वातावरणामधील बदल लक्षात घेता भारतीय हवामान खात्याने येत्या चार ते पाच दिवसांत मुंबई, ठाणे परिसरात मुसळधार तर संपूर्ण महाराष्ट्रात साधारण पावसाची वर्तवली आहे. सध्या मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात सरी बरसत आहेत. हीच स्थिती पुढील काही दिवस काय राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह चाकरमान्यांनी योग्य ती खरबदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

हेही वाचा >>> बंडखोर आमदारांना परत बोलवणारे संतोष बांगर शिंदे गटात कसे आले? खुद्द एकनाथ शिंदेंनीच सांगितली इनसाईड स्टोरी, म्हणाले…

gaza hunger
Israel-Gaza War: गाझातील लक्षावधी लोकांवर उपासमारीची वेळ; या परिस्थितीला कारणीभूत कोण?
the Meteorological Department has predicted unseasonal rain with gale force winds in Maharashtra Pune news
राज्यात दोन दिवस पावसाचे; विदर्भाला गारपिटीपासून दिलासा ?
Rising Temperatures, Vidarbha, IMD Warns, Heat Wave, maharashtra, Unseasonal Rain, Predicted, marathwada, marathi news,
राज्यात उष्णतेची लाट, विदर्भात तापमान ४२ अंश सेल्सिअस पार; शुक्रवारपासून मात्र पावसाचाही अंदाज
Rising Temperatures, Vidarbha, IMD Warns, Heat Wave, maharashtra, Unseasonal Rain, Predicted, marathwada, marathi news,
राज्यात उष्णतेची लाट, विदर्भात तापमान ४२ अंश सेल्सिअस पार; शुक्रवारपासून मात्र पावसाचाही अंदाज

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ५ दिवसांत मध्य भारत, पश्चिम किनारपट्टीवर सक्रिय मान्सूनची स्थिती निर्माण झालेली आहे. सध्या पश्चिम किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत आहेत. तर दुसरीकडे उत्तर ओदिशा व लगतच्या दक्षिण झारखंडमध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात येत्या ५ दिवसात पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> शेतकरी आत्महत्या ते मेट्रो प्रकल्प, नवं सरकार अडीच वर्षे कशावर काम करणार? मुख्यमंत्री शिंदेंनी सविस्तर सांगितलं, म्हणाले…

कोकणात जोरदार पाऊस

सध्या कोकणामध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोकापातळी ओलांडली आहे. त्यामुळे धोकादायक भागातल्या नागरिकांच्या स्थलांतराचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच खालापूर, खोपोली, पेन या भागातही पावसाने हजेरी लावलेली आहे. आगामी चार ते पाच दिवसांत मुंबई, ठाणे व या परिसरातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.

हेही वाचा >>> “आता मी मुख्यमंत्री, ‘तपासून सादर करा’ ही लिखापडी बंद, थेट जिल्हाधिकाऱ्यांना…”; एकनाथ शिंदेंचं वक्तव्य

मुंबईमध्ये रेल्वे वाहतूक विस्कळीत

दरम्यान, सध्या मुंबईमध्ये पाऊस बरसत असून त्याचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पावसामुळे मध्ये रेल्वेची वाहतूक २० मिनिटांने उशिराने सुरु आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर पासवाचा परिणाम झाला आहे. सध्या रायगड जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरु असून येथे सावित्री नदीच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे. चिपळूणमध्येही जागोजागी पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधकाऱ्यांना निर्देश

रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील जोरदार पावसामुळे काही नद्यांनी इशारा पातळी गाठली असून खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली असून अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास व गाढी या नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा थोडे कमी आहे. याशिवाय जगबुडी, काजळी नदीचे पाणी इशारा पातळीवरून वाहत असल्याने या भागातील नागरिकांना वेळीच सूचना देणे, प्रसंगी त्यांना हलविणे तसेच जीवितहानी होऊ देऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी तसेच जलसंपदा विभागाना सावध राहून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. चिपळूण येथील परिस्थितीकडेही सातत्याने लक्ष ठेवण्याचे आणि नागरिकांना वारंवार सूचना देऊन त्यांना सावध ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.