मुंबई : मागील काही महिन्यांपासून देशात पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबईसह राज्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मात्र, देशाच्या वायव्य भागातून पाऊस परतीचा प्रवास सुरू करणार आहे. दोन दिवसांत परतीच्या प्रवासासाठी अनुकूल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. या परतीच्या पावसावर ‘परत कधी येशील तू दारी’, असे म्हणत भावूक अशी कविता करण्यात आली आहे.

भारतीय हवामानशास्त्र पुणे विभागाचे प्रमुख के एस होसळीकर यांनी ही कविती केली आहे. ट्विट करत त्यांनी म्हटलं, “आज लिहीता लिहीता, ह्रदयी धडधड वाढली, जेव्हा तुझ्या निरोपाची बातमी समोर आली. लई गुंतवून ठेवलस आम्हा सर्वांना तुझ्या अनेक रुपांत, कधी अत्यंत अल्हाददायक, तर कधी घनघोर आकांत. संजीवका आठवणी सदा तुझ्या भिजवतील मम खोल अंतरी, रित्या आभाळी शोधतील नजरा, परत कधी येशील तु दारी,” या कवितेतून होसाळीकर यांना पाऊस परतत असल्याचं दु:ख जाणवत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढील एक-दोन दिवसांत राजस्थानसह उत्तर भारतामध्ये मोसमी पाऊस परतीचा प्रवास सुरु करेल. त्यानंतर महाराष्ट्रात आठ ते दहा दिवसानंतर परतीचा पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवानंतर राज्यात पावसाने थैमान घातलं होते. सध्याही मुसळधार पावसाचा इशार हवामान खात्याने दिला आहे.