काही महिन्यांपूर्वीच मालवण येथे स्थापन करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली आहे. हा पुतळा का कोसळला याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. मात्र, या घटनेनंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटानेही भाजपा सरकारला लक्ष्य केलं आहे.

शरद पवार गटाने नेमकं काय म्हटलं?

शरद पवार गटाने एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. “पंतप्रधानांच्या प्रसिद्धीचा दिखावा नडला. राजांचा पुतळा नव्हे, महाराष्ट्रधर्म पडला”, असं म्हणत त्यांनी भाजपा सरकारवर टीका केली आहे. “आपल्या प्रसिद्धीच्या दिखाव्यासाठी वेळ आणि कामाच्या दर्जाला दुय्यम स्थान देणाऱ्या नरेंद्र मोदींच्या नीतीचा राम मंदिर आणि संसद भवनानंतर महाराष्ट्राच्या अस्मितेलाचं फटका बसला आहे. नौदल दिनी पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला आहे”, शरद पवार गटाने म्हटलं आहे.

Narhari Zirwal Answer to Raj Thackeray
Narhari Zirwal : नरहरी झिरवाळांचं राज ठाकरेंना उत्तर, “मी आदिवासी आहे जाळी नसली तरीही…”
Shantanu Naidu ratan tata youngest friend
कोण आहे ३० वर्षांचा पुणेकर शांतनू नायडू? त्याची…
statue of Chhatrapati Shivaji Maharaj, statue Shivaji Maharaj in Rajkot,
राजकोट येथील छत्रपतींच्या नव्या पुतळ्याची जबाबदारी सुतारांकडे – दीपक केसरकर
unesco team inspection Raigad fort
युनेस्कोच्या पथकाने का केली रायगड किल्ल्याची पाहणी? जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळण्याची शक्यता किती?
Nitin Gadkari appeal on achieving higher economy sangli
उच्च अर्थव्यवस्था साध्य करण्यासाठी शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यावा; नितीन गडकरी यांचे आवाहन
rohit pawar criticized devendra fadnavis
Rohit Pawar : “गृहमंत्री धृतराष्ट्राप्रमाणे सत्तेच्या मोहात आंधळे होऊन…”; पुण्यातील महिला अत्याचाराच्या घटनांवरून रोहित पवारांचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्र!
chhatrapati sambhajiraje swaraj sanghatna
संभाजीराजे छत्रपतींच्या स्वराज संघटनेला ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’ म्हणून मान्यता; पक्षचिन्हही मिळालं!
Aditya thackeray on Dharavi
Dharavi Masjid : “…म्हणून हिंदू-मुस्लीम दंगल घडविण्याचा सरकारचा शेवटचा प्रयत्न”, धारावी प्रकरणावरून आदित्य ठाकरेंची टीका

हेही वाचा – मालवण: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला; पंतप्रधान मोदींनी ८ महिन्यांपूर्वी केलं होतं अनावरण

हा छत्रपती शिवरायांचा अवमान आहे – खासदार सुप्रिया सुळे

या घटनेवर खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली. देशाचे पंतप्रधान जेंव्हा एखाद्या स्मारकाचे तथा वास्तूचे उद्घाटन करतात, तेंव्हा त्याचे काम दर्जेदारच असेल, याची जनतेला खात्री असते. परंतु सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा वर्षभरातच कोसळला. हा छत्रपती शिवरायांचा अवमान आहे. विशेष म्हणजे या स्मारकाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ४ डिसेंबर २०२३ रोजी करण्यात आले होते. ज्याअर्थी एक वर्षही पूर्ण न होता हा पुतळा कोसळला, त्याअर्थी त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते. हे उघड आहे. या अर्थाने ही पंतप्रधानांची आणि जनतेचीदेखील उघड फसवणूक आहे. या पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे का झाले यासह इतर अनेक गोष्टींची कसून चौकशी होणे गरजेचे आहे, असं त्या म्हणाल्या.

हेही वाचा – Maharashtra News Live : आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय फोडलं

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं होतं शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण

दरम्यान, गेल्या वर्षी नौदल दिनानिमित्त मालवण येथे शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. तसेच ४ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आलं होतं. महत्त्वाचे म्हणजे त्यावेळी माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यासह अनेकांनी या पुतळ्याच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच या कामाच्या चौकशीची मागणी केली होती.