शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या प्रबोधन यात्रेतील मुक्ताईनगर सभेला प्रशासनाने परवानगी नाकारली. त्यानंतर सुषमा अंधारेंनी जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलताना ‘मी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा हिशोब मुक्ताईनगरमध्ये सभा घेऊनच करेन’, अशी प्रतिक्रिया दिली. यानंतर शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी (५ नोव्हेंबर) यावर प्रतिक्रिया दिली. “माझा हिशोब चुकता करायचा असेल, तर सर्वांना माझं ‘ओपन चॅलेंज’ आहे”, असं आव्हान चंद्रकांत पाटलांनी दिलं.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “सुषमा अंधारेंनी हिशोब चुकता करण्याबाबत वक्तव्य केल्याचं मी ऐकलं नाही. मात्र, कुणाला असा हिशोब चुकता करायचा असेल, तर त्यांना माझं कधीही ‘ओपन चॅलेंज’ आहे. त्या येऊ शकतात.”

“कधीही यावं आणि सभा करावी, उलट आम्ही मदत करू”

“ही लोकशाही शासन प्रणाली आहे. प्रत्येकाला इथं येण्याचा आणि सभा घेण्याचा अधिकार आहे.उलट आम्ही मदत करू, त्यांनी कधीही यावं आणि सभा करावी,” असं मत चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केलं.

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : “मी पुन्हा पुन्हा सांगतेय, आमदार संजय शिरसाट…”, दीपक केसरकरांचा उल्लेख करत सुषमा अंधारे आपल्या दाव्यावर ठाम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“एकनाथ खडसेंकडून कोणतेही चांगले काम होऊ शकत नाही”

एकनाथ खडसे यांनी शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंथन शिबिरात राज्य सरकारची बदनामी करा असं वक्तव्य केलं. यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटलांनी एकनाथ खडसे यांच्याकडून कोणतेही चांगले काम होऊ शकत नाही, असं म्हणत टोला लगावला.