कोल्हापूरमधील शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांच्या निवडणूक निकालाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निकालामुळे खासदार संजय मंडलिक यांना दिलासा मिळाला आहे.

२०१९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी त्यांचे राष्ट्रवादीचे प्रतिस्पर्धी धनंजय महाडिक यांचा २ लाख ७० हजार मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत मंडलिक यांना ७ लाख ४५ हजार, महाडिक यांना ४ लाख ४६ हजार तर वंचित बहुजन आघाडीच्या डॉ. अरुणा माळी यांना ६३, २५१ मते मिळाली होती.

वंचितच्या उमेदवार अरुणा माळी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत मतदानाची आकडेवारी, निकालाची जाहीर करण्यात आलेले आकडेवारी यात तफावत असल्याचं सांगत लोकसभा निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी केली होती. या खटल्याची सुनावणी होऊन आज (२६ फेब्रुवारी) उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. मंडलिक यांच्यावतीने अॅड. श्रीकृष्ण गणबावले, अॅड. इंद्रजीत चव्हाण यांनी काम पाहिले.

हेही वाचा : लवासा प्रकल्पाबाबत पवार कुटुंबियांवरील आरोपात तथ्य, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निकाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन्ही खासदारांना दिलासा

दरम्यान, हातकणंगले लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना ९६ हजाराच्या फरकाने पराभूत केले होते. माने यांच्या या निकालाला आव्हान देणारी याचिकाही उच्च न्यायालयात दाखल झाली होती. ही याचिका तीन महिन्यापूर्वी फेटाळण्यात आली होती. त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही खासदारांना दिलासा मिळाला आहे.