturthi 2025: गणेशोत्सव निमित्त बाजारात कृत्रिम ‘केळीची पानं'; स्थानिक शेतकऱ्यांना फटका

गणेशोत्सवानिमित्त बाजारात विविध साहित्य विक्रीसाठी आले असून यात कृत्रिम केळीच्या पानांचाही समावेश आहे. यामुळे बाजारात नैसर्गिक पाने विक्रीसाठी बसलेल्या शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...सविस्तर वाचा