scorecardresearch

Maharashtra News : छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणायचे असेल तर…”, शरद पवार यांचे मोठे वक्तव्य, वाचा प्रत्येक अपडेट फक्त एका क्लिकवर…

Maharashtra Political News Updates : राज्यात महापुरुषांवरील वक्तव्यांवरून नवनवे वाद होताना पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यासह देशातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीचा वेगवान आढावा…

Maharashtra News : छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणायचे असेल तर…”, शरद पवार यांचे मोठे वक्तव्य, वाचा प्रत्येक अपडेट फक्त एका क्लिकवर…
महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट

Maharashtra Breaking News Updates, 03 January 2023 : राज्यात महापुरुषांवरील वक्तव्यांवरून नवनवे वाद होताना पाहायला मिळत आहेत. कधी सत्ताधारी भाजपा-शिंदे गटातील नेत्यांच्या वक्तव्यावरून विरोधी पक्ष महाविकासआघाडी आक्रमक होतेय, तर कधी सत्ताधारी विरोधी पक्षातील नेत्यांच्या वक्तव्यावरून टीका करत आहे. अशातच शिंदे गटातही अस्वस्थता असल्याचा आरोप मंत्री अब्दुल सत्तार यांनी केल्याने नवा वाद निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर राज्यासह देशातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीचा वेगवान आढावा…

Live Updates

Maharashtra Marathi Batmya Today, 03 January 2023 : राज्यासह देशातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीचा वेगवान आढावा…

18:43 (IST) 3 Jan 2023
गद्दारांना घरातून निघणे मुश्किल करू, ठाकरे गटाचे बबन घोलप यांचा इशारा

नाशिक : शिवसेनेशी गद्दारी करणारा मग तो कुणीही असो, त्याला कदापि माफ केले जाणार नाही. त्याला घरातून निघणे मुश्किल करू, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते बबन घोलप यांनी दिला आहे.

सविस्तर वाचा…

18:08 (IST) 3 Jan 2023
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांसाठी रविवारी मतदान

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभा, विद्यापरिषद आणि अभ्यासमंडळे या प्राधिकरणांच्या रविवारी होणार्‍या निवडणुकीसाठी २५ केंद्रांत मतदान होणार असून, निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी अधिकारी आणि कर्मचार्‍यांसाठी प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. १० जानेवारी रोजी विद्यापीठात मतमोजणी होईल.

सविस्तर वाचा…

17:40 (IST) 3 Jan 2023
नवी मुंबईत सम विषम पार्किंग फलक उरले नावापुरते; शहरात पार्किंगचा बट्ट्याबोळ,सम विषम तारखानुसार पार्किंग फक्त कागदावर

नियोजनबध्द शहराची शेखी मिरवणाऱ्या नवी मुंबईत शहरात पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक जटील होत असून शहरातील नो पार्किंग जागेतच पार्किंग केलेल्या वाहनांची गर्दी पाहायला मिळत आहे. नवी मुंबई वाहतूक विभागाच्यावतीने शहरात सर्वत्र गर्दीच्या रस्त्यावर किमान एका दिशेचा रस्ता वाहनांसाठी रिकामा राहील व वाहतूक सुरळीत होईल यासाठी सम विषम पार्किंगचे फलक लावले आहेत. सविस्तर बातमी

17:38 (IST) 3 Jan 2023
पुणे महापालिकेला न्यायालयाचा दणका, खड्ड्यामुळे अपघाती मृत्यूप्रकरणी कुटुंबाला १६ लाखांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश

पुणे : खड्ड्यामुळे दुचाकी घसरून अपघाती मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना १६ लाख रुपये १६ टक्के व्याजासह नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयातील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश एस. एस. शिंदे यांनी पुणे महानगरपालिकेला दिले आहे.

सविस्तर वाचा…

17:26 (IST) 3 Jan 2023
बुलढाणा : राज्यातील अंगणवाडी सेविकांचं ठरलं! प्रशासनाला कोणतीही माहिती देणार नाही, प्रशिक्षणासह सर्वेक्षणावरसुद्धा बहिष्कार

सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त झालेल्या राज्यातील दोन लाख दहा हजार अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी प्रशासनाला कुठलीच माहिती न देण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच प्रशिक्षण, सर्वेक्षण आणि मासिक अहवाल सभांवर सुद्धा बहिष्कार टाकण्यात आला आहे. ‘सिटू’ संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाब गायकवाड व संघटनेच्या जिल्हा सचिव प्रतिभा वक्टे यांनी ही माहिती दिली. सविस्तर बातमी

17:11 (IST) 3 Jan 2023
अदानी समुहाला वीज वितरणाचा परवाना देण्यास विरोध, कर्मचारी संपावर

अदानी समुहाला वीज वितरणाचा परवाना देण्यास महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा विरोध, तीन दिवस जाणार संपावर, संपात ३० संघटनांचा सहभाग

17:04 (IST) 3 Jan 2023
वाशीम : जिल्हा सामान्य रुग्णालय समस्यांच्या गर्तेत; लाखो रुपयांचे इन्व्हर्टर तरीही बालरुग्ण कक्ष अंधारात, लिफ्ट केवळ नावापुरतीच

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात केवळ शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील अनेक रुग्ण उपचारासाठी येतात. पूर्वीपेक्षा आता विविध आजाराचे निदान होत असले तरी अद्यापही अनेक समस्या कायम आहेत. सामान्य रुग्णालयातील दुसऱ्या माळयावर बालरुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष आहे. परंतु सोमवारी रात्री वीजपुरवठा खंडीत झाल्याने संपूर्ण वार्डात तासभर अंधार पसरलेला होता. सविस्तर बातमी

16:41 (IST) 3 Jan 2023
सोलापूर रस्त्यावर वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू

पुणे : भरधाव वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावर घडली. अपघातानंतर पसार झालेल्या दुचाकीस्वारविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

16:23 (IST) 3 Jan 2023
ठाणे महापालिका क्षेत्रात बेकायदा बांधकामे सुरुच; पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

ठाणे महापालिका क्षेत्रात बिनधिक्तपणे बेकायदा इमारती उभारणीची कामे सुरु असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.

सविस्तर वाचा…

16:09 (IST) 3 Jan 2023
आरोग्य विज्ञान विद्यापीठ प्राधिकरण निवडणूक : प्राथमिक मतदार याद्यांवरील हरकतींवर कुलगुरूंसमोर सुनावणी

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विविध प्राधिकरण आणि अभ्यास मंडळांवरील सदस्य निवडीकरीता निवडणुकीच्या अनुषंगाने प्राथमिक मतदार याद्या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्या आहेत. मुदतीत प्राप्त होणाऱ्या हरकतींवर कुलगुरूंसमोर सुनावणी होणार आहे.

सविस्तर वाचा…

16:07 (IST) 3 Jan 2023
नगर जिल्ह्याच्या नामांतरावरून गोपीचंद पडळकर यांना राधाकृष्ण विखेंचा टोला, बाहेरील कोणी येऊन त्यावर भाष्य करण्यापेक्षा….

कसबा विधानसभा मतदार संघाच्या भाजप आमदार मुक्ता टिळक यांच २२ डिसेंबर रोजी निधन झाल.त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे पशू संवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांची केसरीवाडा येथील निवासस्थानी भेट घेऊन सांत्वन केले.त्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी सोबत बोलताना मुक्ता टिळक यांच्या सभागृहातील कामकाजातील आठवणींना यावेळी त्यांनी उजाळा दिला. सविस्तर वाचा

15:52 (IST) 3 Jan 2023
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा निषेध करण्यासाठी कल्याणमध्ये भाजपची निदर्शने

कल्याण : छत्रपती संभाजी राजे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ कल्याण शहर भाजपतर्फे मंगळवारी शिवाजी चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.

सविस्तर वाचा…

15:48 (IST) 3 Jan 2023
डोंबिवलीत रिक्षेत विसरलेले महिला प्रवाशाचे पाच तोळ्याचे सोन्याचे दागिने चालकाकडून परत

डोंबिवली पश्चिमेत एक महिला प्रवासी आपली पिशवी सोमवारी रिक्षेत विसरली. पिशवीत पाच तोळ्याचे सोन्याचे दागिने होते. संबंधित रिक्षा चालकाने त्या महिला प्रवाशाची रिक्षेत विसरलेली पिशवी परत केली.

वाचा सविस्तर…

15:34 (IST) 3 Jan 2023
मुंबई: जॉन्सन बेबी पावडर प्रकरण : मुलांचे आरोग्य धोक्यात होते, तर कारवाईबाबत सरकार दोन वर्षे झोपले होते का ?

जॉन्सन ॲण्ड जॉन्सन या कंपनीचे बेबी टाल्कम पावडर उत्पादन लहान मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक होते, तर नोव्हेंबर २०१९ पासून या उत्पादनाचा परवाना रद्द करण्याच्या कारवाईबाबत झोपला होता का ? हीच तुमची लहान मुलांच्या आरोग्याप्रतीची तत्परता आहे का ? अशी  प्रश्नांची सरबत्ती उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला केली. तसेच कारवाईतील विलंबाबाबत सरकारला धारेवर धरले. सविस्तर बातमी

15:12 (IST) 3 Jan 2023
मंबई विमानतळावरील करोना चाचण्यांमध्ये वाढ

चीन, जपान, हाँगकाँग आणि दक्षिण कोरिया या देशांमधून मुंबईत येणाऱ्या नागरिकांची करोना चाचणी बंधनकारक करण्यात आली असून गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई विमानतळावरील चाचण्यांमध्ये वाढ झाली आहे. मुंबई विमानतळावर दररोज ६०० हून अधिक प्रवाशांची करोना चाचणी करण्यात येत आहे. त्यामुळे परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी करण्याचे प्रमाण वाढले आहे. सविस्तर बातमी

14:55 (IST) 3 Jan 2023
नागपूर : सावधान! बुधवारपासून राज्यभरातील वीज यंत्रणा ‘सलाईनवर’!

महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता संघर्ष समितीच्या बॅनरखाली विविध संघटनांनी अदानी इलेक्ट्रिकल या कंपनीला नवीन लायसंसी देण्याला विरोध आणि कंपन्यांच्या खासगीकरणाला विरोधासह इतर मागण्यांसाठी ४ जानेवारीपासून ७२ तासांच्या संपाची हाक दिली आहे. त्यात सोमवारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेनेही उडी घेतली असून तेही संपात सहभागी होणार आहे. सविस्तर बातमी

14:54 (IST) 3 Jan 2023
कोपर पश्चिम रेल्वे स्थानकाच्या जागेत बेकायदा गाळ्यांची उभारणी

डोंबिवली : कोपर पश्चिम रेल्वे स्थानकातील गर्दी वाढू लागली आहे. याठिकाणी मध्य रेल्वे प्रशासनाकडून सरकता जिना, नवीन पादचारी पूल उभारणीची कामे सुरू आहेत. या स्थानकाचे महत्व येत्या काळात वाढणार असल्याने कोपर भागातील काही राजकीय मंडळींनी रेल्वेच्या बांधकाम परवानग्या न घेता रेल्वे स्थानक भागात बेकायदा गाळ्यांची उभारणी केली आहे.

सविस्तर वाचा…

14:38 (IST) 3 Jan 2023
भंडारा : दुप्पट पैशाचे आमीष दाखवून ३९ लाखांने गंडवले; तिघांवर गुन्हा दाखल

भंडारा : पैसे दुप्पट करून देण्याचा नावावर जवळपास ३९ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार तुमसर येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी कुंजनलाल भोंडेकर (३०), मृणाली शहारे (२५) व ओमप्रकाश रमेश गायधने (३३ ) यांच्याविरोधात तुमसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सविस्तर बातमी

14:36 (IST) 3 Jan 2023
डोंबिवलीत सोनारपाडा येथे मोटीराच्या धडकेत महिला गंभीर जखमी

डोंबिवली : डोंबिवली पूर्व भागातील शिळफाटा रस्त्यालगतच्या सोनारापाडा येथील शंकरानगर भागात सोमवारी दुपारी कारने एका महिलेच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत महिला दुचाकीसह रस्त्याच्या बाजुला फेकली गेली. या महिलेच्या हात आणि पायाला गंभीर दुखापती झाल्या आहेत. आजारी असलेल्या या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सविस्तर वाचा…

14:25 (IST) 3 Jan 2023
 नालासोपाऱ्यात व्यायाम प्रशिक्षकाचा श्वास कोंडल्याने दुर्दैवी मृत्यू

नालासोपाऱ्यात व्यायाम प्रशिक्षकाचा श्वास कोंडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. देविदास विनायक जाधव (३५) असे या प्रशिक्षकाचे नाव आहे. नालासोपारा पश्चिम, यशवंत गौरव येथील शालिभद्र यश अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या देविदास जाधव याला १ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता.

सविस्तर वाचा…

14:07 (IST) 3 Jan 2023
नंदुरबार जिल्ह्यातील तरंगत्या दवाखान्यांची अंतिम घटका, देखभालअभावी धोकादायक स्थितीत

नंदुरबार : नर्मदा काठावरील आदिवासी बांधवांसाठी १७ वर्षांपासून आरोग्यदायिनी ठरलेले नंदुरबार जिल्ह्यातील तरंगते दवाखाने अंतिम घटका मोजत आहेत. दुरुस्ती आणि देखभालअभावी सध्या धोकादायक झालेल्या या दवाखान्यांतून जीवघेणा प्रवास करून आरोग्य यंत्रणा आजही दऱ्याखोऱ्यातील आदिवासी बांधवांना तुटपुंज्या सुविधांमध्ये आरोग्य सुविधा देत आहे.

सविस्तर वाचा…

13:49 (IST) 3 Jan 2023
जळगाव : गौण खनिज घोटाळ्याची चौकशी सुरू, मुक्ताईनगरात पथक दाखल

जळगाव – नागपूर अधिवेशनात मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी यांच्या नावे असणाऱ्या जमिनीवरून गौण खनिजाचे उत्खनन करीत तब्बल चारशे कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य शासनाचे पथक मुक्ताईनगरात दाखल झाले आहे. तीन दिवस या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

सविस्तर वाचा…

12:41 (IST) 3 Jan 2023
कोंढव्यात विवस्त्र अवस्थेत महिलेचा मृतदेह, डोक्यात दगड घालून खून

पुणे : कोंढव्यातील एनआयबीएम संस्थेच्या परिसरातील मोकळ्या मैदानात एका महिलेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत सापडला. महिलेच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले असून, महिलेची ओळख पटलेली नाही.

सविस्तर वाचा…

12:26 (IST) 3 Jan 2023
‘किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सव’ २० जानेवारीपासून, भरड धान्य विषयाला वाहिलेला देशातील पहिला महोत्सव

पुणे : पर्यावरण जतन आणि संवर्धनाविषयी जनजागृती करणारा ‘किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सव’ येत्या २० ते २३ जानेवारी या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे. भारताच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रांनी २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे.

सविस्तर वाचा…

12:06 (IST) 3 Jan 2023
पुणेकरांचे १९३ कोटी ‘खड्ड्यात’? महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा निधी वापरून रस्ते दुरुस्तीचा महापालिका प्रशासनाचा प्रस्ताव

पुणे : शहरातील रस्त्यांची दुरुस्ती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. त्यासाठी १९३ कोटींचा खर्च अपेक्षित असून रस्ते दुरुस्तीसाठी आवश्यक निधी वर्गीकरणाच्या प्रस्तावातून उपलब्ध केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ५० कोटी रुपये वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करण्यात येणार असून, याबाबतचा प्रस्ताव पथ विभागाकडून तयार करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

11:51 (IST) 3 Jan 2023
ठाण्यात राज्य परिवहन महामंडळाच्या बसला आग, ६५ प्रवाशी बचावले

ठाणे : उथळसर प्रभाग समिती जवळील दर्ग्यासमोर मंगळवारी सकाळी ठाणेहून भिवंडीच्या दिशेने जात असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसला आग लागली.

सविस्तर वाचा…

11:38 (IST) 3 Jan 2023
महापालिकेतील कंत्राटी सुरक्षा रक्षकांना दिलासा, ४५ वर्षांवरील कामगारांना कामावरून न काढण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

पुणे : महापालिकेच्या विविध विभागातील पंचेचाळीस वर्षांवरील कंत्राटी सुरक्षा रक्षकांना कामावरून काढून टाकण्यात येऊ नये, असे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.

सविस्तर वाचा…

11:28 (IST) 3 Jan 2023

वैद्यकीय शिक्षण खात्याने राज्यभरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाने काढलेल्या त्रुटी दूर करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याअंतर्गत सगळ्या महाविद्यालयांसाठी लवकरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापकासह सहाय्यक प्राध्यापकांची दीडशे पदे भरली जाणार आहेत.

सविस्तर बातमी

11:28 (IST) 3 Jan 2023
शासकीय आयुर्वेद महाविद्यालयांना दीडशे शिक्षक मिळणार!

वैद्यकीय शिक्षण खात्याने राज्यभरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाने काढलेल्या त्रुटी दूर करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याअंतर्गत सगळ्या महाविद्यालयांसाठी लवकरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापकासह सहाय्यक प्राध्यापकांची दीडशे पदे भरली जाणार आहेत.

सविस्तर बातमी

11:27 (IST) 3 Jan 2023
मुंबई : समुद्र दूषित करणाऱ्या नाल्यांचे प्रवाह वळवणार; महानगरपालिका तयार करणार सविस्तर प्रकल्प अहवाल

मोठे नाले, उपनाले, पर्जन्य जलवाहिन्या यांमधून वाहणारे सांडपाणी रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. समुद्र दुषित होण्यास कारणीभूत ठरणारे हे प्रवाह बंद करणे, अन्यत्र हलवणे या कामांसाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याकरिता सल्लागार नेमण्यात येणार आहे.

सविस्तर बातमी

11:26 (IST) 3 Jan 2023
नागपूर: इंडियन सायन्स कॉंग्रेसमधील ‘स्पेस ऑन व्हील्स’ काय आहे?

नागपूर येथे मंगळवारपासून सुरू झालेल्या १०८ व्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या निमित्ताने देश- विदेशातील वैज्ञानिक, संशोधकांचा मेळा भरला आहे. या परिषदेच्या निमित्ताने विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. स्पेस ऑन व्हील्स’ हा त्यातलाच एक प्रकार आहे. आंतराळविषयी माहिती देणारे फिरते प्रदर्शन असून ते नागपूरकरांचे लक्ष वेधून घेत आहे.

सविस्तर बातमी

11:13 (IST) 3 Jan 2023
ससूनचे निवासी डॉक्टर संपावर, बाह्यरुग्ण विभागातील सेवा विस्कळीत

राज्यातील निवासी डॉक्टरांच्या महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडंट डॉक्टर्स (मार्ड) या संघटनेने पुकारलेल्या संपामध्ये पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयातील निवासी डॉक्टरही सहभागी झाले आहेत. रुग्णालयातील सुमारे ६०० निवासी डॉक्टर या संपात सहभागी झाले असून राज्य सरकारकडून अनेक प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याबाबत योग्य ती कार्यवाही होत नसल्याने हा संप पुकारण्यात आल्याचे ‘मार्ड’कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सविस्तर बातमी…

11:12 (IST) 3 Jan 2023
पुणे : भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारक करण्याच्या मागणीसाठी बाबा आढाव यांचे लाक्षणिक उपोषण

देशातील पहिल्या मुलींच्या शाळेचे यथोचित स्मारक आणि मजुर अड्ड्यावरील अतिक्रमण हटवून, त्या जागी मजूर भवन उभारण्यात यावे, या मागणीसाठी ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांच्याकडून उपोषण करण्यात येत आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या बाजूला असलेल्या मजुर अड्डा येथे लाक्षणिक उपोषणास करण्यात येत आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्त सुरु केलेल्या या लाक्षणिक उपोषणाला विविध संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे.

सविस्तर बातमी…

11:07 (IST) 3 Jan 2023
मुंबई : तोतया सीबीआय अधिकाऱ्याला अटक

बनावट ओळखपत्र दाखवून सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करून घाटकोपर येथील लॉजवर शोध मोहीम राबवणाऱ्या तोतयाला पोलिसांनी रंगेहाथ पकडले.. तोतयागिरी केल्याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली.

सविस्तर बातमी…

Maharashtra News Live Updates Today

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स, महाराष्ट्र पॉलिटिकल अपडेट्स

First published on: 03-01-2023 at 11:04 IST

संबंधित बातम्या