सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील मौजे वेलंग या गावात चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराने महिलेचा गळा दाबून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर महिलेच्या दोन लहान मुलांना वेलंग गावाजवळ असणाऱ्या विहिरीत ढकलून दिल्याचं समोर आलं. दत्ता नारायण नामदास असे संशयित आरोपीचे नाव आहे.

या घटनेनंतर संशयित आरोपी दत्ता नामदास त्याच्या मूळ गावी अकलूज याठिकाणी निघून गेला होता. दरम्यान, या प्रकरणात रहिमतपूर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी दत्ता नामदास यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. १५ जून रोजी रात्रीच्या सुमारास चारित्र्याच्या संशयावरून दत्ता नामदास आणि योगिता यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. जेवण झाल्यानंतर आरोपी दत्ता नामदासने योगिताची गळा दाबून हत्या केली.

यानंतर दोन मुलांना विहिरित ढकलून दिले. समीर आणि तनु अशी या लहान मुलांची नावे आहेत. ही हत्या करून आरोपीने वेलंग येथील राहत्या घराला बाहेरून कडी लावून अकलूजला पलायन केले.

हेही वाचा : धुळ्यात प्रेम संबंधांमुळे रात्री ३ वाजता बहिणीची हत्या करुन पहाटे अंत्यविधी उरकले; पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न उघड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, हा प्रकार स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ रहिमतपूर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी संशयित आरोपी दत्ता नारायण नामदासला ताब्यात घेतले. मानभाऊच्या मळ्यातील विहिरीतून मुलांचा मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून मुलांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. या घटनेने सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.