Maharashtra Politics News Updates, 28 August 2025 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त “संघाच्या प्रवासाची १०० वर्षे – नवीन क्षितिज” या व्याख्यानमालेत सरसंघचालक मोहन भागवत संबोधित करत आहेत. यावेळी त्यांनी देशातील राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य केले.

शिवनेरी येथून प्रेरणा मिळते. खूप मोठ्या वेदना आहेत हे देवेंद्र फडणवीसांनी समजून घेतलं पाहिजे. मराठा समाजाच्या लेकरांच्या वेदनांना न्याय मिळाला पाहिजे, त्याला मुख्यमंत्र्यांनी साथ दिली पाहिजे. देवेंद्र फडणवीस कुणाला थांबवणार नाहीत, असं मनोज जरांगे म्हणाले. न्यायालयाने जे सांगितलं त्याप्रमाणे आम्हाला करावं लागलं. न्यायदेवतेनं सांगितलं परवानगी घ्या…त्यानंतर एक दिवसाची आंदोलनाची परवानगी ही चेष्टा आहे. मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत परवानगी देऊ शकता. जाणूनबुजून तुम्ही एक दिवसाची परवानगी दिली, अशी टीका मनोज जरांगेंनी केली. महाराष्ट्रात बुधवारी घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणरायाचं आगमन झालं आहे. गणपतीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं. या आणि अशा सगळ्या बातम्यांवर आपली नजर असणार आहे लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून

Live Updates

RSS Mohan Bhagwat Address Live Updates: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण

20:03 (IST) 28 Aug 2025

RSS Mohan Bhagwat Address Live Updates: आरक्षणाची गरज भासत नाही तोपर्यंत संघ आरक्षणासाठी लढत राहील, सरसंघचालक मोहन भागवत

घटनात्मकदृष्ट्या अनिवार्य असलेल्या आरक्षणाला संघाचा पूर्ण पाठिंबा आहे. जोपर्यंत आवश्यक आहे, तोपर्यंत आरक्षण दिले गेले पाहिजे आणि संघ त्याचे समर्थन करेल, असे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.

18:57 (IST) 28 Aug 2025

Mohan Bhagwat Address Live Updates: रस्त्यांना विदेशी आक्रमकांची नावे देऊ नयेत - सरसंघचालक मोहन भागवत

भारतातील रस्त्यांना विदेशी आक्रमणकारकांची नावे देऊ नयेत, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.

18:53 (IST) 28 Aug 2025

Mohan Bhagwat Address Live Updates: धर्म ही वैयक्तिक बाब आहे - सरसंघचालक मोहन भागवत

धर्म ही वैयक्तिक बाब आहे. मुस्लिमांना देशात कुठेही जाऊन काम करण्याचा अधिकार आहे आणि त्यांना तो मिळाला पाहिजे. मात्र स्थलांतरितांच्या बाबत हा नियम लावता कामा नये, सरसंघचालक मोहन भागवत यांचे मत.

18:51 (IST) 28 Aug 2025

Mohan Bhagwat Address Live Updates: भाजपाला आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो - सरसंघचालक मोहन भागवत

मी शाखा चालविण्याचा तज्ज्ञ आहे. भाजपा सरकार चालविण्यात कुशल आहे. आम्ही फक्त एकमेकांना सल्ले देऊ शकतो, असेही सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.

18:50 (IST) 28 Aug 2025

Mohan Bhagwat Address Live Updates: हिंदू-मुस्लीम एकच आहेत, भारतातून इस्लामचे अस्तित्व संपणार नाही - सरसंघचालक मोहन भागवत

हिंदू-मुस्लीम हे एकच आहेत, त्यांना एकत्र येण्याची गरज नाही. भारतातून इस्लाम नष्ट होईल, यावर कोणताही हिंदू विश्वास ठेवू शकत नाही, असेही सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.

18:47 (IST) 28 Aug 2025

सMohan Bhagwat Address Live Updates: सरकारने अवैध स्थलांतरावर निर्बंध घालावेत - सरसंघचालक मोहन भागवत

सरकार अवैध स्थलांतरावर चाप बसवत आहे. पण समाजाचीही याला साथ मिळायला हवी, असे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.

18:42 (IST) 28 Aug 2025
Mohan Bhagwat Address Live Updates: प्रत्येक भारतीय कुटुंबाने तीन अपत्यांना जन्म द्यावा, सरसंघचालक मोहन भागवत

सर्व भारतीय नागरिकांनी तीन अपत्ये जन्माला घालण्याचा विचार करावा, जेणेकरून लोकसंख्या पुरेशी असेल आणि नियंत्रणातही राहिल, असे आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

18:34 (IST) 28 Aug 2025

दगडूशेठ गणपतीसमोर ३५ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. ...वाचा सविस्तर
18:12 (IST) 28 Aug 2025

Maharashtra News Live Updates: शिवसेना नगरसेवक हत्या प्रकरणात अरुण गवळीला जामीन; १८ वर्षांनंतर येणार बाहेर

कुख्यात गुंड अरुण गवळी याला २००७ च्या शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणात जामीन मिळाला आहे. त्यामुळे तब्बल १८ वर्षांनी त्याची जामिनावर सुटका होणार आहे.

17:34 (IST) 28 Aug 2025

वैमनस्यातून इसमाची दगडाने ठेचून हत्या….शांतताप्रिय गावातील जे घडले त्यामुळे….

चिखली तालुक्यातील हरणी हे शांतताप्रिय गाव एका प्रौढ इसमाच्या निर्घृण हत्येने हादरले. या इसमाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली. ...अधिक वाचा
17:23 (IST) 28 Aug 2025

भाजपकडून जरांगेविरोधात निदर्शने… ओबीसी आरक्षणात घुसखोरी करत असल्याचा आरोप…

'ओबीसी' आरक्षणात मराठा समाजाला सरसकट समाविष्ट करण्याच्या मागणीला तीव्र विरोध दर्शवत मनोज जरांगे यांच्या भूमिकेविरोधात भाजपने -ओबीसी मोर्चाच्या वतीने गडचिरोली शहरात जोरदार निदर्शने करण्यात आले. ...अधिक वाचा
16:50 (IST) 28 Aug 2025

पिंपरी : गणपती स्टॉलवर मूर्तीकाराचे १५ हजार रुपये चोरीला; दोघे अटकेत

गणपती स्टॉलवर एका मूर्तीकाराच्या पॅन्टमधून जबरदस्तीने १५ हजार रुपये चोरल्याची घटना बुधवारी दुपारी भोसरीत घडली. ...सविस्तर बातमी
15:59 (IST) 28 Aug 2025

जरांगेंना फडणवीसांच्या शहरातून प्रतिआव्हान, ओबीसी संघटनेचे…

महासंघाची भूमिका मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे, अशी आहे. परंतु जरांगे पाटील यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण हवे आहे. त्यांच्या या भूमिकेच्या विरोधात महासंघ आंदोलन करणार आहे. ...सविस्तर बातमी
15:49 (IST) 28 Aug 2025

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सावनेरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात… लाच घेतल्याशिवाय काम…

राज्याचे महसूलमंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे स्वत: नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील एका दुय्यम निबंधक कार्यालयात अचानक पोहचले. या कार्यालयात पैसे घेतल्याशिवाय काम होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. ...सविस्तर बातमी
15:38 (IST) 28 Aug 2025

बुलढाणा : ३०७ गावांत एकच गणपती, लाखो गावकऱ्यांचा एकोपा

तब्बल ३०७ गावांत राबविण्यात आलेला एक गाव एक गणपती हा आदर्श उपक्रम यंदाच्या गणेश उत्सवाचे वैशिट्य ठरले आहे. ...अधिक वाचा
15:24 (IST) 28 Aug 2025

ग्रामीण हद्दीतही गुन्हेगार सुसाट, शेतीच्या वादातून पारशिवनीत एकाचा खून

नागपूर शहरापाठोपाठ आता ग्रामीण पोलीस हद्दींमध्येही गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांची हिंमत वाढत असल्याने सामान्यांना जीव मुठीत धरून रहावे लागत आहे. ...वाचा सविस्तर
15:20 (IST) 28 Aug 2025

मराठा आंदोलन हाताळण्यासाठी नवी मुंबई लगबग…. वाहतूक पोलिसांनी केले हे महत्वाचे बदल….

२९ ऑगस्टला मुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षण मागणी साठी आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी अनेक अटी सह परवानगी देण्यात आली आहे. ...वाचा सविस्तर
15:19 (IST) 28 Aug 2025

Maratha Reservation : मनोज जरांगे हजारो समर्थकांसह मुंबईपासून काही तासांच्या अंतरावर, आंदोलनामुळे नवी मुंबईत करण्यात आलेले वाहतूक बदल जाणून घ्या…

आंदोलकांच्या असंख्य वाहनांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहनकोंडी नवी मुंबईत होऊ नये म्हणून यासाठी ज्यावेळेस आंदोलकांची वाहने मार्गस्थ होतील त्यावेळेस नवी मुंबईतील महामार्गावर प्रवेश बंदीची अधिसूचना नवी मुंबई वाहतूक पोलीसांनी बुधवारी जाहीर केली.  ...वाचा सविस्तर
15:19 (IST) 28 Aug 2025

Maratha Reservation : मनोज जरांगे हजारो समर्थकांसह मुंबईपासून काही तासांच्या अंतरावर, आंदोलनामुळे नवी मुंबईत करण्यात आलेले वाहतूक बदल जाणून घ्या…

आंदोलकांच्या असंख्य वाहनांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहनकोंडी नवी मुंबईत होऊ नये म्हणून यासाठी ज्यावेळेस आंदोलकांची वाहने मार्गस्थ होतील त्यावेळेस नवी मुंबईतील महामार्गावर प्रवेश बंदीची अधिसूचना नवी मुंबई वाहतूक पोलीसांनी बुधवारी जाहीर केली.  ...वाचा सविस्तर
15:19 (IST) 28 Aug 2025

Maratha Reservation : मनोज जरांगे हजारो समर्थकांसह मुंबईपासून काही तासांच्या अंतरावर, आंदोलनामुळे नवी मुंबईत करण्यात आलेले वाहतूक बदल जाणून घ्या…

आंदोलकांच्या असंख्य वाहनांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहनकोंडी नवी मुंबईत होऊ नये म्हणून यासाठी ज्यावेळेस आंदोलकांची वाहने मार्गस्थ होतील त्यावेळेस नवी मुंबईतील महामार्गावर प्रवेश बंदीची अधिसूचना नवी मुंबई वाहतूक पोलीसांनी बुधवारी जाहीर केली.  ...वाचा सविस्तर
15:16 (IST) 28 Aug 2025

मराठा आंदोलनामुळे पळस्पे ते जेएनपीए व खारपाडा ते पनवेल मार्ग बंद ; मुंबईत जाणाऱ्या वाहनांना उरण मार्गाने प्रवास करण्याच्या सूचना

गोवा मार्गाने खारपाडा ते पनवेल असा प्रवास करणाऱ्या वाहनांना खारपाडा ते साई चिरनेर दिघोडे गव्हाण फाटा मार्गे टी पॉईंट कलंबोली मार्गे पनवेल शीव मार्गाने प्रवास करण्याच्या सूचना नवी मुंबई वाहतूक विभागाने केल्या आहेत. ...वाचा सविस्तर
15:15 (IST) 28 Aug 2025

मराठा आंदोलन : नवी मुंबईत आंदोलक दाखल होण्यास सुरुवात; एपीएमसीत मुक्कामाची सोय, महापालिका-सिडकोकडून अद्याप सहकार्य नाही

गुरुवार (२८ ऑगस्ट) मध्यरात्रीपासून आंदोलक नवी मुंबईत दाखल होऊ लागले असून, शुक्रवारी पहाटेपर्यंत मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते येण्याची शक्यता आहे. ...वाचा सविस्तर
15:14 (IST) 28 Aug 2025

मनोज जरांगे पाटील नवी मुंबईत दाखल होण्याआधीच खारघरमध्ये फडणवीसांच्या समर्थनार्थ भाजपची बॅनरबाजी

नवी मुंबईच्या मार्गाने हजारोंच्या संख्येने हे आंदोलक २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर धडकणार आहेत. ...सविस्तर वाचा
15:08 (IST) 28 Aug 2025

‘खडकवासला-फुरसुंगी’ बोगदा प्रकल्पाला वेग, केंद्राकडून पर्यावरण मंजुरी प्राप्त

खडकवासला धरण ते फुरसुंगीदरम्यान २८ किलोमीटर लांबीचा बोगदा प्रस्तावित आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर सुमारे २.८ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच शहराला दोन महिने पुरेल एवढे पाणी वाचणार आहे. ...सविस्तर वाचा
14:57 (IST) 28 Aug 2025

Upper Wardha Dam News: अमरावती विभागातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणाची तीन दारे उघडली, ४८.२५ घनमीटर प्रति सेकंद विसर्ग सुरू

अप्पर वर्धा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमान तसेच येणाऱ्या येव्याच्या परीगणना नुसार प्रकल्पाच्या जलाशयाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. ...सविस्तर बातमी
14:54 (IST) 28 Aug 2025

ढोल- ताशांनी निनादले अवघे नागपूर, आकाशातून बरसल्या हलक्या जलधारांच्या अक्षता

गणेश मिरवणूकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेली चितारओळ, इतवारी, बडकस चौक, गांधी पुतळा, सिताबर्डी, धरमपेठेसह संपूर्ण शहर दिवसभर गणरायाच्या स्वागतासाठी ओसंडून वाहत होते. ...वाचा सविस्तर
14:46 (IST) 28 Aug 2025

Vidarbha Rain Alert News: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांना अलर्ट

राज्यात २८ ते ३१ ऑगस्टदरम्यान जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ...सविस्तर वाचा
14:40 (IST) 28 Aug 2025

मेहुण्याने दिली जावयाच्या हत्येची सुपारी, बहिणीला देत होता त्रास…

याप्रकरणी आतापर्यंत एकूण पाच आरोपींना अटक झाली असून, त्यांना मदत करणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. ...सविस्तर बातमी
14:32 (IST) 28 Aug 2025

"ब्राह्मण असल्यामुळे फडणवीसांचा इतका तिरस्कार, ते जर मराठा असते तर…", भाजप नेत्याचा जरांगेंना सवाल

आंदोलनासाठी एक दिवसाची परवानगी ही मराठ्यांची चेष्टा आहे, अशी टीका जरांगे यांनी केली. ...वाचा सविस्तर
14:22 (IST) 28 Aug 2025

भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचे महापालिका निवडणुकीतही वर्चस्व

पूर्व विधानसभा मतदारसंघात १० प्रभागांचा समावेश आहे. त्यापैकी काही प्रभाग उत्तर, मध्य आणि दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघाचा भाग आहेत. ...अधिक वाचा

Mohan Bhagwat On Learning English Language

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी आज शैक्षणिक सुधारणांवर भाष्य केले आहे. (Photo: Reuters)