वाई:सत्तेच्या हव्यासापोटी व ईडी इन्कम टॅक्सच्या भीतीने व राजकीय दबावातून अजित पवारांसह जात्यंध पक्षां बरोबर गेलेले खासदार आमदार हे राजकीयदृष्ट्या देश हिताचे नव्हे असे प्रतिपादन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.

वाई विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मेळावा येथील साठे मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी पाटील बोलत होते. यावेळी आमदार शशिकांत शिंदे बाळासाहेब पाटील सुनील माने सारंग पाटील डॉ नितीन सावंत  प्रसाद सुर्वे ॲड निलेश डेरे विजयसिंह पिसाळ  दिलीप बाबर केदार गायकवाड संतोष शिंदे  डॉ सतीश बाबर प्रवीण बाबर उपस्थित होते.   

हेही वाचा >>> माढ्यात रणजितसिंह निंबाळकर दोन लाख मताधिक्याने विजयी होतील; शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांचा दावा

महाराष्ट्रात राजकीय दृष्ट्या लोकशाहीवर अनेक अनेक संकटे आली. ती परतवून लावण्याची ताकद फक्त शरद पवारांमध्ये आहे. त्यासाठी  त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची नितांत गरज आहे.सातारा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा  बालेकिल्ला आहे. हे सिद्ध करण्याची वेळ या निवडणुकीच्या निमित्ताने आली असल्याचेही श्रीनिवास पाटील यांनी सांगितले. माजी मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले,

लोकसभा निवडणूकीत अपेक्षित यश मिळत नसल्याचे लक्षात आल्याने देशाच्या राजकारणात भाजपाकडून पक्ष फोडण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्र हा यशवंतराव चव्हाण किसन वीर लक्ष्मणराव पाटील यांच्या विचाराचा पाईक असून त्यांचे विचार केंद्रबिंदू मानूनच सातारा जिल्ह्याचे राजकारण होईल.  

हेही वाचा >>> सांगली : मिरजेत १९ कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त, तिघांना अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यामुळे महाराष्ट्रात अनेकांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली. परंतु त्याची त्यांना जाण नाही .सध्याची लढाई ही हुकूमशाहीच्या विरोधात आहे. अजित पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका करताना शिंदे म्हणाले त्यांनी पक्ष चोरला, चिन्ह चोरले मात्र  शरद पवारांचा विचार चोरू शकत नाहीत. देशामध्ये सध्या ईडी  व इन्कम टॅक्सची भीती अजित पवारांसह अनेक आमदार खासदार जातीयवादी पक्षांमध्ये पक्षांमध्ये सामील होत आहेत.   जनता मात्र शरद पवारांच्या पाठीशी आहे. देशाच्या सत्तेत बदल घडविण्याची क्षमता फक्त शरद पवार यांच्यामध्येच असल्याने पक्ष्यांची मोट बांधण्याचे काम त्यांच्याकडून होत आहे. यावेळी डॉ नितीन सावंत सतीश बाबर प्रसाद सुर्वे दिलीप बाबर विजयसिंह पिसाळ निलेश डेरे सुधाकर गायकवाड आदींची भाषणे झाली. सभेला वाई विधानसभा मतदारसंघातील निष्ठावांत कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.